गणेश भक्तांच्या नवसाला पावणारा
माझा बाप्पा मुंबईचा श्री लालबागचा राजा
(Maza Ladka Lalbagcha Raja - Article On Ganesh Festival Lalbagcha Raja Mumbai)
***
सर्व गणेश भक्तांना नमस्कार.
महाराष्ट्राचा, मराठी मनाचा गणेश उत्सव म्हटलं की डोळ्यांपुढे चित्र उभं राहतं ते वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ असलेल्या आपल्या सर्वांच्या लाडक्या मुंबईच्या लालबागच्या राजाचं. खऱ्या अर्थानं महाकाय असलेली लालबागच्या राजाची मूर्ती, लालबागच्या राजाचा फोटो डोळ्यांसमोरून हटता हटत नाही. एकदा दर्शनाला गेलेला भाविक, गणेशभक्त पुढच्या वर्षीही न चुकता गणेश उत्सवात लालबागच्या राजाच्या भेटीला जातो म्हणजे जातोच. Online Darshan तरी हमखास घेतोच. सध्या सगळीकडे गणेश उत्सव मोठ्या थाटात, उत्साहात आणि जल्लोषात सुरू आहे. मुंबईच्या परळ भागातील लालबागच्या राजाचा दरबार भाविक भक्तांच्या तुडुंब गर्दीने अगदी ओसंडून वाहतो आहे. चरण स्पर्श दर्शन नाही झाले तरी ठीक, किमान मुखदर्शन तरी व्हावे, या आशेने गणेश भक्तांनी पाऊले मुंबईच्या दिशेने वेगवान झाली आहेत. बस, कार, रेल्वे, बोट, होडी, जहाज, विमान... ज्यातून शक्य आहे, त्यावर स्वार होऊन गणेश भक्त मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. सर्व गणेश भक्तांचे ध्येय एकच... लक्ष्य एकच... ते म्हणजे श्री लालबागचा राजा दर्शन. lalbagcha raja darshan.
* नवसाला पावणारा गणपती बाप्पा bappa
भक्तांच्या हाकेला धावून जाणारा, भक्तांचे मनोरथ पूर्ण करणारा, मनातली इच्छा ओळखणारा, ती साकार करणारा आपल्या सर्वांचा लाडका navasala pavnara लालबागचा राजा फक्त देशातच नाही, तर विदेशातही गणेश भक्तांच्या मनात निरंतर विराजमान आहे. त्यामुळेच गणेश उत्सवाच्या दहा दिवसात Shri Ganesh Festival मध्ये वेळात वेळ काढून देश - विदेशातील भक्त लालबागच्या राजाच्या भेटीला आवर्जून येतात. आपल्या मनातल्या इच्छा राजासमोर मांडतात आणि हा सुखकर्ता, दुःखहर्ता भक्तांच्या इच्छा पूर्ण करतो. नवसाला पावणारा गणपती बाप्पा ganapati bappa अशी लालबागच्या राजाची कीर्ती देश-विदेशात पसरली आहे. महाराष्ट्रात मुंबईतील सर्वात लोकप्रिय गणेश मंडळ Lalbaugcha Raja लालबागचा राजा गणेश मंडळ. दरवर्षी लाखो भाविक लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी येतात. यात सर्वसामान्य भाविक भक्त तर असतातच, इतकंच नव्हे तर अनेक actors , सिनेमा कलाकार, स्टार्स star सेलिब्रेटीज, पॉलिटिकल व्यक्ती, लोकप्रतिनिधी, कॉर्पोरेट जगत आणि उद्योग Business क्षेत्रातील दिग्गजही लालबागच्या राजाच्या चरणी नतमस्तक होतात. दरवर्षी निराळी थीम घेऊन लालबागच्या राजाची सजावट केली जाते. अतिशय विशाल, भव्य मंडप, लायटिंग, शिस्तबध्द दर्शन रांगा, कडेकोट पोलीस बंदोबस्त Police अशा सगळ्या थाटामाटात गणरायाची मूर्ती Murti येथे विराजमान असते.
* मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का,
लालबागचा राजाची स्थापना केव्हा झाली?
आजपासून 89 वर्षांपूर्वी म्हणजेच देश स्वतंत्र होण्याअगोदर 1934 मध्ये लालबागच्या राजाची स्थापना करण्यात आली. मुंबई आणि आसपासच्या व्यापाऱ्यांनी, कोळी बांधवांनी सध्या जिथे लालबागच्या राजाची स्थापना केली जाते तिथे कायमस्वरूपी बाजार निर्माण व्हावा, असा नवस बोलून दाखवला होता. कोळी बांधवांनी मागितलेला हा नवस पूर्ण झाला आणि पेरुचाळ येथे उघड्यावर भरणारा बाजार 1932 मध्ये बंद होऊन तिथे व्यापारी बांधवांच्या सुविधेसाठी कायमस्वरूपी बाजार बांधण्यात आला.
* लालबागच्या राजाची पहिली मूर्ती कशी होती, तुम्हाला माहीत आहे का?
लालबागचा राजा गणेश उत्सवाचा Ganesh Festival प्रारंभ 1934 मध्ये झाला. कोळी Koli बांधवांचा लाडका बाप्पा आल्याने लालबागच्या राजाची पहिली मूर्ती होडी वल्हवणाऱ्या नाविकाच्या रूपातील होती. रुबाबदार दर्यासारंग आपली होडी घेऊन निघाला आहे, अशा थाटातील ही मूर्ती खूपच आकर्षक आणि सुंदर होती. आणि तेव्हापासूनच `नवसाला पावणारा लालबागचा राजा' म्हणून या गणपती बाप्पाची मूर्ती प्रसिद्ध झाली. कोळी बांधवांच्या नवसाला पावलेला गणपती navasala pavnara ganapati म्हणून हा गणपती सर्वप्रथम प्रसिद्ध झाला.
आजही आपण जेव्हा लालबागच्या राजाचे दर्शन घेऊन बाहेर पडतो, तेव्हा या बाजारातूनच आपली Exit होत असते. यंदाचे 2023 हे लालबागचा राजा गणेश उत्सवाचे 90 वे वर्ष Year आहे.
* लालबागच्या राजासाठी
यंदा शिवराज्याभिषेकाची सजावट
देशातच नाही, तर विदेशातही लोकप्रिय असलेल्या लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी यंदा 2023 मध्ये लाखो भाविकांची गर्दी होत आहे. लाखो रुपयांची देणगी भाविक भक्त लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण करीत आहेत. लालबागच्या राजाची एक झलक मिळवण्यासाठी गणेशभक्त दिवस दिवस रांगेत उभे आहेत. लालबागचा राजाचे यंदाचे 90 वे वर्ष आहे. यावर्षी गणेश उत्सवासाठी शिवराज्याभिषेकाची थीम Theme ठेवली आहे. अगदी तशाच पद्धतीने लालबागचा राजाची मूर्ती Lalbagchya Rajachi Murti आणि इतर सजावट करण्यात आली आहे. यंदाची लालबागच्या राजाची मूर्ती त्यामुळेच आणखी मनमोहक दिसत आहे. देवा ढळू दे माझे मी पण, तुझ्या दर्शने उजळ उजलो जीवन, अशीच आर्त हाक घेऊन गणेश भक्त लालबागच्या राजाला भेटायला येत आहेत.
* कोळी बांधवांचा लाडका लालबागचा राजा!
दरवर्षीच्या गणेश उत्सवात लाखो भक्तांच्या हाकेला धावून जाणारा संकटविनाशक, bappa विघ्नहर्ता, सुखकर्ता, चिंतामणी, गणनायक लालबागचा राजा आपले वेगळेपण भक्तांच्या मनात रुजवून जातो. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या... अशा जयघोषात लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक Visarjan Miravnuk हा एक नयनरम्य सोहळाच असतो. ही शान कोणाची... लालबागच्या राजाची...!!! ही घोषणा सार्थ ठरवणारी अशी ही विसर्जन मिरवणूक संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेणारी असते. भारतवर्ष, तसेच देश-विदेशातील गणेश भक्तांना दर्शन Darshan देऊन अखेर अनंत चतुर्दशीच्या दिवशी बाप्पाला निरोप देण्याची वेळ जेव्हा येते, तेव्हा अनेक भक्तांचे डोळे पाणावतात. मोठ्या जड अंतःकरणाने पण तरीही जल्लोष भरल्या वातावरणात लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक Visarjan Miravnuk निघते. दक्षिण मुंबईच्या परळ Parel भागातील लालबाग मार्केटमधून लाडक्या लालबागच्या राजाची मिरवणूक बँड, लेझिम आणि ढोलताशांच्या Dhol Tasha गजरात अगदी राजेशाही थाटात निघते.
* श्रद्धापूर्वक कोळी नृत्याची परंपरा
मिरवणुकीचा मार्ग भक्तांच्या अलोट गर्दीने खचाखच भरलेला असतो. एकदा तरी दुरून का असेना, लालबागच्या राजाचे दर्शन व्हावे म्हणून गणेशभक्त रस्तोरस्ती स्वागतासाठी उभे असतात. भक्तांचा जणू काही सागरच असतो. प्रत्येक रस्त्यावर Street, चौकात, प्रत्येक भागात भव्य, अवाढव्य पुष्पहाराने लालबागच्या राजाचे स्वागत Lalbagchya Rajache Swagat करण्यात येते. जागोजागी भाविकांकडून पुष्पवृष्टी केली जाते. ही विसर्जन मिरवणूक लालबाग, भारतमाता सिनेमा, साने गुरुजी मार्ग, भायखळा रेल्वेस्टेशन, क्लेअर रोड, नागपाडा, डंकन रोड, दोन टाकी, संत सेना महाराज मार्ग (कुंभारवाडा), सुतार गल्ली, माधवबाग, सी.पी. टँक, व्ही. पी. रोड, ऑपेरा हाऊस अशा मार्गाने संथ गतीने पुढे जात जात अखेर गिरगाव चौपाटीवर Girgaon Chaupati येते. तिथेही गणेशभक्त लालबागच्या राजाच्या प्रतीक्षेत उभे असतात. कोळी Koli बांधवांचे प्रमुख दैवत असल्याने लालबागच्या राजाला निरोप Bye bye देतेवेळी त्यांच्या उत्साहालाही दर्यासारखे उधाण आलेले असते. पारंपरिक नृत्य सादर करून कोळी महिला आणि बांधव लालबागच्या राजाला निरोप देतात. कोळी नृत्याची ही जुनी परंपरा आजही कोळी koli बांधवांनी तेवढ्याच श्रध्देने जपली आहे.
* माझा लाडका बाप्पा, लालबागचा राजा!
मित्रांनो, मरगळलेल्या मनात उत्साह, आनंद आणि चैतन्याचे वारे भरणारा, प्रत्येकाच्या जीवनात आशेचा एक किरण निर्माण करणारा, ताणतणाव आणि टेन्शन बाजूला सारून आनंदी क्षणांची भेट घडविणारा, अनेक स्तरात विभागल्या गेलेल्या आपल्या भारतीय समाजाला indian society एकत्र आणणारा, मनामनात एकतेची भावना unity जागृत करणारा हा दहा दिवसांचा गणेश उत्सव Shri Ganesh Festival. तुमचा माझा सर्वांचा. आपल्या लाडक्या गणरायाचा. सर्वांना गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा hardik shubhecha...! लालबागच्या राजाचा विजय असो! ही शान कोणाची, माझ्या लाडक्या लालबागच्या राजाची...!
धन्यवाद.
----
© संदीप प्रभाकर कुलकर्णी, छत्रपती संभाजीनगर (महाराष्ट्र)