अयोध्या : श्रीराम मूर्तीचा संपूर्ण प्राणप्रतिष्ठा सोहळा !

* असा आहे अयोध्याधाम येथील
श्रीराम मूर्तीचा संपूर्ण प्राणप्रतिष्ठा सोहळा ! 
| Time Table Of Shri Ram Murti Pranpratishtha Ceremony | Schedule Of Pranpratishtha | Ram Mandir Info In Marathi |
****
(Photo Courtesy : Google Images)

मित्र - मैत्रिणींनो, सस्नेह नमस्कार !
आजच्या या लेखात तुम्हाला जाणून घ्यायला आवडेल की सध्या अयोध्या नगरी कशी सजली आहे, श्री राम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा कसा असेल, त्यात कोणकोणते धार्मिक विधी (Vidhi) होणार आहेत. त्यांची निश्चित तारीख कोणती (Schedule Of Pranpratishtha) अशी सगळी माहिती तुम्हाला या लेखातून मिळेल. 

मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीराम यांची जन्मभूमी अयोध्या नगरी सध्या नववधूसारखी सजली आहे. सजत आहे. अयोध्या शहरातील मंदिर परिसरातील भिंतींवर रामायण कालीन चित्रे (Paintings Of Ramayana) रेखाटण्यात आली आहेत. ठिकठिकाणी मन आकर्षून घेणारे सूर्य स्तंभ (Surya Stambha) उभारण्यात आले आहेत. आपण सर्वच जण ज्या क्षणाची प्रतीक्षा करीत आहोत, तो जवळ आला आहे. अयोध्या हे भारतातील उत्तर प्रदेश राज्यातील ऐतिहासिक आणि धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचे शहर आता अयोध्या धाम या नावाने ओळखले जाईल. फक्त भारतातूनच नाही, तर संपूर्ण विश्वातील पर्यटक, रामभक्त, भाविक भक्तांची पाऊले आता अयोध्येकडे वळतील. इ. स. 1528 पासून सुरू झालेला प्रदीर्घ संघर्ष अखेर समाप्त होतो आहे. 5 ऑगस्ट 2020 रोजी भूमिपूजन झालेल्या भव्य दिव्य श्रीराम मंदिराचे निर्माण कार्य आता अंतिम टप्प्यात आहे. एका मोठ्या संघर्षानंतर (Big Struggle For New Ram Mandir In Ayodhya) तिथे भव्य श्रीराम नगरी आणि अवाढव्य मंदिर साकारले आहे. याच मंदिरात येत्या 22 जानेवारी 2024 रोजी श्रीराम मूर्तीची प्रतिष्ठापना होत आहे आणि हे मंदिर भक्तांसाठी खुले होत आहे. समस्त भारतीयांसाठी हा अपार आनंदाचा सुवर्णक्षण (Golden Moment For Indians) आहे. 
(Photo Courtesy : Google Images)

* सप्त मंदिरे आणि सहा भव्य प्रवेशद्वार
| Seven temples and six big entry gates |
Latest Info Of Ram Mandir | Info About Pranpratishtha Samaroh | 
भगवान श्रीराम यांच्या दर्शनासाठी अयोध्येत येणाऱ्या भाविकांना श्री रामजन्मभूमीच्या ७० एकर परिसरात आणखी सात मंदिरे पाहायला मिळतील. ही मंदिरे महर्षी वाल्मिकी, महर्षी वसिष्ठ, महर्षी विश्वामित्र, महर्षी अगस्ती, माता शबरी, निषाद राज आणि जटायू यांची आहेत. अयोध्येत या सात मंदिरांशिवाय मुख्य शहरे आणि बाहेरगावाहून येणाऱ्या भक्तांच्या स्वागतासाठी भव्य प्रवेशद्वार (big entry gates) बांधण्यात येत आहेत. लखनौ, गोरखपूर, रायबरेली, गोंडा, प्रयागराज, वाराणसी येथून अयोध्येत येणाऱ्या मार्गावर रामायण काळातील महान व्यक्तींच्या नावाने अयोध्येत सहा भव्य दरवाजे बांधण्यात येत आहेत. अयोध्येत येणारा प्रत्येक भाविक या दरवाजातूनच अयोध्या नगरीत प्रवेश करेल. 

* अयोध्या धाम येथील सहा भव्य प्रवेशद्वार
| six entry gates in ayodhya | names of six entry gates in ayodhya |
रामभक्त भाविक जेव्हा लखनौकडून अयोध्येत प्रवेश करतील, तेव्हा त्यांचे स्वागत श्री राम द्वार मार्गे होईल. अयोध्येत येणाऱ्या विविध महामार्गावर सहा बाह्य द्वार बांधले जात आहेत, त्यांची नावे अशी : श्री राम द्वार - लखनौ महामार्ग, श्री हनुमान द्वार - गोरखपूर महामार्ग, भारत द्वार (भारत कुंडजवळ प्रयागराज महामार्ग), वाराणसीहून येणाऱ्यांसाठी जटायू द्वार, रायबरेलीहून येणाऱ्यांसाठी गरुड द्वार, आणि गोंडा येथून अयोध्येत येणाऱ्यांसाठी लक्ष्मण द्वार असेल.
(Photo Courtesy : Google Images)

* असा असेल परिक्रमा पथ
| Parikrama Path In Ayodhya | 4 Types Of Parikrama Path |
अयोध्या नगरीत भाविकांच्या सोयीचा विचार करून अनेक प्रकारच्या व्यवस्था करण्यात आल्या आहेत. त्यातच एक म्हणजे परिक्रमा पथ (parikrama path ). भाविकांसाठी 4 प्रकारचे परिक्रमा पथ निर्माण करण्यात आले आहेत. एक आहे रामकोट परिक्रमा, दुसरी 5 कोसी परिक्रमा, तिसरी 14 कोसी परिक्रमा आणि चौथी 84 कोसी परिक्रमा. या परिक्रमा मार्गावर दर 10 किलोमीटर अंतरावर पर्यटन विभागाची सुविधा केंद्रे बांधली जात आहेत.

* अयोध्येत 14 टन वजनाची भव्य वीणा ! 
| 14 Tonnes Big Vina In Ayodhya | 
अयोध्या नगरीचा चेहरामोहरा बदलण्याचे कार्य सध्या जोमात सुरू आहे. रस्ते, भिंती, चौकांची सजावट करण्यात आली आहे. सुप्रसिद्ध गायिका आणि संगीतकार स्व. लता दीदी यांच्या स्मरणार्थ (in the memory of Lata Mangeshkar Didi) अयोध्येत एक चौक उभारण्यात आला आहे. या चौकात 14 टन वजनाची व 40 फूट लांबीची भव्य वीणा बसवण्यात आली आहे. सुमारे 7.9 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेले हे ठिकाण तमाम पर्यटक आणि भाविकांचे आकर्षण ठरेल हे निश्चित. 
(Photo Courtesy : Google Images)

* भगवान श्रीराम यांचा सर्वात उंच पुतळा 
(Highest Statue Of Bhagvan Shri Ram) 
आगामी काळात अयोध्या नगरी हे रामभक्त आणि पर्यटकांचे सर्वाधिक आवडते ठिकाण होणार आहे. त्यासाठी हजारो कामगार आणि इंजिनीअर्सची मोठी टीम कार्य करीत आहे. अयोध्या नगरीला सजवण्यासाठी हजारो हात दिवसरात्र मेहनत करीत आहेत. याचाच एक भाग म्हणून अयोध्येतील माझा बरहाटा भागात भगवान श्री रामाचा 251 मीटर उंच पुतळा (Highest Statue Of Bhagvan Shri Ram) उभारण्यात येणार आहे. या संपूर्ण कामासाठी तब्बल 1000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. 

* असा आहे प्राणप्रतिष्ठा सोहळा कार्यक्रम 
| Schedule Of Pranpratishtha | Pranpratishtha Vidhi | Ram Murti Sthapana |
अयोध्या नगरीत येत्या 16 जानेवारी 2024 पासून प्राणप्रतिष्ठा सोहळा सुरू होणार आहे. त्यात मुख्य विधी म्हणजे 22 जानेवारी 2024 रोजी श्री रामललाचा अभिषेक होणार आहे. पण खऱ्या अर्थाने या संपूर्ण विधीला प्रारंभ होणार आहे 16 जानेवारी 2024 पासून. असा आहे संपूर्ण प्राणप्रतिष्ठा सोहळा

* सातदिवसीय विधी कार्यक्रम
| 7 Days Schedule Of Pranpratishtha | Sampurna Vidhi |
* 16 जानेवारी : श्री राम जन्मभूमी मंदिर ट्रस्टने नियुक्त केलेल्या यजमानाकडून प्रायश्चित्त, शरयू नदीच्या काठावर दशविद स्नान, विष्णूपूजा आणि गोदान.

* 17 जानेवारी : श्री रामललाच्या मूर्तीसह भव्य मिरवणूक. शरयू नदीचे पवित्र जल मंगल कलशात घेऊन भक्त मंदिरात पोहोचतील.

* 18 जानेवारी : श्री गणेश अंबिका पूजन, वरुण पूजा, मातृका पूजा, वास्तुपूजा इत्यादी विधींना ची सुरुवात. 

* 19 जानेवारी : अग्नी प्रतिष्ठापना, नवग्रह स्थापना आणि होमहवन विधी. 

* 20 जानेवारी : शरयूच्या पवित्र जलाने मंदिराचे गर्भगृह धुतल्यानंतर वास्तुशांती आणि अन्नाधिवास विधी.  

* 21 जानेवारी : पवित्र 125 कलशांसह दिव्य स्नानानंतर शयाधीश केले जातील.

* 22 जानेवारी : सकाळच्या पूजेनंतर दुपारी मृगाशिरा नक्षत्रात रामलल्लाचा अभिषेक केला जाईल. शुभमुहूर्त 
दुपारी 12:29:08 पासून 12:30:32 पर्यंत 
सूक्ष्म मुहूर्त : 1 मिनट 24 सेकंद म्हणजेच 84 सेकंद  
(Photo Courtesy : Google Images)

* सुवर्णक्षण भारतीयांचा, श्रीराम मूर्ती स्थापनेचा! 
(Golden Moment For Every Indian) 
समस्त भारतीयांना अभिमान वाटावा असा सुवर्णक्षण आता जवळ येऊन ठेपला आहे. शरयू नदीच्या तीरावर वसलेल्या अयोध्या नगरीत भगवान श्रीराम यांचे भव्य दिव्य आणि विलोभनीय मंदिर साकारले आहे. येत्या 22 जानेवारी 2024 रोजी या देखण्या मंदिरात भगवान श्रीराम यांची आकर्षक मूर्ती रत्नजडित सुवर्ण सिंहासनावर विराजमान होणार आहे. विविध वैशिष्ट्यांनी परिपूर्ण असे हे मंदिर असेल. जीवनात एकदा तरी अयोध्या नगरीत भेट देऊन भगवान श्रीरामाचे मनोभावे दर्शन घेणे, ही आपल्या सर्वांच्या आयुष्यातील मोठी उपलब्धता ठरेल, हे निश्चित. 2024 या नवीन वर्षात भारताला मिळालेली ही अप्रतिम अशी भक्तिमय भेट आहे. अनेक वर्षांच्या प्रदीर्घ संघर्षानंतर आज आपण हा सुवर्णक्षण अनुभवणार आहोत. सर्वांना या मंगल प्रसंगाच्या शुभेच्छा...! 
| जय सियाराम | | जय सियाराम | | जय सियाराम |
--------
 

Previous Post Next Post