* SIP : इन्व्हेस्टमेंट चा फायदेशीर मार्ग !
| What Is SIP | एसआयपी म्हणजे काय | How To Be Rich By SIP | सहजसोपी इन्व्हेस्टमेंट | Invest In Sip | Systematic Investment Plan |
-----
मित्र-मैत्रिणींनो नमस्कार!
मागील एका भागात आपण स्टॉक मार्केटमध्ये IPO काय असतो हे बघितले. स्टॉक मार्केटची माहिती घेत असताना आज आपण जाणून घेणार आहोत एसआयपी म्हणजे काय? What Is SIP? How to invest in sip? एसआयपीमध्ये कशी गुंतवणूक करायची? सर्वात बेस्ट SIP Funds कोणते? आणि SIP विषयी आणखी बरेच काही.
श्रद्धा और सबुरी का फल मीठा होता है, हे वाक्य SIP साठी अत्यंत योग्य ठरते. एसआयपी (SIP) म्हणजे Systematic Investment Plan अर्थात आपल्या रकमेची एका विशिष्ट पद्धतीने एका विशिष्ट कालावधीसाठी केलेली गुंतवणूक. ही योजना म्युच्युअल फंड योजनेअंतर्गत येते. SIP हा मासिक बचतीचा सर्वात चांगला आणि फायदेशीर मार्ग आहे. तितकाच तो विश्वसनीय (Trusted) आणि सहज सोपा (Easy to invest) मार्ग आहे. कुठलाही अभ्यास नसताना फक्त आकर्षण आणि पैशांच्या लोभापायी बरेच जण स्टॉक मार्केटकडे वळतात, त्यातून अनेकदा त्यांच्या पदरी निराशा येते. त्यासाठी एसआयपीमध्ये इन्व्हेस्टमेंट करणे फायद्याचे आणि सुरक्षित ठरते. प्रत्येक महिन्याच्या ठराविक तारखेला आपल्या खात्यातून रक्कम वळवून एसआयपी काढता येते. अगदी रु. 500 प्रति महिना गुंतवणूक करण्याचे पर्यायदेखील (Monthly Investment Option) यात उपलब्ध आहेत. सर्वसामान्य पगारदार लोकांसाठी एसआयपी (SIP) सिस्टेमॅटीक इन्व्हेस्टमेंट प्लॅन हा गुंतवणुकीचा सोपा पण समृद्ध मार्ग आहे. स्टॉक मार्केटचा फारसा अभ्यास नसेल आणि थोडीशी रिस्क घेऊन Investment करण्याची तयारी असेल तर एसआयपीद्वारे चांगले रिटर्न्स (high returns) मिळवता येतात. यात गुंतवणूक करू इच्छिणाऱ्यांसाठी हा एक चांगला पर्याय आहे. कारण म्युच्युअल फंड योजनेचे हुशार आणि तज्ज्ञ फंड मॅनेजर बाजारातील स्थितीचे अवलोकन करून त्या फंडातील Investment Manage करतात.
* युवक - युवतींना भविष्य साकारण्याची मोठी संधी !
| big chance for youth in saving | Plan For Monthly Savings | Monthly SIP |
युवक - युवतींनो, उज्ज्वल भविष्य साकारण्याची मोठी संधी तुम्हाला दर महिन्याला काही ना काही पैसे एसआयपी (SIP) मध्ये इन्व्हेस्ट करून मिळवता येते. तुम्ही नुकतेच जॉबला लागला असेल, तर नवीन वर्षात SIP मध्ये गुंतवणूक करण्याचा संकल्प अवश्य करा. म्युच्युअल फंडात Investment करून भविष्यात मोठी संपत्ती निर्माण करण्याचा एसआयपी SIP हा एक उत्तम मार्ग आहे. ही गुंतवणूक तुम्ही जेवढ्या अधिक कालावधीसाठी ठेवतात, तेवढेच ते तुमच्या फायद्याचे ठरते. आणि ही गोष्ट केवळ नोकरीच्या सुरुवातीच्या काळातच करता येते. सुरुवातीच्या काळात फारशा जबाबदाऱ्या अंगावर नसतात, त्यामुळे महिन्याच्या पगारातून (monthly salary) काही विशिष्ट रक्कम (specific amount for monthly SIP) गुंतवणे सोपे जाते. वयाच्या 35 किंवा 38 व्या वर्षी मोठी रक्कम हाताशी येते.
* SIP का काढावी? SIP काढण्याचे फायदे कोणते?
| Why To Invest In SIP | Benefits Of SIP | Easy Way Of Savings | Systematic Investment Plan |
मित्रांनो, वाढत्या वयाच्या हिशोबाने खर्चही वाढतात. वयाच्या एखाद्या टप्प्यावर मोठ्या रकमेची गरज पडली, तर त्यासाठी सुरुवातीपासूनच पाऊले उचलली पाहिजेत. त्यामुळे तरुण वयात एसआयपी हा Investment चा सर्वात उत्तम पर्याय (Best Option For Investment) आहे. आता आपण जाणून घेऊ SIP काढण्याचे फायदे :
A) एसआयपी SIP मुळे प्रत्येक महिन्यात एका विशिष्ट रकमेची बचत करण्याची चांगली सवय लागते.
B) SIP त्या त्या महिन्याच्या विशिष्ट तारखेला निवडलेली असल्याने वायफळ खर्च आपोआप थांबतो. महिन्याचा पगार आणि खर्च यांच्या बजेटला एक आर्थिक शिस्त लावण्याचे काम SIP द्वारे होते.
C) SIP कोणालाही काढता येते. अगदी कमीत कमी महिना 500 रुपये अशी सहज सोपी Investment यातून करता येते. ही रक्कम 1000, 2000, 5000, 10000 अशी तुमच्या इच्छेनुसार निवडता येते.
D) Systematic Investment Plan मध्ये तुम्ही जेवढी अधिक रक्कम गुंतवाल, तेवढा तुमचा फायदा जास्त, हे लक्षात घ्या.
E) शून्य जोखीम आणि अधिक परतावा (zero risk and best returns) हे सूत्र एसआयपीद्वारे साध्य होऊ शकते. स्टॉक मार्केट, इक्विटी प्रकारात शांत मनाने Investment करण्याचा हा सर्वात सोपा मार्ग आहे.
F) एक लक्षात घ्या, SIP मध्ये तुमचा पैसा अशा लोकांच्या हाती जातो, ज्यांना आर्थिक क्षेत्र, बाजार यांची परिपूर्ण माहिती आणि अद्ययावत ज्ञान आहे. यात म्युच्युअल फंड स्कीमचे तज्ञ फंड मॅनेजर आपल्या वतीने योग्य ठिकाणी पैसा गुंतवतात. त्यामुळे आपल्याला स्टॉक मार्केटची चिंता करण्याची काही गरज नसते.
G) SIP मध्ये तुम्ही टाकलेल्या रकमेचे संपूर्ण स्टेटमेंट तुम्हाला दर तीन किंवा सहा महिन्याने मिळते.
H) या स्टेटमेंटमधून तुम्हाला सर्व माहिती दिली जाते. तुमचा सध्याचा स्टेटस, तुम्ही टाकलेली रक्कम, त्याचे आजचे बाजार मूल्य अशी सगळी माहिती तुम्हाला E mail द्वारे मिळते.
I) एसआयपी SIP चे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे Compounding Interest अर्थात चक्रवाढ व्याज. सिपमध्ये तुम्हाला तुम्ही Invest केलेल्या रकमेवर भरघोस परतावा मिळवता येतो.
J) SIP काढताना एक उद्दिष्ट समोर ठेवणे आवश्यक आहे. महिन्याला केलेल्या छोट्या Savings मधून तुम्हाला मोठी रक्कम उभारता येते. त्यासाठी सिपचा कालावधी जेवढा अधिक, तेवढे फायदेशीर ठरते.
K) SIP मध्ये प्रत्येक महिन्याच्या विशिष्ट तारखेला तुम्ही रक्कम टाकत असता. त्यामुळे स्टॉक मार्केटमध्ये कितीही चढउतार झाले तरी Average Rupee Cost या सूत्राने स्टॉक मार्केट चढत असताना शेअरची किंमत आणि मार्केट उताराला लागलेले असताना शेअरची किंमत यातील सरासरीचा लाभ मिळून मोठी रक्कम (Big Amount) उभी राहते.
M) SIP चे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, तुम्ही कोणत्याही महिन्यात तुमची मासिक ठराविक रक्कम वाढवू शकता. तुमचे Income वाढले की तुम्ही त्यात भर घालू शकता. त्यानुसार प्रत्येक वर्षी एसआयपी मासिक हप्त्यात वाढ करणे फायद्याचे ठरते.
* एसआयपी करताना, म्युच्युअल फंड निवडताना काय काळजी घ्यावी?
| Be Careful When Selecting Mutual Funds | Care Points When Starting SIP |
* SIP काढण्यासाठी तयारी करताना आधी अभ्यास आणि सखोल ज्ञान असणे आवश्यक आहे. तुम्ही निर्णय घेण्यापूर्वी सर्व बाबींचा विचार अवश्य करायला हवा.
* केवळ मागील काळात चांगले रिटर्न्स मिळाले म्हणून त्यानुसार निर्णय घेऊ नका. म्युच्युअल फंडांच्या कामगिरीचा अभ्यास करा.
* एकाच वेळी अनेक म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करताना सर्व बाजूंचा विचार करून निर्णय घेतला पाहिजे.
* अनेक एसआयपी स्कीममध्ये Investment केल्याने त्या सर्वांचा हिशेब ठेवणे कठीण होऊ शकते. त्यामुळे सखोल अभ्यास करून दोन-तीन चांगल्या म्युच्युअल फंड योजना निवडा. त्यासाठी Investment Planners, Fund Advisor यांचा सल्ला अवश्य घ्यावा.
* 2024 मध्ये तुमच्यासाठी बेस्ट ठरू शकतील असे SIP !
| Best SIP Options In 2024 | Best Funds In 2024 |
मित्रांनो, येत्या 2024 वर्षात तुम्ही बचतीचा संकल्प करीत असाल, तर येथे तुमच्या माहितीसाठी काही उत्तम ठरतील असे Mutual Funds देत आहोत. कुठलाही निर्णय घेण्यापूर्वी त्यांचा सखोल अभ्यास अवश्य करा. तुम्ही या क्षेत्रातील अभ्यासू आणि तज्ञ लोकांची जसे की, Investment Planners, Fund Advisor, Wealth Manager यांचा सल्ला जरूर घ्या.
* Best SIP Funds In 2024 (Large Cap । Small Cap)
* ॲक्सिस ब्लूचिप फंड - Axis Bluechip Fund
* कॅनरा रोबेको ब्लूचिप इक्विटी फंड - Canara Robeco Bluechip Equity Fund
* मिरा ॲसेट लार्ज कॅप फंड - Mirae Asset Large Cap Fund
* BNP परिबस लार्ज कॅप फंड - BNP Paribas Large Cap Fund
* एडलविस लार्ज कॅप फंड - Edelweiss Large Cap Fund
* निपोन इंडिया स्मॉल कॅप फंड - Nippon India Small Cap Fund
* एसबीआय स्मॉल कॅप फंड - SBI Small Cap Fund
* DSP स्मॉल कॅप फंड - DSP Small Cap Fund
* ॲक्सिस स्मॉल कॅप फंड - Axis Small Cap Fund
* कोटक स्मॉल कॅप फंड - Kotak Small Cap Fund
* HDFC स्मॉल कॅप फंड - HDFC Small Cap Fund
* सुंदरम स्मॉल कॅप फंड - Sundaram Small Cap Fund
* काँट स्मॉल कॅप फंड - Quant Small Cap Fund
---------------
(अस्वीकरण : या लेखातील माहिती फक्त एसआयपी योजनेची ओळख होण्याच्या हेतूने दिली आहे. कुठल्याही प्रकारची गुंतवणूक करताना या क्षेत्रातील तज्ञ, अनुभवी व्यक्तींचा, आर्थिक सल्लागारांचा सल्ला अवश्य घ्यावा. आर्थिक गुंतवणूक करताना सखोल अभ्यास आणि संशोधन करूनच निर्णय घ्यावा.)
--------------------