शारदीय नवरात्री उत्सव
साजरा करा भक्तिभावाने !
(Sharadiya Navratri Festival)
संपूर्ण माहिती, श्री दुर्गा श्लोक आणि शुभकारक मंत्र, अष्टलक्ष्मी रूपांची माहिती
सर्व भाविक-भक्तांना नवरात्री उत्सवाच्या भक्तिमय शुभेच्छा !
मित्र -मैत्रिणींनो, सध्या ऑक्टोबर हिटचा त्रास जाणवत असला तरी, लवकरच आपण गोड गुलाबी थंडीचा सुखद अनुभव घेणार आहोत. गणेश उत्सव संपला की सगळ्यांनाच प्रतीक्षा असते नवरात्री उत्सवाची. स्त्री शक्तीचा अगाध महिमा सांगणारा हा उत्सव. उत्सव शक्तीचा, उत्सव मनात असलेल्या अपार भक्तीचा. नऊ दिवस सतत मनात उमेदीची एक नवी ज्योत प्रज्वलित करणारा हा उत्सव सर्वांचा लाडका आहे. संपूर्ण विश्वाचा सांभाळ करणाऱ्या जगतजननी सर्वव्यापी आदिमाया आदिशक्ती (Adishakti) अंबाबाईचा हा उत्सव.
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी, कोल्हापूरची माता महालक्ष्मी, माहूरगड निवासिनी आई रेणुका, वणीची माता सप्तशृंगी, अंबाजोगाईची आई योगेश्वरी अशा किती तरी जागृत आणि जाज्वल्य शक्ति पीठांच्या (Shakti Peeth) पवित्र सानिध्याने आपली महाराष्ट्राची माती पावन झाली आहे. या सर्व आदिशक्तींना साष्टांग नमन. या लेखात आपण माहिती घेणार आहोत, नवरात्री उत्सवाची (Durga Utsav), घटस्थापना Ghatsthapana विधी, घटस्थापनेचा मुहूर्त (Muhurtas), घटस्थापनेची पद्धत, नवरात्री उत्सव शुभेच्छा संदेश (Navratri Festival Wishes), नवरात्री श्लोक आणि प्रभावी मंत्र (Navratri Shlokas And Mantra), माता महालक्ष्मीची आठ रूपे (Ashtlakshmi), देवीच्या सुंदर आरती (Devi Aarati) याविषयी.
* नवरात्रीचे विविध प्रकार | Types Of Navratri
संपूर्ण वर्षभरात जसे अनेक उत्सव (Festival) येतात, तसेच आई जगदंबेच्या उपासनेसाठी, आराधनेसाठी आपल्या धर्म परंपरेत नवरात्री उत्सव सांगितले आहेत. मराठी पंचांग (Panchang) यानुसार आश्विन महिन्यात येणारा नवरात्री उत्सव त्यात प्रमुख मानला जातो. यालाच शारदीय नवरात्र उत्सव (Shardiya Navratri Festival) असेही म्हणतात. यावर्षी आश्विन महिन्यात शुक्ल पक्षात येणारी प्रतिपदा तिथी १४ ऑक्टोबरला रात्री ११ वाजून २४ मिनिटांनी सुरू होत आहे. त्यामुळे नवरात्री उत्सवाचा प्रारंभ रविवार, दि. १५ ऑक्टोबरपासून होत आहे. या दिवशी सुरू झालेला शारदीय नवरात्र उत्सव (Shardiya Navratri Festival) मंगळवार, दि. २४ ऑक्टोबरपर्यंत आहे. याच दिवशी साडेतीन मुहूर्तांपैकी एक पूर्ण मुहूर्त असलेला दिवस येतोय, तो म्हणजे दसरा (Dashahara) अर्थात विजया दशमी (Vijaya Dashami). हा एक संपूर्ण वर्षातील सर्वात शुभ दिवस (Shubh Muhurt) मानला जातो. वर्षात येणाऱ्या नवरात्रीचे प्रकार असे आहेत.
अ. चैत्र नवरात्री २०२३ : इंग्रजी कॅलेंडर (Calender) नुसार साधारण एप्रिल महिन्यात चैत्र महिना येतो. या काळात वसंत ऋतू आलेला असतो. या दरम्यान होणाऱ्या नवरात्री उत्सवाला चैत्र नवरात्री म्हणतात.
ब. शारदीय नवरात्री २०२३ : निसर्ग चक्रात जेव्हा शरद ऋतूचे आगमन होते, तेव्हा म्हणजेच मराठी पंचांग (Panchang) यानुसार आश्विन महिन्यात म्हणजेच सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये येणाऱ्या नवरात्री उत्सवास शारदीय नवरात्री उत्सव (Shardiya Navratri Festival) म्हणतात.
क. माघ नवरात्री २०२३ : साधारण जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात माघ नवरात्री उत्सव साजरा केला जातो. याच काळात वसंत पंचमीचा (Vasant Panchami) उत्सव येतो. विद्येची देवता शुभ्र वस्त्रे परिधान केलेली, जिच्या हाती वीणा आणि पुस्तक आहे, अशा बुद्धिदायिनी माता सरस्वतीचे पूजन या दिवशी केले जाते.
ड. आषाढ नवरात्री : साधारण जून किंवा जुलैमध्ये पावसाळ्यात म्हणजेच आषाढ महिन्यात येणाऱ्या या नवरात्री उत्सवास आषाढ नवरात्री म्हणतात.
* नवदुर्गा उपासनेसाठी नवरात्री श्लोक आणि प्रभावी मंत्र | (Navratri Shlokas And Mantra)
|| सर्व मंगल मांगल्ये ||
सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके।
शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणि नमोस्तुते॥
***
(Navratri Shlokas And Mantra)
|| श्री महालक्ष्मी अष्टक ||
॥ श्री गणेशाय नमः॥
नमस्तेस्तु महामाये श्रीपिठे सूरपुजिते ।
शंख चक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमोस्तुते ॥१॥
नमस्ते गरूडारूढे कोलासूर भयंकरी ।
सर्व पाप हरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते ॥२॥
सर्वज्ञे सर्ववरदे सर्वदुष्ट भयंकरी ।
सर्व दुःख हरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते ॥३॥
सिद्धी बुध्दी प्रदे देवी भुक्तिमुक्ति प्रदायिनी ।
मंत्रमूर्ते सदा देवी महालक्ष्मी नमोस्तुते ॥ ४ ॥
आद्यंतरहिते देवी आद्यशक्ती महेश्वरी ।
योगजे योगसंभूते महालक्ष्मी नमोस्तुते ॥ ५ ॥
स्थूल सूक्ष्म महारौद्रे महाशक्ती महोदरे ।
महापाप हरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते ॥ ६ ॥
पद्मासनस्थिते देवी परब्रम्हस्वरूपिणी ।
परमेशि जगन्मातर्र महालक्ष्मी नमोस्तुते ॥७॥
श्वेतांबरधरे देवी नानालंकार भूषिते ।
जगत्स्थिते जगन्मार्त महालक्ष्मी नमोस्तुते ॥८॥
महालक्ष्म्यष्टकस्तोत्रं यः पठेत् भक्तिमान्नरः ।
सर्वसिद्धीमवाप्नोति राज्यं प्राप्नोति सर्वदा ॥९॥
एककाले पठेन्नित्यं महापापविनाशनं ।
द्विकालं यः पठेन्नित्यं धनधान्य समन्वितः ॥१०॥
त्रिकालं यः पठेन्नित्यं महाशत्रूविनाशनं ।
महालक्ष्मीर्भवेन्नित्यं प्रसन्ना वरदा शुभा ॥११॥
***
(Navratri Shlokas And Mantra)
|| या देवी सर्वभूतेषु ||
या देवी सर्वभूतेषु दया रूपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥
***
या देवी सर्वभूतेषु मातृ रूपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥
***
या देवी सर्वभूतेषु शक्ति-रूपेण संस्थिता। नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥
***
(Navratri Shlokas And Mantra)
|| आई रेणुकेची प्रार्थना ||
|| अंबे एक करी उदास न करी ||
अंबे एक करी उदास न करी भक्तासी हाती धरी ।
विघ्ने दूर करी स्वधर्म उदरी दारिद्र्य माझे हरी ।।
चित्ती मूर्ति बरी वरा भयकरी ध्यातो तुला अंतरी ।।
वाचा शुध्द करी विलंब न करी पावे त्वरे सुंदरी ।।१।।
माते एकवीरे वरा भय करे दे तू दया सागरे ।
माझा हेतु पूरे मनात न उरे संदेह माझा हरे ।।
जेणे दुःख सरे कुबुद्धि विसरे ब्रह्मैक्यधी संचरे ।
देई पूर्णकरे भवांबुधि तरे ऐसे करावे त्वरे ।।२ ।।
अनाथासी अंबे नको विसरू वो ।
भवसागरी सांग कैसा तरू वो ।
अन्यायी मी हे तूझे लेकरू वो |
नको रेणुके दैन्य माझी करू वो ।।३ ।।
मुक्ताफले कुंकुम पाटलांगी |
सन्ध्येव तारानिकरे विभाती ।
श्रीमूळपीठा चल चूडिकाया ।
तामेंकवीरा शरणं प्रपद्ये ।।४ ।।
सखे दुःखिताला नको दुखवू वो ।
दीना बालकाते नको मोकलू वो ।
ब्रीदा रक्षि तू आपुल्या श्री भवानी ।
ही प्रार्थना ऐकुनि कैवल्यदानी ।।५।।
***
(Navratri Shlokas And Mantra)
|| श्री रेणुका अष्टक ||
जय परात्परे पूर्ण चिन्मये ॥
भगवती महा मंगलायीने ॥
आद्य ईश्वरी विश्वव्यापिके ॥
शरण तुज मी पाव रेणुके ॥१॥
दीनवत्सले पाय दाखवी।
त्रिपुर भैरवी या भवार्न्नवि॥
निववी ताप तू आनंददायिके ।
शरण तुज मी पाव रेणुके ।।२।।
परममूमु मी जाण निश्चय ॥
दुढ मला शिवे नामय ही जय ॥
प्रगट व्हावया ज्ञान दीपिके ॥
शरण तुज मी माय रेणुके ।।३।।
प्रपंचकारणी टाकले मला ॥
मार्ग चुकलो ध्यास असे तुझा ॥
तुझ कृपेविने भय कसे चुके ॥
शरण तुज मी पाव रेणुके ॥४॥
विषय जाहले हे चहुकडे असे ॥
काम क्रोध हे व्याघ्र गर्जती ॥
रक्षी संकटी भ्रांतिनाशिके ॥
शरण तुज मी पाव रेणुके।।५।।
आश्रय नसे आणि का जनी ॥
बालकासी का टाकले वनी ॥
धाव घे कडे माय रेणुके ॥
शरण तुज मी पाव रेणुके।।६।।
हेची मागणे माझी या मनी ॥
हृदय ग्रंथीके छेद योगिनी ॥
नुपेक्षी कदा भक्तपोशिके ॥
शरण तुज मी पाव रेणुके।।७।।
श्री दयानिधे त्रिपुरसुंदरी ॥
सर्वसाक्षी तू भेट लवकरी ॥
गोसावी नंदन विनवी चंडिके ॥
शरण तुज मी पाव रेणुके।।८॥
***
महालक्ष्मी मातेची आठ रूपे तुम्हाला माहीत आहेत का?
(Astlakshmi - Ashtlakshmi)
नवरात्र उत्सवात आई जगदंबेचे विविध रूपात पूजन केले जाते. संपूर्ण विश्वाचे पालन पोषण करणारी, भक्तांचे रक्षण करणारी जगत जननी आई जगदंबेची तीन रूपे प्रमुख आहेत - माता महालक्ष्मी, माता महासरस्वती आणि महाकाली. आपल्या लाडक्या भक्ताला धनसंपत्ती, यश, समृद्धी, कीर्ती आणि ऐश्वर्य प्रदान करणारी महालक्ष्मीची आठ रूपे कोणती, हे पाहुयात.
* आदिलक्ष्मी
मातेचे हे रूप म्हणजे आपल्या मूल स्त्रोताचे स्मरण होय. आदिलक्ष्मी हे रूप आपणास आपल्या मूल स्त्रोताशी संलग्न करते. या रूपाची उपासना केल्याने मनात आत्मविश्वास, सामर्थ्य आणि शांती निर्माण होते.
* धनलक्ष्मी
भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करणारे हे रूप आहे. माता धनलक्ष्मीच्या आशीर्वादाने घरात, कुटुंबात सदैव ऐश्वर्य आणि सुख नांदते. हे रूप धन संपत्तीच्या रूपात प्रकट होते.
* विद्यालक्ष्मी
सर्व प्रकारच्या विद्या आणि असीम बुध्दीचे वरदान देणारे हे रूप आहे. अभ्यासात यश आणि मानसिक सामर्थ्य वाढण्यासाठी माता विद्यालक्ष्मी भक्तांना सर्वतोपरी सहाय्य करते. लक्ष्मीचे हे रूप विद्या आणि बुध्दीत सामावले आहे.
* धान्यलक्ष्मी
घरात धनधान्याचे कायमस्वरूपी भांडार हे या लक्ष्मीचे रूप होय. माता भक्तांच्या सर्व इच्छा साकार करते.
* संतानलक्ष्मी
मातेचे हे रूप प्रजनन क्षमता, सर्जनशीलता आणि निर्मिती क्षमतेमध्ये प्रकट होते. ज्या व्यक्ती सर्जनशील आणि कलाकौशल्य यांनी परिपूर्ण असतात त्यांच्यावर लक्ष्मीच्या या रुपाची कृपा असते.
* धैर्यलक्ष्मी
हिंमत, आत्मविश्वास आणि मानसिक बळ पुरविणारी माता शौर्य, धैर्य आणि निर्भयता या रुपामध्ये प्रकट होते.
* विजयलक्ष्मी
साहस, पराक्रम गाजवून मिळविलेला विजय, या रुपामध्ये माता प्रकट होते.
* भाग्यलक्ष्मी
सौभाग्य आणि समृद्धीच्या रुपामध्ये माता प्रकट होते.
***
यंदाचा नवरात्री उत्सव (Navratri Festival) तुमच्या जीवनात सुखशांती, समृद्धी, समाधान आणि ऐश्वर्य घेऊन येवो, हीच आई रेणुका मातेच्या चरणी प्रार्थना. आपणास आणि आपल्या कुटुंबास शारदीय नवरात्र उत्सवाच्या (Shardiya Navratri Festival) मंगलमय शुभेच्छा. आपणास हा लेख आवडल्यास आपल्या मित्र परिवारात नक्की शेअर करा. धन्यवाद !
जय माता दी (Jay Mata Di)