* उत्तराखंड बोगद्यातून कसे बाहेर आले 41 जिगरबाज कामगार !
| Interesting Facts Of Tunnel Rescue Operation | Uttarakhand Tunnel Workers Real Story | Trending | Facts Of Rat Hole Mining | Brave Tunnel Workers |
वरच्या फोटोत दिसणारे हसरे चेहरे त्या हिंमतवान भारतीय मजुरांचे आहेत, ज्यांनी एक दोन नव्हे, तर तब्बल 17 दिवस आणि 17 रात्री उत्तराखंड येथे एका बोगद्यामध्ये काढल्या आहेत. होय, हेच ते आमचे भारतीय बांधव (Brave Tunnel Workers) आहेत ज्यांनी मोठ्या धाडसाने आणि संयमाने आलेल्या संकटाला तोंड दिले... आणि आज हे संकट दूर झाले आहे. उत्तर काशी (उत्तराखंड बोगदा दुर्घटना | Uttar Kashi Tunnel Rescue Operation | Uttarakhand Tunnel Workers) येथील सिलक्यारा येथे बांधण्यात येत असलेल्या बोगद्यातून या कामगार बांधवांची (Brave Tunnel Workers | Uttar Kashi Tunnel) सुखरूप सुटका झाली आहे. National Disaster Response Force (NDRF) चे जवान, रस्ते बांधकाम तज्ञ, शास्त्रज्ञ आणि इतर कामगारांनी रात्रंदिवस परिश्रम करून केलेल्या अथक प्रयत्नांना मंगळवारी 28 नोव्हेंबर 2023 रोजी यश मिळाले. या कामगारांच्या जीवनातील हा सर्वोच्च आनंदाचा क्षण आहे. त्यांची सुखरूप सुटका व्हावी, यासाठी ईश्वराकडे प्रार्थना करणाऱ्या कामगार कष्टकरी कुटुंबांसाठी 28 नोव्हेंबर 2023 हा दिवस सोन्यासारखा आहे. दिवाळीच्या दिवशी अडकलेले 41 कामगार अखेर 17 दिवसानंतर सुखरूप बाहेर आले. त्यांच्या कुटुंबियांसाठी हीच दिवाळी ठरली. त्यांनी फटाके फोडत आणि मिठाई वाटत आनंद साजरा केला. या जिगरबाज कामगारांच्या धैर्याला, त्यांच्या हिमतीला आणि जे जे लोक या सुटका कार्यात सहभागी झाले होते, त्या सर्वांना आमचा मानाचा मुजरा...!
* कोठे आहे उत्तराखंड - उत्तर काशी बोगदा?
(Where Is Uttar Kashi Tunnel | Uttarakhand Tunnel | Silkyara Tunnel Workers)
भारताच्या उत्तर दिशेला डोंगर दऱ्या आणि निसर्गाची दैवी देणगी लाभलेले राज्य आहे उत्तराखंड. भारत सरकारच्या चार धाम प्रोजेक्टचा हा एक भाग आहे. येथील ब्रह्मखाल - यमुनोत्री राष्ट्रीय महामार्गावर (National Highway) सिल्क्यारा ते डंडलगाव यादरम्यान हा विशाल बोगदा आहे. सिल्क्यारा या भव्य बोगद्याची लांबी 4.5 किलोमिटर आहे. येथे काम सुरू असताना जमीन ढासळली आणि ही दुर्घटना घडली आणि तिथे 41 कामगार अडकून पडले. ज्या दिवशी भारतभरात दिवाळी साजरी होत होती, लक्ष्मीपूजन आणि दीपोत्सव सुरू होता, त्या दिवशी म्हणजेच रविवार, 12 नोव्हेंबर 2023 रोजी ही दुर्घटना घडली. चार धाम प्रोजेक्टमधील हा सर्वात लांब बोगदा (Longest Tunnel Of Char Dham Project) आहे.
* काय आहे रॅट होल मायनिंग पद्धत
(What Is Rat Hole Mining | Uttar Kashi Tunnel Rescue Operation | Uttarakhand Tunnel Workers)
उत्तराखंड किंवा उत्तर काशी येथे सर्वाधिक लांबीच्या सिल्क्यारा बोगद्यात अडकलेल्या कामगारांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी खूप प्रयत्न करण्यात आले. पण ते सगळेच फेल ठरत गेले. बोगदा खोदत असताना अमेरिकेतून आणलेली ऑगर मशिन पंख्यात स्टील सळया अडकल्याने बंद पडले. त्यामुळे सोमवार, 27 नोव्हेंबर 2023 पासून रॅट होल मायनिंग पद्धत वापरण्यात आली. कोळसा खाण (Coal Mining) कामात ही पद्धत वापरतात. या द्वारे 4 फुटांपेक्षा अरुंद असलेल्या बोगद्यातूनही कोळसा काढता येतो. फावड्यासारख्या यंत्राने हे खोदकाम केले जाते. हे काम धोकादायक मानले जाते. त्यामुळे रॅट होल मायनिंगवर National Green Tribunal (NGT) ने 2014 मध्ये यावर बंदी घातली आहे. तरीही प्राणाची बाजी लावून या रॅट होल मायनर्सनी या कामगारांना सुखरूप बाहेर काढले.
* कसे झाले रेस्क्यू ऑपरेशन? 17 दिवसानंतर 8 राज्यांमध्ये राहणाऱ्या 41 कामगारांची सुखरूप सुटका आणि आनंदोत्सव
(Celebration Of Successful Tunnel Rescue | Trending | Uttarkashi Tunnel Rescue Successful)
उत्तराखंडच्या सिल्क्यारा बोगद्यात अडकलेल्या 41 कामगारांची सुटका करण्यात सर्वांनीच प्रयत्नांची पराकाष्ठा केली. संपूर्ण 17 दिवस आणि 17 रात्री त्यांची काळजी घेतली जात होती. त्यांना मानसिक आधार दिला जात होता. त्यांची हिंमत आणि आत्मविश्वास, सामर्थ्य टिकून राहावे, यासाठी अनेक प्रयत्न करण्यात आले. सुरुवातीला Drilling Machine ने ड्रिलिंग करण्यात आले. मात्र बचाव करताना एकामागून एक समस्या येत होत्या. या कामगारांच्या सुखरूप सुटकेसाठी ड्रिलिंगसाठी अमेरिकन ऑगर (American Oggar Drilling Machine) मशीन आणण्यात आले. पण त्यातही काही बिघाड झाल्याने ते काम थांबले. त्यानंतर बोगद्याच्या वरून मॅन्युअल ड्रिलिंग केले गेले. पण त्यातही उत्तराखंडमधील खराब हवामानामुळे बचावादरम्यान नवीन समस्या निर्माण होऊ लागल्या. उत्तराखंड राज्यात पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली होती. त्यामुळे बचावकार्यात (Uttar Kashi Tunnel Rescue Operation) अडचण येऊ शकते, अशी शक्यताही शास्त्रज्ञांनी वर्तवली. आज 28 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळपासूनच सिल्क्यारा बोगद्याच्या आत (Silkyara tunnel) मॅन्युअल ड्रिलिंग चालू करण्यात आली. बोगद्यात पाईप्स ढकलण्यासाठी ऑगर मशीनचा वापर करण्यात आला. अखेर 17 व्या दिवशी 8 विविध राज्यातून आलेल्या 41 कामगारांची सुखरूप सुटका झाली. यात शास्त्रज्ञ, रस्ते बांधकाम तज्ञ, NDRF टीम, जवान आणि कामगार सहभागी झाले.
* सिल्क्यारा बोगद्यात काम करणारे कामगार कोणकोणत्या राज्यांतील होते?
(Brave Tunnel Workers And Their States | Celebration Of Successful Tunnel Rescue | Trending)
उत्तराखंडच्या सिल्क्यारा बोगद्यात अडकलेल्या सर्व 41 कामगारांची तब्बल 17 दिवसांनंतर सुखरूप सुटका संपूर्ण देशात आनंदाचे वातावरण आहे. सर्व कामगार सुखरुप बाहेर आल्याने त्यांची कुटुंबे खूप आनंदी आहेत. पण हे 17 दिवस त्यांच्यासाठी किती कठीण गेले असतील हे फक्त त्या बहादूर कामगारांनाच माहीत आहे. चार धाम राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पात (Char Dham National Highway Project) झारखंड, पश्चिम बंगाल, बिहार आणि उत्तर प्रदेशसह अन्य विविध राज्यांतील कामगार घरापासून लांब राहून येथे काम करत होते. गरिबीमुळे ते काम करत होते. त्यामुळे देशातील त्या त्या आठ राज्यांत आज उत्सवाचे वातावरण आहे. या बोगद्याच्या कामावर झारखंडमधील सर्वाधिक 15 कामगार बोगद्यामध्ये अडकले होते. यासोबत उत्तर प्रदेशमधील 8 जण, उत्तराखंडमधील 2 मजूर, हिमाचल प्रदेशातील 1, बिहारमधील 5, पश्चिम बंगालमधील 3, आसाममधील 2 आणि ओडिशातील 5 मजूर अडकून पडले होते. हे सर्व 41 मजूर सुखरुप बाहेर आलेले आहेत.
* असे आहेत 41 कामगार आणि त्यांचे राज्य
* झारखंड : 15 कामगार
* उत्तर प्रदेश : 08 कामगार
* उत्तराखंड : 2 कामगार
* हिमाचल प्रदेश : 01 कामगार
* बिहार : 05
* पश्चिम बंगाल : 03
* आसाम : 02
* ओडिशा : 05
* काय आहेत बोगद्यात अडकलेल्या धाडसी कामगारांची नावे?
(Names Of Brave Tunnel Workers |
| Names Of Silkyara Tunnel Workers | Celebration Of Successful Tunnel Rescue | Trending)
विशाल (हिमाचल प्रदेश), गब्बरसिंग नेगी, राम सुंदर (उत्तराखंड), सबा अहमद, सोनू शहा, वीरेंद्र किस्कू, सुशील कुमार, दीपक कुमार (बिहार), मनीर तालुकदार, सेविक पाखेरा, जयदेव प्रामाणिक (पश्चिम बंगाल), अंकित, राम मिलन, अखिलेश कुमार, सत्यदेव, संतोष, जय प्रकाश, मनजीत (उत्तर प्रदेश), सपन मंडल, भगवान बत्रा, विशेष नायक, राजू नायक, धीरेन (ओडिशा), विश्वजित कुमार, सुबोध कुमार, अनिल बेदिया, शजेंद्र बेदिया, सुक्रम, टिकू सरदार, गुणधर, रणजीत, रवींद्र, समीर, महादेव, मुडटू मुरम, चमरा उराव, विजय होरो, पुष्कर, गणपती (झारखंड), संजय, राम प्रसाद (आसाम).
या सर्व जिगरबाज कामगारांना पुढील सुखसमृद्ध आणि निरामय जीवनासाठी लक्ष लक्ष शुभेच्छा...!
धन्यवाद !
----------------------