हे आहेत नवरात्री उत्सव - 2023 चे नऊ दिवसांचे रंग (Colours Of Navratri 2023)

नवरात्री उत्सव - 2023
हे आहेत नऊ दिवसांचे रंग! 
(Colours Of Navratri Festival Days) 

* येत आहे उत्सव भक्तीचा, 
उत्सव स्त्री शक्तीचा ! 
(Navratri Festival 2023) 
-----
लाडक्या गणपती बाप्पाला जड अंतःकरणाने निरोप दिल्यानंतर भारतीय माणसाला वेध लागतात शक्तिदात्री आई जगदंबेच्या नवरात्री उत्सवाचे. पावसामुळे सगळीकडे हिरवाई पसरलेली असते. हवेत हलकासा गारवाही जाणवायला लागतो. साधारण सप्टेंबर संपून ऑक्टोबर महिना लागलेला असतो... आणि आपले मन प्रतीक्षा करीत असते उत्साह आणि उमेद प्रदान करणाऱ्या नवरात्री उत्सवाची (Navratri Festival 2023). या काळात शक्ती आणि भक्तीचा संगम समजला जाणारा नवरात्री उत्सव भाविक भक्तांच्या जीवनात आशेचे, सुखाचे आणि आनंदाचे रंग भरून जातो. आई तुळजा भवानीची आराधना करताना आपले मन हर्ष उल्हासाने भरून जाते. घरोघर घटस्थापना (Ghat Sthapana) होते. घरात आणि मंदिरांमध्ये घंटानाद, शंखनाद आणि टाळ्यांच्या गजरात सकाळ - संध्याकाळ दुर्गा मातेची पूजा आणि आरती केली जाते. सगळीकडे अगदी भक्तीचा सागर वाहत असतो. दुर्गा मातेच्या उपासनेत म्हटले जाणारे काही पवित्र श्लोक आणि मंत्र (Durga Shlokas And Mantra) येथे देत आहोत. 
सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके ।
शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणि नमोस्तुते ॥

(Navratri Mantra And Shlokas

या देवी सर्वभूतेषु दया रूपेण संस्थिता। 
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥ 

या देवी सर्वभूतेषु मातृ रूपेण संस्थिता। 
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥ 

या देवी सर्वभूतेषु शक्ति-रूपेण संस्थिता। नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥

(Celebration Of Navratri Festival) 

बेरंग से हमारे जीवन में
उमंग के रंग भरने आया 
आया देखो आया 
नवरात्रि का त्योहार आया ! 

मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का? नवरात्री उत्सव (Navratri Festival 2023) आणि रंगांचे एक अनोखे नाते आहे. नवरात्रीचा एक एक दिवस त्या त्या रंगांशी (Special Colours Of Navratri) जोडला गेला आहे. आपल्या रोजच्या व्यवहारात या रंगांना अनुसरूनच वेशभूषा करण्याचा, कपडे घालण्याचा एक वेगळाच आनंद अनुभवता येतो. या नवरात्र उत्सवात हे रंग शुभतेचे प्रतीक (Colours Of Navratri) समजले जातात. नवरात्रीत प्रतिपदेपासून ते दशमीपर्यंत वेगवेगळे रंग परिधान (Navratri Colourfull Sarees And Dresses) करण्याची एक प्रथा सध्या रूढ झाली आहे. फक्त महाराष्ट्रच नाही, तर गुजरात, आंध्र प्रदेश, तेलंगणा, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल (All Bharat) अशा अनेक राज्यातही महिला आणि पुरुष दोघेही ही रंगसंगती (Colours Of Navratri) जपताना दिसतात. दिवसभर ऑफिस, कामकाज, दर्शन, आरती, उपासना, आराधना, दांडिया, गरबा अशा प्रत्येक वेळी विशिष्ट रंगाचाच (Special Colours Of Navratri) वापर होत असतो. नवरात्री उत्सवाच्या प्रत्येक दिवशी महिला आणि पुरुषांना एकच प्रश्न पडतो, तो म्हणजे आजचा रंग कोणता? (Today Which Colour) त्यामुळे यंदाच्या 2023 च्या नवरात्री उत्सवात कोणते रंग (Colours Of Navratri) सांगितले आहेत, हे आता तुम्हाला सांगतो. ज्या दिवशी नवरात्री उत्सवाला प्रारंभ होतो, त्या दिवसाच्या रंगावर उरलेल्या दिवसांचे रंग (Colours Of Navratri) ठरतात. 

* दिवस पहिला - 15 ऑक्टोबर 
आजचा रंग - नारंगी (Orange) 
नवरात्रीच्या पहिल्या दिवसाचा म्हणजेच रविवार, 15 ऑक्टोबरचा रंग आहे नारंगी. या दिवशी नारंगी (Orange Colour) रंगाचे वस्त्र घालून देवीचे पूजन केले तर तुमच्यात उत्साह आणि Positive Energy निर्माण होईल. 

* दिवस दुसरा - 16 ऑक्टोबर
आजचा रंग - पांढरा (White)
सोमवार, 16 ऑक्टोबर - दुसऱ्या दिवशी येतो पांढरा रंग (White Colour), शुभ्र वस्त्रांचा. निर्मल आणि सहजभाव याचे प्रतीक आहे पांढरा रंग. या रंगातून मन:शांतीचा लाभ होतो. 

* दिवस तिसरा - 17 ऑक्टोबर
आजचा रंग - लाल (Red) 
मंगळवार, 17 ऑक्टोबर या दिवशी लाल तांबड्या रंगाचे (Red Colour) कपडे घालावेत. लाल रंग उत्साह, प्रेम आणि आनंद यांचे प्रतीक आहे. शक्ती या अर्थानेही लाल रंग ओळखला जातो. 

* दिवस चौथा - 18 ऑक्टोबर 
आजचा रंग - निळा (Blue)
बुधवार, 18 ऑक्टोबरच्या दिवशी गडद निळा रंग (Blue Colour) आहे. निळ्या रंगाची साडी, ड्रेस किंवा कुर्ता पायजमा घातला तर एक वेगळाच आनंद तुमच्या मनाला लाभेल. 

* दिवस पाचवा - 19 ऑक्टोबर 
आजचा रंग - पिवळा (Yellow)
गुरुवार, 19 ऑक्टोबरचा शुभ रंग आहे पिवळा (Yellow Colour). मनात एक नवी उमेद, नवा उत्साह भरणारा हा पिवळा रंग परिधान केला तर तुमचा उत्साह दिवसभर कायम राहील, हे नक्की. पिवळा रंग निरंतर ऊर्जेचे प्रतीक आहे. 

* दिवस सहावा - 20 ऑक्टोबर 
आजचा रंग - हिरवा (Green) 
शुक्रवार, 20 ऑक्टोबरला जोडला गेला आहे निसर्गाची समृद्धी प्रदान करणारा हरित रंग - हिरवा (Green Colour). हा रंग उत्पत्ती दर्शवतो. मनात प्रगती आणि शांतीची भावना निर्माण करतो. 

* दिवस सातवा - 21 ऑक्टोबर 
आजचा रंग - Grey (राखाडी) 
शनिवार, 21 ऑक्टोबर हा नवरात्री उत्सवाचा दिवस करड्या (Grey Colour) म्हणजेच राखाडी रंगाला समर्पित आहे. जीवनातील आचारविचारांचा समतोल, व्यवहार आणि भावना यांचे तारतम्य ओळखायला लावणारा हा करडा रंग. या दिवशी राखाडी रंगाचा पेहराव करण्यास सांगितले आहे. 

* दिवस आठवा - 22 ऑक्टोबर
आजचा रंग - जांभळा (Purple)
रविवार, 22 ऑक्टोबरला जांभळा (Purple Colour) कलर येतो आहे. माणसाच्या अलिशान, विलासी जीवनाला प्रदर्शित करणारा हा रंग खरोखर मन मोहून घेणारा आहे. या दिवशी जांभळ्या रंगाची वस्त्रे परिधान केली तर सुखसमृद्धी आणि आई भवानीचा कृपा आशीर्वाद (Blessings) लाभेल, असे सांगितले जाते. 

* दिवस नववा - 23 ऑक्टोबर
आजचा रंग - मयूरपंखी
(Pecock Blue)
सोमवार, 23 ऑक्टोबर या दिवशी भाविक-भक्तांनी मयूरपंखी (Pecock Blue Colour) कलर परिधान करावा. जीवनात सुखसमृद्धी आणि नावीन्य प्रदान करणारा हा आकर्षक रंग आहे. 
काय तर मग, ठरलं ना, यंदाच्या नवरात्री उत्सवात (Navratri Festival Durga Puja) आई जगदंबेच्या उपासनेला रंगांची (Coulors) अनोखी जोड देऊ आणि शक्ती - भक्तीच्या या उत्सवात आपणही एका नव्या आनंदाने, उत्साहाने सहभागी होऊया. आपणा सर्वांना नवरात्री उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा...! (Happy Navratri, Shubh Navratri) 
--------
© संदीप प्रभाकर कुलकर्णी, छत्रपती संभाजीनगर.
Previous Post Next Post