अयोध्या राममंदिरासाठी संघर्ष, इतिहास । The Battle History of Ayodhya Sri Ram Mandir । History of Ram Mandir In Ayodhya । Struggle To Rebuild Ram Temple In Ayodhya । History of Ayodhya Ram Temple ।

* अयोध्या राममंदिरासाठी संघर्ष, इतिहास  
। The Battle History of Ayodhya Sri Ram Mandir ।  History of Ram Mandir In Ayodhya । Struggle To Rebuild Ram Temple In Ayodhya In Marathi । History of Ayodhya Ram Temple Marathi। 
-----------
मित्र - मैत्रिणींनो, सस्नेह नमस्कार !
समस्त भारतीयांना अभिमान वाटावा असा सुवर्णक्षण आता जवळ येऊन ठेपला आहे. शरयू नदीच्या तीरावर वसलेल्या अयोध्या नगरीत भगवान श्रीराम यांचे भव्य दिव्य आणि विलोभनीय मंदिर साकारले आहे. येत्या 22 जानेवारी 2024 रोजी या देखण्या मंदिरात भगवान श्रीराम यांची आकर्षक मूर्ती रत्नजडित सुवर्ण सिंहासनावर विराजमान (consecration ceremony of the grand Ram Temple in Ayodhya | January 22, 2024) होणार आहे. विविध वैशिष्ट्यांनी परिपूर्ण असे हे मंदिर असेल. जीवनात एकदा तरी अयोध्या नगरीत भेट देऊन भगवान श्रीरामाचे मनोभावे दर्शन घेणे, ही आपल्या सर्वांच्या आयुष्यातील मोठी उपलब्धता ठरेल, हे निश्चित. 2024 या नवीन वर्षात भारताला मिळालेली ही अप्रतिम अशी भक्तिमय भेट आहे. अनेक वर्षांच्या प्रदीर्घ संघर्षानंतर आज आपण हा सुवर्णक्षण अनुभवणार आहोत. भगवान श्रीराम यांचे अयोध्या येथील हे श्रीराम धाम कसे असेल, याबाबत तुम्ही माहिती घेतली आहे. आता आपण या राम मंदिराच्या उभारणीसाठी दिलेला लढा (Struggle To Rebuild Ram Temple In Ayodhya In Marathi । History of Ayodhya Ram Temple In Marathi) आणि अयोध्या नगरीचा इतिहास जाणून घेणार आहोत....!
* श्रीराम मंदिराचा प्राचीन इतिहास आणि घटनाक्रम 
(Ancient History Of Shriram Mandir And Sequence Of Events)
या लेखात आपण जाणून घेणार आहोत श्री राम मंदिराचा इतिहास (history of Shriram mandir in ayodhya), राम मंदिरासाठी झालेला संघर्ष (Struggle For New Ram Temple In Ayodhya), बाबरी मशीद ते आज साकारलेले सुंदर मंदिर यांचा घटनाक्रम (Sequence Of Happenings From Baburi Masjid To New Ram Mandir In Ayodhya) याविषयी. 
------
* अयोध्या नगरीचा इतिहास 
Info about Ayodhya Nagari In Marathi | History of ayodhya |
भगवान श्रीरामाचा जन्म अयोध्येत झाला होता. भगवान श्री विष्णू यांच्या निवासस्थानाला ज्याप्रमाणे वैकुंठ धाम असे म्हणतात, त्याप्रमाणे भगवान श्रीराम यांच्या निवासाला साकेत (Saket) म्हटले जाते. पद्म पुराण कथेत याचा उल्लेख येतो. शरयू नदीच्या काठावर असलेल्या अयोध्या नगरीत प्राचीन काळात त्यांच्या जन्मस्थानी एक भव्य मंदिर होते. हे मंदिर मुघल आक्रमक बाबर याने पाडले आणि तेथे मशीद बांधली. अयोध्या हे भारतातील उत्तर प्रदेश राज्यातील ऐतिहासिक आणि धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचे शहर आहे. आता मोठ्या संघर्षानंतर (Big Struggle For New Ram Mandir In Ayodhya In Marathi) तिथे भव्य श्रीराम नगरी आणि अवाढव्य मंदिर साकारले आहे. याच मंदिरात येत्या 22 जानेवारी 2024 रोजी श्रीराम मूर्तीची प्रतिष्ठापना (consecration ceremony of the grand Ram Temple in Ayodhya | January 22, 2024) होत आहे आणि हे मंदिर भक्तांसाठी खुले होत आहे. समस्त भारतीयांसाठी हा अपार आनंदाचा सुवर्णक्षण (Golden Moment For Indians) आहे. 
---------
* अयोध्या श्रीराम मंदिर उभारणीचा संघर्षमय इतिहास 
(50 Years Hindu Struggle To Rebuild Shriram Mandir In Ayodhya)
* इ. स. 1528 : बाबरी मशीद उभारली !
रामजन्मभूमी अयोध्या नगरीत मुघल शासक बाबर याचा सेनापती मीर बांकी याने येथे मशीद उभारली. हीच मशीद 'बाबरी मशिद' या नावाने ओळखली जात होती. याच ठिकाणी भगवान श्रीराम यांचा जन्म झाला होता, अशी हिंदू धर्मियांची धारणा आहे. 

* इ. स. 1853 : दोन समुदायांत वाद
(Clashes In Two Communities)
श्रीराम मंदिराच्या या स्थळावरून प्रथमच दोन समुदायांत वाद उद्भवला. रामजन्मभूमी स्थळावर असलेले मंदिर पाडून त्या ठिकाणी बाबरी मशिद उभारल्याचा दावा हिंदू संघटनांकडून करण्यात आला. या वादातून पहिल्यांदा येथे संघर्ष निर्माण झाला. 

* इ. स. 1859 : ब्रिटिशांनी घातले वादग्रस्त जागेवर कुंपण 
(Fencing By British On Disputed Land)
या संघर्षानंतर तत्कालीन ब्रिटिश सरकारने या वादग्रस्त जागेला संरक्षित कुंपण घातले आणि मुस्लिमांना मशिदीत तर हिंदूंना मशिदीच्या बाहेर असलेल्या एका चौथऱ्यावर पूजाअर्चा करण्याची परवानगी दिली. 

* इ. स. 1885 : न्यायालयाकडे मंदिराची मागणी
(Demand Of Temple To Faizabad Court By Mahant) 
मशिदीच्या बाहेर असलेल्या चौथऱ्यावर मंदिर उभारण्यासाठी परवानगी मिळावी, अशी मागणी महंत रघुवर दास यांनी फैजाबाद न्यायालयासमोर केली परंतु न्यायालयाने तशी परवानगी देण्यास नकार दिला.

* इ. स. 1946 : दोन मुस्लिम समुदायांत वाद 
(Clashes In Two Muslim Communities)
अयोध्येतील बाबरी मशिदीवरून शिया आणि सुन्नी या दोन मुस्लिम समुदायांत वाद उद्भवला. याचा निर्णय शिया मुस्लिमांविरोधात गेला.

* इ. स. 1949 : वादग्रस्त वास्तू घोषित 
(Declared As Controversial Architecture / Place)
या काळात बाबरी मशिदीच्या बाहेर असलेल्या चौथऱ्यावर राममंदिर उभारण्याचा प्रयत्न करण्यात आला, पण त्यात यश मिळाले नाही. त्यानंतर 29 डिसेंबर 1949 ला मंदिराची संपत्ती जप्त करून या स्थळाला तत्कालीन सरकारने वादग्रस्त वास्तू (Controversial Architecture / Place) घोषित केले. तसेच या स्थळाला कुलूपबंद केले. 
* इ. स. 1950 : न्यायालयीन लढाईला सुरुवात
(Court Battle Starts For Ram Mandir)
या काळात राम मंदिराच्या उभारणीसाठी न्यायालयीन लढाईला सुरुवात झाली. 

* इ. स. 1950 : मूर्ती पूजेची मागणी 
(Demand Of Worship)
16 जानेवारी 1950 रोजी गोपालसिंह विशारद यांनी फैजाबाद दिवाणी न्यायालयात मशिदीतून मूर्ती हटवण्यात येऊ नयेत आणि कोणत्याही अडथळ्याशिवाय पूजाअर्चा सुरू ठेवण्यात यावी, अशी मागणी केली. त्यावर न्यायालयाने मूर्ती हटवण्यात येऊ नयेत, परंतु त्या कुलूपबंद राहतील आणि केवळ पुजाऱ्याकडून पूजा सुरू राहील. भाविक भक्त बाहेरून दर्शन घेऊ शकतील, असे आदेश दिले.

* इ. स. 1959 ते इ. स. 1961 : अधिकारासाठी परस्परविरोधी दावे 
(Conflicting Claims To Authority)
या काळात निर्मोही आखाड्याने न्यायालयात आपला दावा मांडला, तर सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्डाच्या वतीने न्यायालयात मशिदीचा दावा सादर करण्यात आला. 

* इ. स. 1984 : राम मंदिर उभारणीसाठी समिती स्थापन 
(Committee Formed For Construction Of Ram Temple) 
अयोध्या येथे श्री राम मंदिराच्या उभारणीसाठी विश्व हिंदू परिषदेच्या वतीने एका समितीची स्थापना करण्यात आली. 

* इ. स. 1986 : मूर्तींचे कुलूप उघडले, पूजा करण्याची परवानगी
(Lock opened, pooja allowed) 
अयोध्या राम मंदिर इतिहासात (History of ram mandir in ayodhya) या दिवशी म्हणजेच 1 फेब्रुवारी 1986 रोजी फैजाबादच्या जिल्हा न्यायाधीशांनी कुलुपात असलेल्या मूर्ती उघडण्याचे आदेश देतानाच पूजेचीही परवानगी दिली. या निर्णयाविरुद्ध बाबरी मशीद ॲक्शन कमिटी तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला. 
अयोध्या राम मंदिराचा इतिहास : भारतीय जनता पक्षाची रथयात्रा 
| History of ayodhya | Struggle to rebuild shri ram mandir in ayodhya |

* इ. स. 1990 : सोमनाथहून रथयात्रा 
(Rathyatra from somnath)
दिनांक 25 सप्टेंबर 1990 रोजी राम मंदिर निर्मितीसाठी भारतीय जनता पक्षाचे नेते स्व. लालकृष्ण आडवाणी यांनी सोमनाथ ते अयोध्या अशी रथयात्रा सुरू केली. या रथयात्रेने संपूर्ण देशातील वातावरण ढवळून निघाले. देशाच्या अनेक भागांत संचारबंदी लागू करण्यात आली. दिनांक 23 ऑक्टोबर 1990 रोजी बिहारमधील मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांच्या सरकारने लालकृष्ण आडवाणी यांना अटक करण्याचे आदेश दिले. रथयात्रा बिहारमध्ये रोखली गेली आणि स्व. लालकृष्ण आडवाणी यांना अटक करण्यात आली.

अयोध्येचा इतिहास : श्रीराम मंदिरासाठी कारसेवेची घोषणा
| History of ayodhya and karseva in Marathi | Karseva for shriram temple in ayodhya |

* इ. स. 1991 : उत्तर प्रदेशात भाजप सरकार
(BJP Government in Uttar Pradesh)
1991 च्या जून महिन्यात विधानसभा निवडणुका झाल्या आणि भव्य रथयात्रेचा भाजपला राजकीय फायदा झाला. उत्तर प्रदेशात भाजप सरकार निवडून आले. याच अयोध्या येथे श्री राम मंदिर उभारणीसाठी देशभरातून विटा पाठवण्याची मोहीम सुरू करण्यात आली. 

* इ. स. 1992 : बाबरी मशीद पतन
(Demolition of babri masjid)
दिनांक 6 डिसेंबर 1992 रोजी लाखो कारसेवकांनी बाबरी मशीद उद्ध्वस्त केली. त्यामुळे देशभरात दंगली उसळल्या. यात अनेक जण मृत्युमुखी पडले. देशाचे तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी लिबरहान आयोगाची नेमणूक केली. 
* इ. स. 2001 : 13 जणांवरील आरोप हटवले
(Conspiracy charges against 13 persons dropped)
2001 मध्ये सरकारच्या विशेष सीबीआय न्यायालयाने भाजप नेते लालकृष्ण आडवाणी, शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे, मुरली मनोहर जोशी, उमा भारती यांच्यासह 13 जणांवरील कट रचण्याचा आरोप हटवला. 

राम मंदिर इतिहास : स्व. अटलबिहारी वाजपेयी यांची मध्यस्थी 
| History of ram mandir | Mediation Of late Atal Bihari Vajpayee Ji |

* इ. स. 2002 : स्व. वाजपेयी यांची मध्यस्थी
(Mediation Of late Atal Bihari Vajpayee Ji)
देशाचे तत्कालीन पंतप्रधान स्व. अटलबिहारी वाजपेयी यांनी हिंदू आणि मुस्लिम दोन्ही गटांतील पक्षकारांशी संवाद साधत वाद मिटवण्यासाठी प्रयत्न करण्याची जबाबदारी जानेवारी 2002 मध्ये स्थापन केलेल्या अयोध्या विभागावर सोपवली.

* इ. स. 2003 : राम मंदिराचे अवशेष आढळले
(Remains of the Ram temple were found) 
2003 मध्ये केलेल्या खोदकामात या जागेवर कधी राम मंदिर अस्तित्वात होते का, याच्या पडताळणीसाठी अलाहाबाद न्यायालयाने वादग्रस्त जागेवर खोदकाम करण्याचे आदेश दिले. त्यात मशिदीच्या बांधकामाखाली दहाव्या शतकातील राम मंदिराचे अवशेष आढळल्याचे भारतीय पुरातत्व विभागाने अयोध्येतील उत्खननाच्या अहवालात नमूद केले. सप्टेंबरमध्ये झालेल्या एका सुनावणीत बाबरी मशिदीच्या पतनास जबाबदार असलेल्या 7 हिंदू नेत्यांना सुनावणीसाठी हजर राहण्याचे न्यायालयाने आदेश दिले.

* इ. स. 2005 : वादग्रस्त जागेवर दहशवादी हल्ला
(Terrorist attack on disputed site)
या वादग्रस्त जागेवर 2005 मध्ये दहशतवादी हल्ला झाला. दहशतवादी काही नुकसान करू शकले नाहीत परंतु त्यांना सुरक्षा यंत्रणांनी ठार केले. 

अयोध्या नगरीचा इतिहास : उच्च न्यायालयाचा निर्णय
| History in Marathi of ayodhya and karseva | High Court decision | 

* इ. स. 2010 : अलाहाबाद उच्च न्यायालयाचा आदेश आणि आव्हान 
(Order and Challenge of Allahabad High Court)
दिनांक 30 सप्टेंबर 2010 रोजी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाने अयोध्येतील वादग्रस्त जमीन राम मंदिर, निर्मोही आखाडा आणि सुन्नी वक्फ बोर्ड यांच्यात समसमान वाटण्याचा निर्णय सुनावला. या निर्णयाला सर्वांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले.

* इ. स. 2017 : श्री श्री रविशंकर यांची मध्यस्थी 
(Mediation of Sri Sri Ravi Shankar)
वर्ष 2017 मध्ये लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती यांच्यासह भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अनेक नेत्यांवर खटला चालविण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले. दिनांक 16 नोव्हेंबर 2017 रोजी 'आर्ट ऑफ लिव्हिंग'चे श्री श्री रविशंकर यांनी वाद मिटवण्यासाठी मध्यस्थी केली. विविध पक्षकारांची भेट घेऊन त्यांनी संवाद साधला.
अयोध्या राम मंदिराचा इतिहास : सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
| History of Ayodhya Ram Temple | Supreme Court Verdict |

* मार्च 2019 : सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
(Supreme Court Verdict in March 2019)
दिनांक 8 मार्च 2019 रोजी सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाच्या सुनावणीत चर्चेद्वारे हा प्रश्न सोडवण्याचा निर्णय घेताना तीनसदस्यीय मध्यस्थता समितीचे गठण केले. या समितीत अध्यक्ष न्यायमूर्ती खलीफ उल्ला, श्री श्री रविशंकर आणि ज्येष्ठ वकील श्रीराम पंचू यांचा समावेश करण्यात आला.

* नोव्हेंबर 2019 : हिंदूंच्या पक्षात निर्णय
(Decision in favor of Hindus in November 2019)
सर्वोच्च न्यायालयाच्या संवैधानिक पीठाने नोव्हेंबर 2019 मध्ये हिंदूंच्या पक्षात निर्णय सुनावला आणि संपूर्ण वादग्रस्त जमीन सोपवली. सोबतच मुस्लिम पक्षाला वादग्रस्त जागेपासून दूर पाच एकर जमीन मशीद उभारण्यासाठी देण्याचाही निर्णय देण्यात आला. 

* इ. स. 2020 : श्री राम मंदिर भूमिपूजन
(Shri Ram Mandir Bhoomi Poojan In 2020)
देशाचे पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते दिनांक 5 ऑगस्ट 2020 रोजी भव्य दिव्य श्रीराम मंदिराचे भूमिपूजन झाले. या सोहळ्यास श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टतर्फे पंतप्रधान श्री. मोदी यांच्यासह १७५ जणांना सोहळ्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. 
****
अयोध्या नगरीत येत्या 22 जानेवारी 2024 रोजी या देखण्या मंदिरात भगवान श्रीराम यांची आकर्षक मूर्ती रत्नजडित सुवर्ण सिंहासनावर विराजमान (consecration ceremony of the grand Ram Temple in Ayodhya | January 22, 2024)  होणार आहे. त्यानंतर हे सुंदर श्रीराम मंदिर भाविक भक्तांसाठी खुले करण्यात येणार आहे.
| जय सियाराम | जय सियाराम |
आपले मनःपूर्वक धन्यवाद...! 
------------------------

Previous Post Next Post