राम काजु कीन्हें बिनु मोहि कहाँ बिश्राम |

* राम काजु कीन्हें बिनु मोहि कहाँ बिश्राम |
रामकार्यास समर्पित हजारो हात! 
| IIT | Engineers | Artists | Technician | Researchers | Labours | Thousands Of Hands Builds New Ram Mandir In Ayodhya | Sundarkand Katha | Story Of Hanuman | Motivational Story | Achieve Target | Success Story | 
----
(Photo Courtesy : Google Images) 

मित्र - मैत्रिणींनो, नमस्कार ! 
रामायण (Ramayana) आणि महाभारत (Mahabharata) यांच्यातील अनेक कथा तुम्ही अनेकदा ऐकल्या असतील. श्री रामरक्षा स्तोत्र (Shri Ram Raksha Stotra) तुमच्यापैकी अनेकांना पाठ असेल. अशीच एक प्रेरणादायी कथा आपण जाणून घेणार आहोत, जिचा थेट संबंध अनुभवता येतो, तो अयोध्येत सुरू असलेल्या भव्य श्रीराम मंदिर कार्याला अनुसरून. ही कथा आहे रामभक्त हनुमानजी (Rambhakt Hanuman) यांची. गोस्वामी तुलसीदास (Goswami Tulsidas) यांनी लिहिलेल्या श्री रामचरित मानस (Shri Ram Charit Manas) या पवित्र ग्रंथात या प्रेरणादायी कथेचा (Motivational Story) उल्लेख येतो. ही कथा आहे सुंदरकांड (Sundarkand) या अत्यंत सुंदर अध्यायात (Part Of Shri Ram Charit Manas). ही कथा जाणून घ्यायला तुम्हाला नक्कीच आवडेल. 

अयोध्या नगरीत भगवान श्रीराम यांच्या भव्य मंदिर निर्मितीचे कार्य जोरदार वेगाने सुरू आहे. हजारो हात गेल्या अनेक वर्षांपासून दिवसरात्र मेहनत घेत आहेत. यात आयआयटीयन्स, इंजिनीअर्स, संशोधक यासह अनेकांचा मोठा सहभाग आहे. प्रारंभी भूमिपूजन, त्यानंतर पायाभरणी, बांधकामासाठी लागणाऱ्या दगडांची परीक्षा (Testing Of Stones), दगडांवर अत्यंत सुरेख रीतीने केलेले नक्षीकाम, कोरीव काम, हजारो शिल्पकृतींची निर्मिती, स्तंभांची निर्मिती.... असे अवाढव्य कार्य गेल्या काही वर्षांपासून हे सर्व जण करीत आहेत. 
(Photo Courtesy : Google Images) 

* उच्चशिक्षित अभियंते, शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ आणि कामगार 
| Highly Qualified Engineers | Scientists | Technicians | Labours | 
अयोध्येतील भव्य दिव्य श्री राम मंदिरात (Ayodhya Ram Mandir) श्री रामलल्ला यांच्या मनमोहक मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू आहे. राम मंदिराची तयारी पूर्ण झाली आहे. सध्या देशभरात येत्या 22 जानेवारी 2024 रोजी होणाऱ्या श्री राम मंदिर अभिषेकाची जोरदार चर्चा सुरू आहे. समस्त भारतीय या सुवर्ण क्षणाची प्रतीक्षा करीत आहेत. श्री राम मंदिर निर्माण कार्य आता अंतिम टप्प्यात (Last Stage Of Ayodhya Ram Mandir Construction) आले आहे. या मंदिराच्या निर्मितीसाठी कुठेही लोखंड (Steel, Steel Bars And Pallates) यांचा वापर करण्यात आलेला नाही. संपूर्ण मंदिर विशिष्ट पद्धतीने आणि विशिष्ट प्रकारच्या दगडातून साकारले जात आहे. सिमेंटऐवजी फक्त दगड वापरण्यात आले आहेत. राम मंदिर बांधण्यासाठी वापरण्यात आलेल्या दगडांची प्रयोगशाळेत चाचणी करण्यात आली आहे. दगड जोडण्यासाठीही (Joint Of Stones) तांब्याचा (Copper) वापर केला जात आहे. हे मंदिर भक्कम आणि पोलादासारखे मजबूत असावे आणि प्रत्येक आव्हान हाताळण्यास सक्षम असावे, हा त्यामागचा उद्देश होय. मंदिर एवढे मजबूत असेल की, पूर आणि वादळानंतरही मंदिराचे कोणतेही नुकसान होणार नाही, याची काळजी घेतली जात आहे. 
श्री राम मंदिराच्या निर्मितीमध्ये केवळ पारंपरिक प्राचीन शैली आणि संस्कृतीचा समावेश नाही तर नवीन अत्याधुनिक तंत्रज्ञानाचाही (Advanced Construction Technology) वापर केला जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून दरवर्षी रामनवमीच्या वेळी सूर्याची किरणे थेट श्रीरामाच्या मूर्तीवर परावर्तित होतील. मंदिरातील दगड जोडण्याची पद्धत (Joint Of Stones) अत्याधुनिक आहे. त्यामुळे अगदी भूकंपातही (Earthquake) मंदिराचा पाया भक्कम राहील. श्री राम मंदिराला दीर्घायुष्य लाभावे यासाठी हजारो हात दिवसरात्र मेहनत घेत आहेत. 
(Photo Courtesy : Google Images) 

* 6 आयआयटी संस्थांचा सहभाग
| Six IIT Institutes | Toppers In IIT | L&T | Tata | 

या निर्माण कार्यात वैज्ञानिक, तज्ञ आणि अनेक संस्था (Institutes) एकत्रितपणे काम करत आहेत. यात देशातील 6 आयआयटी संस्थांच्या (Six IIT Institutes) तज्ज्ञांनी एकत्रित येऊन सूक्ष्म नियोजन (Micro Planning) केले आहे. यात आयआयटी चेन्नई (IIT Chennai), आयआयटी दिल्ली (IIT Delhi), आयआयटी गुवाहाटी (IIT Guwahati), आयआयटी मुंबई (IIT Mumbai), आयआयटी मद्रास (IIT Madras), एनआयटी सुरत (NIT National Institute Of Technology Surat) आणि आयआयटी खरगपूर (IIT Kharagpur) या संस्थांचा सहभाग आहे. श्री राम मंदिराची भव्यता, मजबुती, वास्तुशिल्प सौंदर्य आणि अद्वितीयता राखण्याच्या दृष्टीने इतरही काही सरकारी आणि खासगी संस्था कार्य करीत आहेत. त्यात CSIR (Council Of Scientific And Industrial Research), CBRI (Central Building Research Institute) यांचाही समावेश आहे. जगप्रसिद्ध कन्स्ट्रक्शन कंपनी Larsen & Tubro (L&T) आणि टाटा (Tata) यांच्या सहयोगाने हे महान कार्य पूर्णत्वाकडे झेपावत आहे. 

* हनुमान तेहि परसा कर पुनि कीन्ह प्रनाम।
राम काजु कीन्हें बिनु मोहि कहाँ बिश्राम।।
| Motivational Story Of Hanuman | Sundarkand | Shri Ram Charit Manas | Success Story |
(Photo Courtesy : Google Images) 

रामायण (Ramayana) कथेत महाबलशाली, बुद्धिचतुर, महापराक्रमी, परमप्रतापी श्री हनुमान (Shri Hanuman) यांची प्रमुख भूमिका आहे. अंगात एवढे अफाट सामर्थ्य असूनही, त्यांच्यातील नम्रता, सेवाभाव खरोखर आदर्श आहे. रामभक्त हनुमान यांची ही कथा आजच्या काळातील धडाडीने प्रयत्न करणाऱ्या युवकांसाठी (Youth) प्रेरणादायी आहे. झाले असे की, भगवान श्रीराम यांची परम कृपा आणि आशीर्वाद पाठीशी असलेल्या हनुमंतरायाने माता सीतेच्या शोधार्थ लंकेच्या दिशेने उड्डाण केले. अफाट उंच उडी घेऊन ते लंकेच्या दिशेने कूच करीत होते. मार्गात अनेक अडथळे आले, तरी त्यांनी आपले मन विचलित होऊ दिले नाही. इतर सर्व वानर सहकाऱ्यांना हनुमंतराय लवकर यशस्वी होऊन परत यावेत, ही प्रतीक्षा होती. यावेळी सर्व वानरांचा उत्साह गगनाला भिडला होता. समुद्रावरून उड्डाण करीत असतानाचा हा प्रसंग सुंदरकांड अध्यायात खूपच सुंदर रीतीने कथन केला आहे. श्री हनुमानजींना उड्डाण घेताना समुद्र देवतेनेही पाहिले होते. त्यावेळी त्यांना ही घटना मोठी भाग्यकारक भासली. थोड्याच अवधीत त्यांच्यासमोर एक जण प्रकट झाला आणि म्हणाला, 

जलनिधि रघुपति दूत बिचारी। 
तैं मैनाक होहि श्रम हारी।।

भगवान श्रीराम यांचे लाडके दूत आपल्या येथून निघून जात असल्याचे समुद्राने बघितले आणि ताबडतोब मैनाक पर्वताला आज्ञा केली, हे पर्वत मैनाक! श्रीराम यांचे महान दूत आज आपल्या परिसरातून जात आहेत ही आपल्यासाठी खूप भाग्याची गोष्ट आहे. त्यांच्याकडे जा आणि त्यांना काही काळ विश्रांती घेण्याची विनंती कर. हे ऐकून हा सुवर्ण पर्वत श्री हनुमानजींच्या मार्गात सेवेसाठी प्रकट झाला आणि त्यांना विश्राम घेण्याची विनंती करू लागला. श्री हनुमानजी यांनी मैनाक (Mainak) पर्वताची ही विनंती ऐकली. त्यांनी मैनाक यांच्या सेवावृत्तीचा आदर केला. कामाच्या वेळी आपल्याला कोणी अडवले तर आपण त्या व्यक्तीवर चिडतो. आपला संताप होतो. आपल्यात एक प्रकारची अहंकार भावना जागृत होते. पण श्री हनुमानजी आदर्श आहेत. त्यांनी मैनाक (Mainak) पर्वताचे म्हणणे शांतपणे ऐकले. क्षणभर ते मैनाक पर्वतावर गेले. त्यांना नमन करून आणि चरण स्पर्श करून हनुमानजी मैनाक पर्वताला म्हणाले, हे मैनाक पर्वता, तुझी विनंती निःसंशय आदरणीय आणि मोहक आहे. पण गोष्ट अशी आहे की जोपर्यंत मी श्रीरामाचे (Bhagvan Ram) कार्य पूर्ण करत नाही तोपर्यंत माझ्यासाठी विश्रांती, विश्राम आणि आराम निषिद्ध आहे. त्याच अर्थाचा हा दोहा (Doha) सुंदरकांडमध्ये (Doha In Sundar kaand) गोस्वामी तुलसीदास यांनी लिहिला आहे. तो असा -

हनुमान तेहि परसा कर पुनि कीन्ह प्रनाम।
राम काजु कीन्हें बिनु मोहि कहाँ बिश्राम।। 
(Photo Courtesy : Google Images)

मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्री राम यांची जन्मभूमी असलेल्या (Ram Janmbhumi Ayodhya) अयोध्या नगरीत गेल्या अनेक वर्षांपासून दिवसरात्र मेहनत घेत भव्य मंदिर निर्मितीचे कार्य करीत असलेल्या या हजारो हातांचा ध्यास आणि आत्मविश्वास हे प्रतीक आहे अविश्रांत परिश्रम आणि मेहनतीचे, तसेच श्री रामचरित मानस - सुंदरकांडमधील या सुंदर कथेचे. या हजारो हातांना कोटी कोटी प्रणाम! 
सर्व रामभक्तांना आणि वाचकांना श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या मंगलमय शुभेच्छा...! 
हा लेख आवडला, तर नक्कीच शेअर करा. मनःपूर्वक धन्यवाद...! 
| जय सियाराम | | जय सियाराम | | जय सियाराम | 
-------------

Previous Post Next Post