काय आहे IPO आयपीओ? 10 दिवसात 1 लाखाचे 2.58 लाख कसे काय झाले असतील !

काय आहे IPO आयपीओ?
10 दिवसात 1 लाखाचे 2.58 लाख 
कसे काय झाले असतील ! 
याला म्हणतात IPO आयपीओ
***
मित्र-मैत्रिणींनो नमस्कार. 
आजपर्यंत आपण येथे विविध विषयांची माहिती घेतली. भारतीय सण-उत्सव, सुखी कुटुंब जीवन, आपले नातेसंबंध, मैत्री, प्रेम अशा विविध विषयांवर आम्ही तुमच्याशी संवाद साधला आहे. आज आपण एका नवीन क्षेत्रात प्रवेश (Entry) करीत आहोत. होय, हा विषय आपल्याला सावधान करणारा आहे, माहिती देणारा आहे. आम्ही तुम्हाला आर्थिक क्षेत्राची, गुंतवणूक क्षेत्राची ओळख करून देत आहोत. कुठेही इन्व्हेस्टमेंट करताना, आपल्याला त्या त्या विषयाची थोडी तरी माहिती असायलाच हवी. याच हेतूने आज आपण जाणून घेणार आहोत स्टॉक मार्केटमध्ये सर्वाधिक बोलबाला असलेली IPO आयपीओबद्दल. 

* काय असतो IPO आयपीओ? 
| What Is IPO | आयपीओ म्हणजे काय | 

काळजी आणि अभ्यासपूर्वक इन्व्हेस्टमेंट करणाऱ्याला मालामाल करणारी कमाल करतो IPO आयपीओ. सध्या सुरू असलेल्या 2023 वर्षात जगातील सर्व देशांच्या तुलनेत भारतात सर्वाधिक IPO आयपीओ स्टॉक मार्केटमध्ये आले. संपूर्ण वर्षात 200 च्या आसपास IPO आयपीओ बाजारात आले. यापैकी बहुतांश IPO आयपीओनी इन्व्हेस्टर्सला भरघोस प्रॉफिट मिळवून दिला. स्टॉक मार्केट मेन बोर्डवरील लिस्टिंगमध्ये असलेल्या 50 पैकी 40 आयपीओची किंमत पहिल्याच दिवशी भरघोस वाढली होती. एका XYZ कंपनीचा IPO तर एवढा भन्नाट वेगाने वाढला की, त्याने इन्व्हेस्टर्सला पहिल्या 10 दिवसात 258 टक्के प्रॉफिट मिळवून दिला. म्हणजे मी त्यात 1 लाख रुपये लावले असते, तर त्या 1 लाखाचे 10 दिवसात 2 लाख 58 हजार रुपये झाले असते. तेही अधिकृत मार्गाने. आता सांगा... सोने-चांदी, घर, प्लॉट, जमीन, फ्लॅटमध्ये तरी एवढे भरगच्च रिटर्न्स मिळाले असते का? 
ही कमाल आहे IPO ची. अर्थात यामध्ये नुकसान होण्याचीही शक्यता असते. काही IPO निव्वळ फुसके फटाके निघाले आहेत. पण वरील XYZ कंपनीत इन्व्हेस्ट करणाऱ्या लोकांनी 258 टक्के रिटर्न्स मिळवले आहेत. हे घडून गेले आहे. मित्रांनो, IPO म्हणजे एखाद्या कंपनीने जाहीर केलेली Initial Public Offer. इनिशियल पब्लिक ऑफर म्हणजेच IPO ही आपल्याला त्या कंपनीच्या भांडवलात investment करण्याची आणि नंतर त्यातून होणारा प्रॉफिट कमावण्याची जीवनात फक्त एकदा मिळणारी संधी असते. 
 
* आगामी काळात येणार बंपर IPO
( Upcoming Verious Most Awaited Companies IPO) 
इंडियन स्टॉक मार्केटने सध्या चांगलीच उसळी (Boom) घेतली आहे. सेन्सेक्सही दररोज उच्च पातळी गाठत आहे. गेल्या 2023 या वर्षात IPO च्या ट्रेडिंगमधून अनेकांना मोठा फायदा झाला. आता आगामी काळातही (Upcoming Verious IPO) अनेक कंपन्या आपले IPO शेअर बाजारात घेऊन येत आहेत. अभ्यास आणि संशोधन करून ट्रेडिंग करणाऱ्यांना ही सुवर्णसंधी (Golden Chance) आहे. त्यात Allied Blenders | Muthoot Microfin | RBZ Jewellers | Suraj Estate Developers | Happy Forgings | Motisons Jewellers | Mukka Proteins | अशा विविध कंपन्यांचे आयपीओ बाजारात येत आहेत. IPO खरेदीमुळे investers ला चांगल्या कंपन्यांचे शेअर्स कमी किमतीत मिळतात. त्यामुळे IPO ला सर्वोत्तम प्रतिसाद मिळतो.

* IPO मध्ये पैसे कसे टाकायचे? 
| How to invest in IPO | Best IPO to invest | सर्वात भारी IPO कसा ओळखावा |

एखाद्या कंपनीला बाजारातून मोठ्या प्रमाणात निधी जमा करायचा असेल तर तो IPO च्या माध्यमातून उभारता येतो. IPO खरेदी करताना त्या कंपनीचा इतिहास, व्यवसाय, बाजारातील प्रतिष्ठा आणि त्या कंपनीची सांपत्तिक स्थिती ओळखणे आवश्यक आहे. त्यासाठी खालील बाबींचा अभ्यास करावा. 
* तुम्ही खरेदी करीत असलेल्या कंपनीचे उत्पादन (Product ) काय? 
* हे उत्पादन कंपनी कोणाला विक्री करते? त्याला बाजारात मागणी आहे का? 
* कंपनीचे उत्पादन ग्राहक का विकत घेतात?
* संबंधित कंपनीला बाजारात किती वर्षे झाली आहेत? कंपनीचे ग्राहकांशी Goodwill कसे आहे? 
* कंपनी Highly Trusted यादीत आहे का? 
* संबंधित कंपनीची बाजारात खरी स्पर्धा कोणाशी आहे? 
* याच कंपनीच्या उत्पादनांची विशेषता काय? ती स्पर्धेत टिकून आहेत का? 
* संबंधित कंपनीचे मालक - संचालक कोण आहेत? त्यांची प्रतिष्ठा, त्यांचा त्या त्या क्षेत्रातील अनुभव 

वरील सर्व बाबी Google Search करून किंवा Business शी संबंधित वृत्तपत्रे, मासिके, चॅनल्स याद्वारे मिळवता येते. अशा सर्व बाजूंचा विचार करून आणि खोलवर अभ्यास करूनच IPO मध्ये Investment करायला हवी. IPO ही एक प्रकारची ऑफर आहे ज्याद्वारे खाजगी कंपनी प्रथम आपल्या कंपनीचे शेअर्स लोकांना ऑफर करते. त्यातून पैसे उभारून ही कंपनी व्यवसाय विस्तार अथवा एखादा प्लॅन यशस्वी करते. ज्यावेळी एखादी कंपनी थेट जनतेत जाऊन आपल्या शेअर्सची सार्वजनिकरीत्या खरेदी-विक्री करते, त्यावेळी हे IPO खरेदी-विक्रीचे आर्थिक व्यवहार Bombay Stock Exchange (BSE) किंवा National Stock Exchange (NSE) या ठिकाणी अधिकृत म्हणजेच Listed केले जातात. त्यानंतर त्यांची Public Treding सुरू होते. 

* कसा मिळतो IPO द्वारे नफा 
| How We Get Profit From IPO | How To Earn Money From IPO | 

स्टॉक मार्केटमध्ये IPO जाहीर झाल्यानंतर जेव्हा तुम्ही त्याची खरेदी करता तेव्हा त्यातून तुम्हाला दोन प्रकारे नफा मिळवता येतो. त्या संबंधित कंपनीला खूप चांगला प्रतिसाद मिळाला, तिची चांगली वाढ झाली तर त्यातून तुमच्या प्रॉफिटची रक्कम वाढते. ज्यावेळी संबंधित कंपनी सार्वजनिक (Public) होते आणि स्टॉक मार्केटमध्ये Listed होते, त्यावेळी विक्री करून तुम्हाला प्रॉफिट मिळवता येतो. 
* IPO मध्ये Investment कशी करायची? 
| How Can I Purchase IPO | IPO Rules And Regulations |

अतिशय सोप्या पद्धतीने IPO ची खरेदी करता येते. आता तर Smart Phone आणि विविध Apps द्वारे IPO Treding करणे खूप सोपे झाले आहे. मात्र त्यासाठी आपले डिमॅट अकाउंट असायला हवे. आपण आपल्या डिमॅट अकाउंटमधून, IPO मध्ये पैसे गुंतवू शकतो. डिमॅट अकाउंटसाठी वय 18 वर्षे पूर्ण असले पाहिजे, तसेच आपल्याकडे आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक अकाउंट असणे आवश्यक आहे. तुमचे आधार कार्ड, Pan Card आणि बँक खाते मोबाईल फोन नंबरशी जोडलेले असायला हवे. आता तर डिमॅट अकाउंटसाठी Grow / Upstox / Zerodha / Sherkhan / 5 Paisa यासारखे Apps आणि SBI / HDFC / Axis / ICICI यासह जवळपास सर्वच बँकांमध्ये अगदी सहज डिमॅट अकाउंट काढता येते. 

* IPO खरेदीचे फायदे कोणते? 
| Benifits Of IPO Treding | Advantages Of IPO Purchasing | 

एखादी कंपनी आपला बिझनेस वाढवण्यासाठी किंवा अन्य कोणत्याही कारणासाठी बाजारातून मोठा निधी जमा करायचा असेल तर IPO म्हणजे इनिशियल पब्लिक ऑफर जाहीर करते. आता आपण जाणून घेऊया IPO खरेदीचे फायदे.

* स्टॉक मार्केटमध्ये IPO Treding केल्याने तुम्हाला अगदी सुरुवातीपासूनच एका चांगल्या कंपनीत गुंतवणूक करण्याची संधी मिळते. त्यानंतर, कंपनीने चांगला प्रॉफिट मिळवला तर त्यात तुमचाही चांगला फायदा होतो. 

* तुम्ही IPO खरेदीसाठी अर्ज केल्यास तुम्हाला सुरुवातीला Listing Gain चा फायदा मिळू शकतो. स्टॉक मार्केटमध्ये अनेक कंपन्यांतून अशा प्रकारे गुंतवणूकदारांनी जबरदस्त प्रॉफिट मिळवला आहे. 

* IPO खरेदीसाठी सर्वसाधारण रु. 15 हजारांची गरज असते. अगदी कमी पैसे गुंतवून अधिक फायदा मिळवण्याची ही संधी असते. 

* स्टॉक मार्केटमध्ये IPO आणण्यापूर्वी, संबंधित कंपनीला अनेक परवानग्या काढाव्या लागतात. स्टॉक मार्केटशी निगडित सर्वोच्च संस्था SEBI कडून परवानगी घेतल्यानंतरच कंपनीला मार्केटमध्ये उतरता येते. त्यामुळे पैशांचा चोख हिशोब असतो. यात पूर्ण पारदर्शकता असते. कुठलीही फसवणूक होण्याची शक्यता राहत नाही. 
* IPO खरेदीचे तोटे 
| Disadvantages Of IPO Treding | आयपीओ खरेदीचे तोटे | Losses Of IPO Treding |

मित्रांनो, IPO Treding मध्ये जसे फायदे आहेत, तसेच तोटे आणि नुकसान होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. संबंधित कंपनी चांगल्या पद्धतीने Perform करू शकली नाही तर मोठे नुकसानही होते, याचा विचार जरूर करा. ज्यावेळी मार्केटमध्ये IPO येतो त्यावेळी मार्केट खालच्या पातळीवर गेले तर IPO Listing च्या वेळीच मोठे नुकसानही होऊ शकते. अशा अनेक घटना घडल्या आहेत. 

* कंपनीचा नीट सखोल अभ्यास न करता, तुम्ही IPO खरेदी केला तर तुमचे नुकसान होऊ शकते.  

*******************

* अत्यंत महत्त्वाचे - एक गोष्ट लक्षात ठेवा, IPO Treding ही High Risk असलेली Investment मानली जाते. या व्यवहारात तुम्ही High Risk स्वीकारण्यास तयार असाल, तरच IPO Treding च्या क्षेत्रात पाऊल ठेवावे. 
वाचक मित्रांनो, सदर लेखातील मजकूर आणि माहिती स्टॉक मार्केट आणि वित्तीय क्षेत्रातील अभ्यासू, तज्ज्ञ अनुभवी लेखकांच्या विविध लेखातून संकलित केली आहे. IPO Treding या विषयाची सत्य माहिती वाचकांपर्यंत पोचविण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. आम्ही कुठल्याही संस्थेचे, आर्थिक व्यवहाराचे समर्थन करीत नाही. वाचकांनी सखोल अभ्यास करून आपल्या जोखीम आणि जबाबदारीवर IPO Treding विषयीचा निर्णय घ्यावा. सदर लेख आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा. 
आपले मनःपूर्वक धन्यवाद...! 
-------------------
Previous Post Next Post