अयोध्या राममंदिराला असेल 400 किलोचे कुलूप आणि 8 फुटांचे सुवर्ण सिंहासन ! असे असेल अयोध्या नगरीत राम मंदिर!
| Interesting Facts Of Ayodhya Ram Mandir | Info About Ayodhya Ram Mandir | Amezing Story Of Ram Mandir Ayodhya | Trending Topic | Ayodhya Ram Temple |
***
श्री रामचन्द्र कृपालु भजुमन
हरण भवभय दारुणं।
नव कंज लोचन कंज मुख
कर कंज पद कंजारुणं ॥
|| श्रीराम जय राम जय जय राम ||
मित्र - मैत्रिणींनो, नमस्कार.
श्री अयोध्याजी येथे सुरू भव्य श्रीराम मंदिराचे निर्माण कार्य अतिशय वेगवान पद्धतीने सुरू आहे. आज आपण येथे याच भव्य श्रीराम मंदिराची काही अद्भुत वैशिष्ट्ये (Amezing Facts Of Shri Ram Mandir Ayodhya) जाणून घेणार आहोत. भगवान श्रीरामचंद्र यांचा जन्म अयोध्या नगरीचे राजे श्री दशरथ यांच्या घरी श्री विष्णु यांच्या सातव्या अवताराच्या रुपात त्रेतायुगात झाला. दरवर्षी संपूर्ण भारत देशात श्रीराम जन्मोत्सव चैत्र शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला साजरा केला जातो. याच तिथीला श्री राम नवमी म्हणतात. भगवान श्रीराम हे भारतीय संस्कृतीत आदर्श मानले जातात. संपूर्ण विश्वाचे पालनहार, मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीराम यांच्या अयोध्या येथील भव्यदिव्य मनोहारी मंदिराचे निर्माण कार्य आता अंतिम टप्प्यात आले आहे. सन 1528 ते 2019 या मोठ्या कालावधीच्या प्रदीर्घ संघर्षानंतर अयोध्येत हे श्रीराम मंदिर बांधले जात आहे. जगभरातील रामभक्तांना आता उत्सुकता लागली आहे भगवान श्रीराम यांच्या दिव्य दर्शनाची. अयोध्या नगरीत मंदिराचे निर्माण कार्य सुरू असले तरी हे भव्य दिव्य श्रीरामधाम कसे असेल, याबाबत सामान्य जनतेच्या मनात कुतूहल आहे. (Ayodhya Ram Mandir Opening Date) यापूर्वी जाहीर झालेल्या नियोजित तारखेनुसार येत्या 22 जानेवारी 2024 ला दुपारी साडेबारा वाजता अयोध्या येथील भव्य दिव्य मंदिरात श्रीराम लल्ला यांच्या विलोभनीय मूर्तीची प्रतिष्ठापना (Consecration Ceremony Of The Grand Shri Ram Temple In Ayodhya) आहे. या दिवसापासून सामान्य रामभक्तांसाठी हे श्रीराम धाम खुले असेल.
--------
| Interesting Facts Of Ayodhya Ram Mandir | Info About Ayodhya Ram Mandir | Do You Know |
* 8 फुटांचे भव्य रत्नजडित सुवर्ण सिंहासन !
(8 Feet Huge Suvarna Singhasana)
या भव्यदिव्य अशा श्रीराम मंदिरामध्ये भगवान श्रीराम यांची विलोभनीय मूर्ती ज्या सुवर्ण सिंहासनावर विराजमान होणार आहे, ते 8 फूट उंच, 3 फूट लांब आणि 4 फूट रुंद एवढे अवाढव्य असेल. राजस्थान (Rajathan) येथील कुशल कारागिरांनी त्याची निर्मिती केली आहे.
* जगातील सर्वात भव्य कुलूप
(Biggest Lock In World For Ayodhya Ram Mandir)
उत्तर प्रदेशातील अयोध्या श्रीराम मंदिरासाठी
अलीगड येथील एका रामभक्ताने 400 किलो वजनाचे अवाढव्य आणि दणकट कुलूप तयार केले आहे. या कुलुपाची उंची 10 फूट, लांबी 4.5 फूट, तर रुंदी 9.5 इंच आहे. सत्य प्रकाश शर्मा असे त्या रामभक्ताचे नाव होय.
* देशभरातील शिल्पकार, कलाकार आणि तज्ज्ञांची टीम कार्यरत
(Artists, Technician Team Working From All Over India)
अयोध्या नगरीत राम मंदिराच्या (Ram Temple In Ayodhya) निर्माण कार्यात संपूर्ण देशभरातून आलेले कलाकार, शिल्पकार, तज्ज्ञ लोकांची टीम गेल्या तीन वर्षांपासून दिवसरात्र परिश्रम घेत आहे.
* राजस्थान येथील गुलाबी दगडांचा सुरेख वापर
(Use Of Lovely Pink Stones From Rajsthan)
राजस्थान येथील गुलाबी रंगाच्या दगडांचा वापर या मंदिरासाठी केला जातो आहे. हे दगड राजस्थानच्या भरतपूरमधील बन्सी पहारपूर येथून आणले आहेत. निष्णात शिल्पकारांनी विविध शिल्पाकृती या दगडातून साकारल्या आहेत.
* कन्याकुमारी, ओडिशा येथील कलाकार करीत आहेत कुशल कोरीव काम
(Artists Working From Odisha, Kanyakumari And Hyderabad)
भगवान श्रीराम मंदिराचे विविध दरवाजे आणि खिडक्यांचे कोरीव काम कन्याकुमारी येथील प्रवीण कलाकारांनी केले आहे. हैदराबाद येथील कलाकारांच्या उत्कृष्ट कलेतून लाकडी दरवाजे साकारले जात आहेत. हे लाकूड महाराष्ट्रातून मागवले गेले आहे. दगडातून मूर्ती बनवण्याचे काम ओडिशातील कारागीर करत आहेत.
* दक्षिणेकडील राज्यांतून आले आहे स्टील
(Steel From Telangana And Karnataka For Ayodhya Shri Ram Mandir)
भव्य दिव्य श्रीराम मंदिराच्या उभारणीसाठी लागणारे स्टील कर्नाटक आणि तेलंगणा येथून मागवण्यात आले आहे.
* बालरूपात भगवान श्रीराम लल्ला यांची विलोभनीय मूर्ती
(Attractive Idol Of Bhagvan Ram As Ram Lalla)
भव्य दिव्य श्रीराम मंदिराच्या (Shri Ram Temple In Ayodhya) गर्भगृहात भगवान श्रीरामाची बाल रूपातील मूर्ती स्थापित करण्यात येणार आहे. राम लल्लाची ही मूर्ती अतिशय विलोभनीय आणि आकर्षक आहे.
* भगवान श्रीराम यांची भव्य मूर्ती
(Big Idol Of Bhagvan Shri Ram)
अयोध्या नगरीत होत असलेल्या श्रीराम मंदिरात नेपाळ येथून आणलेल्या प्राचीन दगडापासून भव्य श्रीराम मूर्ती साकारण्यात येत आहे.
* दगडांचे सौंदर्य वाढवण्यासाठी विशिष्ट रसायनांचा वापर
(Specific Chemical Used For Stones)
श्रीराम मंदिरात निर्माण कार्यासाठी वापरण्यात येणाऱ्या दगडांवर रासायनिक प्रक्रिया केली आहे. त्यामुळे या दगडांचे सौंदर्य आणि टिकाऊपणा वाढेल, तसेच पुढील कित्येक वर्षे कुठल्याही दुरुस्तीची गरज भासणार नाही.
----------
संपूर्ण देशवासीयांना अभिमान वाटावा असे भव्य दिव्य श्रीराम मंदिर अयोध्या नगरीत साकार होत आहे. या मंदिराला प्रत्येक भक्ताने आयुष्यात एकदा तरी भेट द्यायलाच हवी. जगात सर्वोत्तम, सर्वोत्कृष्ट आणि सर्वाधिक भव्य असे हे श्री राम मंदिर असेल. या मंदिराची थोडक्यात माहिती (Short Information About Ayodhya Shri Ram Mandir) देत आहोत.
* असे असेल अयोध्या नगरीतील भगवान श्री राम यांचे भव्य दिव्य मंदिर
(Shri Ram Janmbhoomi Teerth Kshetra At Ayodhya)
* श्री राम मंदिराचे एकूण क्षेत्र : 2.7 एकर
* एकूण बांधकाम झालेले क्षेत्र : 57,400 चौरस फूट
* श्री राम मंदिराची एकूण लांबी : 360 फूट
* श्री राम मंदिराची एकूण रुंदी : 235 फूट
* वरील शिखरासह राम मंदिराची एकूण उंची : १६१ फूट
* श्रीराम मंदिराच्या एकूण मजल्यांची संख्या : 3 मजले
* प्रत्येक मजल्याची एकूण उंची : 20 फूट
* राम मंदिराच्या तळमजल्यावरील एकूण स्तंभांची संख्या :160
* राम मंदिराच्या पहिल्या मजल्यावरील एकूण स्तंभ :132
* राम मंदिराच्या दुसऱ्या मजल्यावरील एकूण स्तंभ : 74
* श्री राम मंदिरातील पादुकांची आणि मंडपांची संख्या : 5
* श्रीराम मंदिराला असणारी प्रवेशद्वारे : 12
* श्री राम मंदिर निर्माण कार्यासाठी एकूण खर्च : 1700 ते 1800 कोटी रुपये
---------------
मित्र-मैत्रिणींनो, या लेखातील मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीराम यांच्या अयोध्या येथील भव्य दिव्य मंदिराची माहिती (Amezing Facts And Information About Ayodhya Shri Ram Mandir) आपल्याला आवडल्यास इतरांमध्ये अवश्य शेअर करा.
आपले मनःपूर्वक धन्यवाद....!
|| राम || || राम || || राम || || राम ||
-----------------