काय असतात गोल्ड बाँड्स! सोनं घ्या कमी भावात ! | What Is Sovereign Gold Bonds |

* काय असतात गोल्ड बाँड्स! सोनं घ्या कमी भावात ! 
| What Is Sovereign Gold Bonds | What Is SGB | How I Can Buy Gold Bonds | Benefits Of Gold Bonds |
---
मित्र-मैत्रिणींनो नमस्कार! 
पिवळ्याधमक दिसणाऱ्या सोने या धातूने सगळ्यांनाच आपल्याकडे आकर्षून घेतले आहे. भारतीय माणसासाचेही सोन्यावर प्रचंड प्रेम. अगदी सुरुवातीपासून आपल्याकडे सोनं हा पैशांच्या गुंतवणुकीचा प्रमुख मार्ग (Investment In Gold) आहे. भारतात कुठेही जा, पैशांच्या अडचणींवर एकच मुख्य आधार असतो. तो म्हणजे आपल्याकडे असलेले सोने. त्यामुळे सोन्याला Solid Cash असेही म्हणतात. कागदांच्या स्वरूपात तुम्ही कधी सोनं खरेदी केलं आहे का...? तेही कमी भावात आणि 100 टक्के शुद्ध आणि सुरक्षित. येत्या 12 फेब्रुवारी ते 16 फेब्रुवारी 2024 या चार दिवसांच्या काळात गोल्ड बॉण्ड्स खरेदी करण्याची सुवर्णसंधी येत आहे. 
या लेखात आपण अशाच सोन्याच्या खरेदीबाबत जाणून घेणार आहोत. तुम्हाला सॉव्हरिन गोल्ड बॉण्ड्स (Sovereign Gold Bonds), सुवर्णरोखे म्हणजे काय हे माहीत आहे का? आज आपण जाणून घेणार आहोत सॉव्हरिन गोल्ड बॉण्ड्स खरेदी करण्याचे फायदे, हे गोल्ड बॉण्ड्स कशा प्रकारे खरेदी करायचे, याबद्दल. 

* सॉव्हरिन गोल्ड बॉण्ड्स (Sovereign Gold Bonds) ची वैशिष्ट्ये 

सोनं घेताना आपण खूप काळजीपूर्वक व्यवहार करतो. सोन्याची शुद्धता, त्याचा भाव, विश्वसनीयता हे सगळे तपासूनच सोन्याची खरेदी करण्यात येते. पण आता तुम्हाला कसलीच चिंता करण्याची गरज नाही. कारण आता तुम्हाला संधी मिळत आहे, सुवर्णरोखे अर्थात सॉव्हरिन गोल्ड बॉण्ड्स खरेदी करण्याची. सॉव्हरिन गोल्ड बॉण्ड्स (Sovereign Gold Bonds), सुवर्णरोखे ही भारत सरकारची एक सुंदर स्कीम (Scheme) आहे. यात आपल्याला मार्केट रेटपेक्षा कमी भावात सोने खरेदी करता येते. भारतीय नागरिकांचे हित लक्षात घेऊन भारत सरकार वर्षातून काही वेळा सुवर्णरोखे खरेदी करण्याची संधी उपलब्ध करून देते. ही स्कीम (SGB Buying Scheme) खूपच फायदेशीर असते. यालाच सार्वभौम सुवर्णरोखे (SGB) असेही म्हणतात. या योजनेद्वारे आपण बाजारापेक्षा कमी किमतीत बाँडच्या मदतीने सोने खरेदी करू शकतो. 
यंदाच्या वर्षी 12 फेब्रुवारी 2024 पासून सॉव्हरिन गोल्ड बॉण्ड्स (Sovereign Gold Bonds) खरेदी करता येतील. तुम्हाला हे गोल्ड बाँड खरेदी करायचे असतील तर 12 फेब्रुवारी ते 16 फेब्रुवारी हे चार दिवस तुमच्याकडे असतील. 16 फेब्रुवारी 2024 ला ही स्कीम बंद होईल.
-------------
* गोल्ड बाँड कसे खरेदी करायचे? 
(How To Buy Gold Bonds | SGB Buying Process | Sovereign Gold Bonds Info In Marathi) 
सॉव्हरिन गोल्ड बॉण्ड्स (Sovereign Gold Bonds), सुवर्णरोखे ही भारत सरकारची एक सुंदर स्कीम (Scheme) आहे. यात आपल्याला मार्केट रेटपेक्षा कमी भावात सोने खरेदी करता येते. पण हे गोल्ड बॉण्ड्स कसे खरेदी करायचे, असा प्रश्न तुमच्या मनात नक्कीच आला असेल. जाणून घेऊयात सॉव्हरिन गोल्ड बॉण्ड्स (Sovereign Gold Bonds), सुवर्णरोखे कसे खरेदी करायचे? 

* तुमच्याकडे डिमॅट अकाउंट असेल, तर त्यावरून तुम्हाला गोल्ड बॉण्ड्स खरेदी करता येतील. 

* सर्वच प्रमुख बँकांमधून ऑनलाइन आणि ऑफलाइन स्वरूपात तुम्ही सॉव्हरिन गोल्ड बॉण्ड्स (Sovereign Gold Bonds) अथवा सुवर्णरोखे खरेदी करू शकता. 

* भारत सरकारच्या देशभरातील कुठल्याही पोस्ट ऑफिसमधून (Post Office) गोल्ड बॉण्ड्स खरेदी करता येतात. 
- सॉव्हरिन गोल्ड बॉण्ड्स (Sovereign Gold Bonds) Stock Holding Corporation Of India (SHCIL), Clearing Corporation Of India Limited (CCIL), National Stock Exchange, Bombay Stock Exchange द्वारे जारी केले जातात. 
----------
* सॉव्हरिन गोल्ड बॉण्ड्स (Sovereign Gold Bonds), सुवर्णरोखे खरेदी करण्याचे 10 फायदे 
(10 Benefits Of Sovereign Gold Bonds | Advantages Of SBG) 

* सॉव्हरिन गोल्ड बाँड हे सरकारी सुवर्णरोखे असतात. भारत सरकार आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (Reserve Bank Of India) माध्यमातून गोल्ड बॉण्ड्स बाजारात आणले जातात.

* सॉव्हरिन गोल्ड बाँड 1 ग्रॅम सोन्याच्या स्वरूपात खरेदी करता येतो. त्यामुळे सोन्याची साधारण 1 ग्रॅमची जेवढी किंमत असेल, तेवढीच गोल्ड बॉण्ड्सची किंमत असते. 

* सॉव्हरिन गोल्ड बाँडद्वारे, तुम्ही 24 कॅरेटच्या 99.9% शुद्ध सोन्यात गुंतवणूक करू शकता.

* ऑनलाइन पद्धतीने आणि डिजिटल पेमेंट पद्धतीने गोल्ड बॉण्ड्स खरेदी केल्यास, प्रति ग्रॅम 50 रुपयांची सूटदेखील मिळते. 

* सॉव्हरिन गोल्ड बॉण्ड स्कीमची मॅच्युरिटी 8 वर्षे असते. हे गोल्ड बॉण्ड्स तुम्ही 5 व्या वर्षी विक्रीला काढू शकता.

* कोणतीही एक व्यक्ती एका आर्थिक वर्षात (Financial Year) किमान 1 ग्रॅम आणि जास्तीत जास्त 4 किलो सोने एवढ्या किमतीचे गोल्ड बॉण्ड्स खरेदी करू शकतो. 

* सोन्यात गुंतवणूक करण्याचा हा सर्वाधिक सोयीचा, सुरक्षित आणि फायदेशीर मार्ग आहे. 

* सोन्याच्या शोरुममध्ये जाऊन सोने खरेदी करण्यापेक्षा किंवा गोल्ड बॉण्ड्समध्ये गुंतवणूक करण्याचा मार्ग फायदेशीर ठरतो. 

* सोन्यात गुंतवणूक करण्याचा हा एक चांगला मार्ग आहे. यात भारत सरकारकडू तुम्हाला सुरक्षिततेची हमी मिळते.

* घरात सोन्याचे दागिने ठेवण्यात चोरीची भीती असते. गोल्ड बॉण्ड्सच्या खरेदीत तशी भीती नसते. कारण हे काही प्रत्यक्ष सोने नसून, कागदी स्वरूपातील सोने असते. 
---------
या लेखातील दिलेली माहिती संकलित स्वरूपातील आहे. गोल्ड बॉण्ड्स म्हणजे काय, याची माहिती सर्वसामान्य जनतेला व्हावी, या हेतूने ही माहिती येथे देत आहोत. आपणास याविषयी अधिक विस्तृत प्रमाणात जाणून घ्यायचे असेल, तर जवळच्या मुख्य बँकेशी अथवा आर्थिक सल्लागार व्यक्तींचा सल्ला अवश्य घ्यावा. कोणतीही आर्थिक गुंतवणूक करताना, संबंधित विषयाचा सखोल अभ्यास आणि ज्ञान प्राप्त करूनच पुढील पाऊल उचलावे, अशी सर्वांना विनंती. 
आपले मनःपूर्वक धन्यवाद...! 
------------------


Previous Post Next Post