* चला रेल्वेने अयोध्येला! या आहेत सोयीच्या ट्रेन!
| Trains To Ayodhya Dham | Railways For Ayodhya | Ticket Fare For Train | Ayodhya Dham Station Code | Nearest Railway Stations To Ayodhya | Holi Places Near From Ayodhya | Lets Go For Shri Ram Mandir |
मित्र - मैत्रिणींनो, सस्नेह नमस्कार!
समस्त भारतीयांना अभिमान वाटावा असा सुवर्णक्षण आता जवळ येऊन ठेपला आहे. शरयू नदीच्या तीरावर वसलेल्या अयोध्या नगरीत भगवान श्रीराम यांचे भव्य दिव्य आणि विलोभनीय मंदिर साकारले आहे. येत्या 22 जानेवारी 2024 रोजी या देखण्या मंदिरात भगवान श्रीराम यांच्या आकर्षक मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा (Pranpratishtha Ceremony) होत आहे. या लेखात अयोध्या धाम येथे जाण्यासाठी विविध रेल्वे गाड्या (Trains To Ayodhya Dham | Railways For Ayodhya), त्यांचे तिकीट दर आणि अयोध्यापासून जवळ असलेल्या स्टेशन्सची माहिती (Ticket Fare For Train | Ayodhya Dham Station Code | Nearest Railway Stations To Ayodhya) तसेच येथून जवळ असलेल्या तीर्थ क्षेत्रांची माहिती (Holi Places Near From Ayodhya) आपण जाणून घेणार आहोत.
एका सुंदर रत्नजडित सुवर्ण सिंहासनावर भगवान श्रीराम विराजमान होणार आहेत. जीवनात एकदा तरी अयोध्या नगरीत भेट देऊन भगवान श्रीरामाचे मनोभावे दर्शन घेणे, ही आपल्या सर्वांच्या आयुष्यातील मोठी उपलब्धता ठरेल, हे निश्चित. 2024 या नवीन वर्षात भारताला मिळालेली ही अप्रतिम अशी भक्तिमय भेट आहे. अनेक वर्षांच्या प्रदीर्घ संघर्षानंतर आज आपण हा सुवर्णक्षण अनुभवणार आहोत. सर्वांना या मंगल प्रसंगाच्या शुभेच्छा...!
* कसे जायचे अयोध्येला? काय असेल प्रवासी भाडे? या आहेत सोयीस्कर रेल्वे आणि प्रवास भाडे
| How To Go Ayodhya | Convenient Trains To Ayodhya | Ticket Fare For Ayodhya Dham |
* भुसावळ जंक्शन येथून असणाऱ्या रेल्वे
| Trains From Bhusaval Jn. To Ayodhya Dham |
1. भुसावळ ते अयोध्या कँट
a) छपरा अंत्योदय एक्सप्रेस
(गाडी क्रमांक 15102)
माणसी प्रवासी भाडे : रु. 560
b) तुलसी सुपरफास्ट एक्स्प्रेस
(गाडी क्रमांक 22129)
माणसी प्रवासी भाडे : रु. 580
c) साकेत सुपरफास्ट एक्स्प्रेस
(गाडी क्रमांक 22183)
माणसी प्रवासी भाडे : रु. 535
d) अयोध्या कँट सुपरफास्ट एक्स्प्रेस
(गाडी क्रमांक 22103)
माणसी प्रवासी भाडे : रु. 560
2. जळगाव ते अयोध्या कँट
a) अयोध्या कँट सुपरफास्ट एक्स्प्रेस
(गाडी क्रमांक 22103)
माणसी प्रवासी भाडे : रु. 565
3. मनमाड ते अयोध्या कँट
a) तुलसी सुपरफास्ट एक्स्प्रेस
(गाडी क्रमांक 22129)
माणसी प्रवासी भाडे : रु. 630
b) साकेत सुपरफास्ट एक्स्प्रेस
(गाडी क्रमांक 22183)
माणसी प्रवासी भाडे : रु. 590
c) छपरा अंत्योदय एक्सप्रेस
(गाडी क्रमांक 15102)
माणसी प्रवासी भाडे : रु. 605
3. मुंबई (LTT) ते अयोध्या कँट
a) तुलसी सुपरफास्ट एक्स्प्रेस
(गाडी क्रमांक 22129)
माणसी प्रवासी भाडे : रु. 695
b) साकेत सुपरफास्ट एक्स्प्रेस
(गाडी क्रमांक 22183)
माणसी प्रवासी भाडे : रु. 650
c) अयोध्या कँट सुपरफास्ट एक्स्प्रेस
(गाडी क्रमांक 22103)
माणसी प्रवासी भाडे : रु. 675
d) छपरा अंत्योदय एक्सप्रेस
(गाडी क्रमांक 15102)
माणसी प्रवासी भाडे : रु. 670
वरील रेल्वे गाड्यांची माहिती केवळ वाचकांना माहीत व्हावी म्हणून उपलब्ध केली आहे. याशिवाय विविध मार्गावरून इतरही रेल्वे गाड्या असू शकतात. प्रवाशांनी अयोध्येला जाण्याआधी जवळच्या रेल्वे स्टेशनला भेट देऊन संपूर्ण माहिती घेणे गरजेचे आहे. याशिवाय प्रवासी बांधव भारतीय रेल्वेचे ॲप IRCTC किंवा Where Is My Train यासारख्या किंवा इतरही प्रवासी यात्रा कंपन्यांचे ॲप डाऊनलोड करून बघू शकतात. वरील माहिती मर्यादित स्त्रोतांचा वापर (By using limited source) घेण्यात आली आहे.
* अयोध्या धाम येथून सर्वाधिक जवळ असलेली 20 रेल्वे स्टेशन्स आणि त्यांचे कोड
| Nearest 20 Railway Stations To Ayodhya Dham | Railway Station Code |
1. फैजाबाद जंक्शन (FD) : 7 किलोमीटर
2. माणकपूर जंक्शन (MUR) : 28 किलोमीटर
3. आचार्य नरेंद्र देव नगर (ACND) : 5 किलोमीटर
4. सुलतानपूर (SLN) : 60 किलोमीटर
5. खलिदाबाद (KLD) : 85 किलोमीटर
6. शहागंज (SHG) : 94 किलोमीटर
7. गोसाईगंज (GGJ) : 30 किलोमीटर
8. बाभनन (BV) : 34 किलोमीटर
9. रुदौली (RDL) : 44 किलोमीटर
10. मुसाफिरखाना (MFKA) : 60 किलोमीटर
11. गोंडा जंक्शन (GD) : 46 किलोमीटर
12. बस्ती (BST) : 57 किलोमीटर
13. गोरखपूर (GKP) : 117 किलोमीटर
14. बक्सर (BXR) : 224 किलोमीटर
15. लखनौ (LKO) : 127 किलोमीटर
16. अलाहाबाद जंक्शन (ALD) : 154 किलोमीटर
17. वाराणसी जंक्शन (BSB) : 180 किलोमीटर
18. कानपूर सेंट्रल (CNB) : 188 किलोमीटर
19. पं. दीनदयाल उपाध्याय जंक्शन (DDU) : 191 किलोमीटर
20. अकबरपूर (ABP) : 52 किलोमीटर
---
मित्र - मैत्रिणींनो, अयोध्या धाम (Ayodhya Dham) येथे प्रभू श्रीरामचंद्र यांचे मनोभावे दर्शन केल्यानंतर आता येथून जवळपास असलेल्या धार्मिक स्थळांना भेट देण्याची खूप मोठी संधी तुम्हाला लाभते. अशी अनेक सुंदर मंदिरे आणि पवित्र स्थळे आहेत, ज्यांना हिंदू धर्मात सर्वाधिक महत्त्व दिले गेले आहे. अयोध्या धाम येथून जवळच असलेल्या पाच धार्मिक स्थळांची (Five Religious Places Near From Ayodhya) माहिती देत आहोत. या पवित्र स्थळांना (Five Holi Places Near From Ayodhya) भेट देण्यासाठी जगभरातून भाविक येतात. तुम्हीही एकदा तरी येथे जायलाच हवे.
* अयोध्या धाम येथून जवळ असलेली 5 धार्मिक स्थळे
| Five Religious Places Near From Ayodhya |
1) भगवान श्रीकृष्ण यांची जन्मभूमी मथुरा
(Birth Place Of Shri Krishna Mathura | Shri Krishna Janmbhumi Mathura)
* अयोध्या धाम येथून जवळपास 531 किलोमीटर अंतरावर भगवान श्रीकृष्ण यांची जन्मभूमी मथुरा वसलेली आहे. येथे जाण्यासाठी आग्रा - लखनौ एक्स्प्रेस वे (Agra - Lucknow Express Way) सर्वाधिक सोयीचा आहे. भगवान श्रीकृष्णाचा जन्म मथुरेत झाला होता, म्हणून याला श्री कृष्ण जन्मभूमी (Shri Krishna Janmbhumi Mathura) असेही म्हणतात. मथुरेत हजारो छोटी-मोठी मंदिरे आहेत. येथे दर्शनासाठी जगभरातून भाविक येतात. गोकुळ, वृंदावन, गोवर्धन, बरसाना ही गावे मथुरेच्या जवळपास आहेत. भगवान श्रीकृष्ण यांच्या पदस्पर्शाने पुनीत आणि बाल लीलांनी समृध्द अशी ही भूमी खरोखर खूपच सुंदर आहे. मधुर मिठाई आणि खाद्यपदार्थ (Sweets Mithai Of Mathura) हे मथुरा भूमीचे आणखी एक वैशिष्ट्य.
2) वृंदावन, जिथे आहे राधे राणी मंदिर
(Vrindavan | Radha Rani Mandir | Prem Mandir)
अयोध्या धाम येथून वृंदावन नगरी (Vrindavan) 532 किलोमीटर अंतरावर आहे. येथे जाण्यासाठी सोयीस्कर बस सेवा ही उपलब्ध आहे. भगवान श्रीकृष्ण यांची सखी राधा राणी (Radha Rani Mandir) यांचे सुंदर मंदिर असलेले ठिकाण वृंदावन (Vrindavan) हे मथुरेजवळ आहे. या ठिकाणाला भगवान श्रीकृष्णाच्या गोपिकांसमवेत रंगलेल्या प्रेम लीलांची पार्श्वभूमी लाभली आहे. येथे श्री बांकेबिहारी जी मंदिर आणि राधे राणी मंदिर अतिशय विलोभनीय आहे. येथे लोक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येतात. वृंदावन नगरीतील श्री गीता मंदिर (Shri Geeta Mandir) हेदेखील प्रसिद्ध ठिकाणांपैकी एक आहे. यासोबतच वृंदावन येथील होळीचा रंग उत्सव (Holi Festival In Vrindavan | Colour Festival In Vrindavan) जगभरात प्रसिद्ध आहे.
3) बाबा विश्वनाथ धाम काशी - वाराणसी - बनारस
(Shri Kshetra Kashi | Waranasi | Banaras | Baba Vishwanath Temple)
हिंदू धर्मात सर्वाधिक पवित्र आणि महत्त्वपूर्ण धार्मिक स्थळ म्हणजे श्रीक्षेत्र काशी. काशीला वाराणसी (Varanasi) किंवा बनारस (Banaras) असेही म्हणतात. अयोध्या येथून हे धार्मिक स्थळ 236 किलोमीटर अंतरावर आहे. हे शहर जगातील सर्वात जुन्या शहरांपैकी (Ancient City In India) एक आहे. काशीतील बाबा विश्वनाथ, मणिकर्णिका घाट यासारखी धार्मिक स्थळे लोकांना आकर्षित करतात. हिंदू धर्मात अशी धारणा आहे की, मानवाला येथे मृत्यू प्राप्त झाला, तर त्याला थेट मोक्ष प्राप्ती (Moksha Prasad | Swarga Prapti) होते. येथील स्नानालाही खूप मोठे धार्मिक महत्त्व दिले गेले आहे. येथील घाटावरची गंगा आरती (Ganga Arati In Banaras) पाहण्यासाठी देशभरातून भाविक भक्त आणि पर्यटक येतात. धार्मिक स्थळांव्यतिरिक्त येथील खाद्यपदार्थांची चवही उत्कृष्ट आहे. प्रत्येक हिंदू धर्मियाने जीवनात एकदा तरी काशी विश्वनाथ येथे जायलाच हवे, अशी धार्मिक मान्यता आहे.
4) पवित्र संगम क्षेत्र प्रयागराज
(Sangam Kshetra Of Ganga, Jamuna, Saraswati | Three Rivers Sangam Prayagraj)
अयोध्या नगरी येथून (Ayodhya Nagari) प्रयागराज (Prayagraj) हे स्थळ 168 किलोमीटर अंतरावर आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 330 ने येथे पोहचता (NH330 | National Highway Ayodhya - Prayagraj Road) येते. काही वर्षांपूर्वी उत्तर प्रदेश सरकारने अलाहाबादचे (Alahabad) नाव बदलून प्रयागराज (Prayagraj) केले आहे. प्रयागराजमध्ये गंगा, यमुना आणि सरस्वती या नद्यांचा अतिशय पवित्र संगम होतो. हे अतिशय सुंदर आणि पवित्र क्षेत्र (Holi Places In India) आहे. येथे कुंभमेळ्याचे आयोजन (Kumbh Mela | Kumbh Snan | Kumbh Festival) केले जाते. या पवित्र पर्वात लाखो लोक प्रयाग राज येथे येतात. पवित्र कुंभमेळा (Kumbh Ka Mela) जगभर प्रसिद्ध आहे. या ठिकाणी भाविकांसाठी उत्तम व्यवस्था करण्यात येते. पर्यटक आणि भाविकांच्या मुक्कामासाठी ठिकठिकाणी तंबू उभारण्यात येतात.
5) श्री राम यांच्या पदस्पर्शाने पुनीत चित्रकूट धाम
(Spiritual Place In India | Holi Places In India | Chitrakut Dham)
अयोध्या येथून चित्रकूट धाम (Ayodhya to Chitrakoot) हे अंतर 264 किलोमीटर आहे. धार्मिक शास्त्रे पुराणे आणि कथांनुसार, हे तेच ठिकाण आहे जिथे श्री राम, लक्ष्मण आणि सीता माता यांनी मुक्काम केला होता. हे अतिशय निसर्गरम्य ठिकाण आहे. 14 वर्षे वनवास काळात श्रीराम यांचे अनुज भरत हे श्रीराम यांना पुन्हा अयोध्येत घेऊन जाण्यासाठी येथे आले होते. पण श्रीराम यांनी त्यास नकार दिला. तेव्हा त्यांच्या पादुका घेऊन भरत अयोध्येला परतले. त्यामुळे येथे भेट देण्यासाठी देशभरातून भाविक भक्त आणि पर्यटक येतात.
-------
चला, तर मग तुम्हीही अयोध्येला भगवान श्रीराम यांच्या दर्शनासाठी आणि मोठ्या धार्मिक यात्रेसाठी सहकुटुंब फिरण्याची (Family Tour For Ayodhya Darshan) प्लॅनिंग केली असेल तर ही माहिती तुमच्यासाठी नक्कीच उपयोगाची ठरेल. यात्रा सुरू करण्यापूर्वी या क्षेत्रातील अभ्यासू तज्ज्ञ आणि अनुभवी व्यक्तींचा अथवा टूर ऑपरेटर (Tour Companies | Tour Operatiors), प्रवासी गाईड यांचा सल्ला अवश्य घ्यावा. 22 जानेवारीला श्रीराम जन्मभूमी ट्रस्टतर्फे (Shri Ram Janmbhumi Trust) अयोध्या धाम येथे भगवान श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा (Pranpratishtha Ceremony) होत आहे. या ऐतिहासिक आणि धार्मिक सुवर्णक्षणाच्या आपणा सर्वांना मंगलमय शुभेच्छा...!
| जय सियाराम | जय सियाराम | जय सियाराम |
-----