MPSC परीक्षा 2024 / टाईम टेबल जाणून घ्या केव्हा आहेत परीक्षा-2024

MPSC परीक्षा 2024 टाईम टेबल 
स्पर्धा परीक्षांचे वेळापत्रक - 2024
| MPSC Exams In Year 2024 | 
****
मित्र - मैत्रिणींनो नमस्कार. 
जीवनाचं दुसरं नाव आहे संघर्ष - लढा. मनात ठरवलेली इच्छा पूर्ण करण्यासाठी घेतलेले अथक परिश्रम आणि प्रयत्न हाही याच संघर्षाचा भाग असतो. तुमच्यापैकी अनेकांनी भरपूर शिक्षण घेऊन आणि दिवसरात्र अभ्यास करून मनात एक स्वप्न पाहिलेलं असतं. होय, शासकीय अधिकारी होण्याचं. तुमच्यापैकी कोणाला पोलीस अधिकारी (PSI) व्हायचंय, तर कोणाला विक्री कर निरीक्षक (STI). कोणाला शासनाच्या महसूल खात्यात अधिकारी होण्याची इच्छा आहे, तर कोणाला न्याय व्यवस्थेत मोठे पद गाठायचे आहे. खूप जोरदार तयारी करा. अभ्यास करा. मग बघा, तुम्ही तुमच्या प्रयत्नात नक्कीच यशस्वी व्हाल. तुमच्या प्रयत्नांना यश लाभो, याच आमच्या सदिच्छा. येथे आम्ही तुमच्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (Maharashtra Public Service Commission) वतीने आगामी 2024 वर्षात (Competative Exam's In Year 2024) घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक (Tentative Time Table) घेऊन आलो आहोत. सर्व विद्यार्थी मित्रांना याचा नक्कीच उपयोग होईल. महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रित अधिकारी (Gazzated Officer) आणि अराजपत्रित अधिकारी (Non Gazzated Officer), तसेच वर्ग - 2 अधिकारी (Class 2 Officer) आणि वर्ग - 3 अधिकारी (Class 3 Officer) पदांच्या पूर्वपरीक्षा (Prelim Exam's) आणि मुख्य परीक्षा (Main Exam's) देणाऱ्या युवक युवतींना या अंदाजित वेळापत्रक (Tentative Time Table) चा फायदा होऊ शकेल. 
* स्पर्धा परीक्षांची तयारी
(Preparation Of Competative Exam's) 
आगामी वर्ष 2024 मध्ये येणाऱ्या विविध परीक्षांची तयारी करीत असताना तो किती वेगाने करावा लागेल, याचा अंदाज तुम्हाला यातून लावता येईल. अभ्यास केंद्र (Study Point | Career Academy | Coaching Classes) निवडताना तुम्हाला विचार करण्यासाठी मोठा अवधी मिळू शकतो. आता तुम्हीही न थकता, जोरदार तयारी करून अभ्यासाला लागा. आगामी 2024 वर्षात तुमचे शासकीय अधिकारी (Government Officer) होण्याचे स्वप्न नक्कीच पूर्ण होईल, ही अपेक्षा. आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. दरम्यान, वेळापत्रकात काही कारणाने बदल झाल्यास तो आयोगाच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची वेबसाईट पुढीलप्रमाणे - https://mpsc.gov.in 

* महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या विविध महत्त्वाच्या स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक 
| Maharashtra Public Service Commission | Tentative Time Table |

* दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी पूर्व परीक्षा : 17 मार्च 2024
(Civil Judge Junior Division - CJJD | Prelim Exam) 

* दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्याय दंडाधिकारी मुख्य परीक्षा : 27 जुलै 2024
(Civil Judge Junior Division - CJJD | Main Exam) 

■ महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा
संयुक्त पूर्व परीक्षा : 16 जून 2024
(Maharashtra Non Gazzated Officer Class 2 And Class 3 | Prelim Exam) 

* महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा : 29 सप्टेंबर 2024
(Maharashtra Non Gazzated Officer Class 2 And Class 3 | Main Exam) 

■ सहायक मोटार वाहन निरीक्षक मुख्य परीक्षा : 26 ऑक्टोबर 2024
(Asst. Motor Vehicle Inspector Main Exam)

* महाराष्ट्र गट -क सेवा मुख्य परीक्षा : 17 नोव्हेंबर 2024
(Maharashtra Class 3 Officer Main Exam)

* महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त परीक्षा : 28 एप्रिल 2024
(Maharashtra Gazzated Civil Services Joint Exam) 

* अन्न व औषध प्रशासकीय सेवा मुख्य परीक्षा : 9 नोव्हेंबर 2024
(Food And Drugs Administrative Services Main Exam)
 
* महाराष्ट्र विद्युत व अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा : 10 नोव्हेंबर 2024
(Maharashtra Electrical And Engineering Services Main Exam)

* महाराष्ट्र कृषि सेवा मुख्य परीक्षा 2024 - 10 नोव्हेंबर 2024
(Maharashtra Agri Services Main Exam)

* महाराष्ट्र यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा परीक्षा : 23 नोव्हेंबर 2024
(Maharashtra Mechanical Engineering Services Main Exam) 

* महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा : 23 नोव्हेंबर 2024
(Maharashtra Electrical Engineering Services Main Exam)

* महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा :
23 नोव्हेंबर 2024
(Maharashtra Civil Engineering Services Main Exam) 

* निरीक्षक वैधमापन शास्त्र मुख्य परीक्षा : 1 डिसेंबर 2024

* राज्य सेवा मुख्य परीक्षा : 14 डिसेंबर ते 16 डिसेंबर 2024
(State Services Main Exam) 

* महाराष्ट्र वन सेवा मुख्य परीक्षा : 28, 29, 30 व 31 डिसेंबर 2024
(Maharashtra Forest Services Main Exam) 
-----
* स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या युवकांसाठी महत्त्वाचे 
(Important Tips For Study And Preparation) 
* अभ्यासाचे नीटनेटके नियोजन करावे. 
* अभ्यासाचे वेळापत्रक ठरवून त्याचे कटाक्षाने पालन करावे. 
* मोबाईल फोनचा वापर अत्यावश्यक आणि अभ्यासाच्या कामासाठी करावा. 
* स्पर्धा परीक्षांची तयारी करताना एकट्याने अभ्यास करणे केव्हाही चांगले.
* अभ्यासानंतर मित्रांमध्ये अवश्य चर्चा करावी. 
* अभ्यासात न समजलेले मुद्दे मित्र, शिक्षक आणि जाणत्या व्यक्तीकडून समजून घ्यावेत. 
* अभ्यास करताना जेवण आणि झोप पूर्ण होणे गरजेचे आहे. 
* आपल्या रूममध्ये वेगवेगळे तक्ते / घटना आणि त्यांचे वर्ष / सूत्रे ठळक अक्षरात लावून ठेवावेत. 
---------
Previous Post Next Post