'सॅम बहादूर' अर्थात सॅम माणेकशॉ ! निधड्या छातीच्या वीराची शौर्यगाथा

'सॅम बहादूर' अर्थात सॅम माणेकशॉ ! 
निधड्या छातीच्या वीराची शौर्यगाथा
| Sam Bahadur | Sam Manekshaw | Field Marshal | Biopic Cinema | Upcoming Movies | Release 1 December 2023 | Trending | 
***
मित्र - मैत्रिणींनो, भारताच्या इतिहासात अशी काही माणसे घडून गेली आहेत, की ज्यांचे नुसते नाव घेतले तरी मनाला उभारी मिळते. ताकद मिळते. ज्यांच्या फक्त उपस्थित असण्यानेही थकलेले सैनिक पुन्हा एकदा नव्या जोमाने लढायला सरसावतात. आपली रायफल उंचावून भारतमातेच्या सेवेसाठी सज्ज होतात. असेच एक अदम्य साहस, दुर्दम्य आत्मविश्वास आणि असीम पराक्रमाचे धनी भारतीय सेनेचे पहिले फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ (Sam Manekshaw) अर्थात सॅम बहादूर (Sam Bahadur). आजच्या या भागात आम्ही या लढवय्या वीराची शौर्यगाथा मांडत आहोत. निमित्त आहे... येत्या 1 डिसेंबर 2023 ला रिलीज (Release On 1 December 2023) होणारा त्यांच्या जिगरबाज जीवनावर आधारित सिनेमा 'सॅम बहादूर'. 
* सॅम बहादूर सिनेमाविषयी थोडक्यात 
(Short Information About Sam Bahadur Cinema | About Sam Bahadur) 

रणमैदानावर झालेल्या युद्धात शत्रूला माती चारणाऱ्या हिंमतवान बलाढ्य भारतीय सेनेची विजयगाथा सांगणारा सॅम बहादूर सिनेमा येत्या 1 डिसेंबर 2023 ला देशभरातील सिनेमागृहात रिलीज होत आहे. या सिनेमात स्वतः फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ (Sam Manekshaw) अर्थात सॅम बहादूर (Sam Bahadur) यांची भूमिका साकारली आहे विकी कौशल यांनी. आयर्न लेडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्या कणखर भूमिकेत फातिमा सना शेख दिसतील. त्याचबरोबर सिनेमात गोविंद नामदेव, अंजन श्रीवास्तव, सान्या मल्होत्रा, मोहम्मद झिशान अय्युब, नीरज काबी यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. सॅम बहादूर (Sam Bahadur) सिनेमाचे दिग्दर्शन मेघना गुलजार यांनी केले आहे. स्टोरी आणि स्क्रीन प्ले लेखनाची जबाबदारी भवानी अय्यर, शंतनु श्रीवास्तव आणि स्वतः दिग्दर्शक मेघना गुलजार यांनी सांभाळली आहे. सैनिकी वातावरणाला पोषक असे संगीत शंकर एहसान लॉय यांचे आहे. प्रख्यात निर्माते रॉनी स्क्रूवाला यांची ही पेशकश आहे. 

* सॅम बहादूर (Sam Bahadur Movie)
* कलाकार - विकी कौशल | फातिमा सना शेख | गोविंद नामदेव | अंजन श्रीवास्तव | सान्या मल्होत्रा | मोहम्मद झिशान अय्युब | नीरज काबी | 
* निर्माता - रॉनी स्क्रूवाला
* दिग्दर्शन - मेघना गुलजार
* कथा - पटकथा - भवानी अय्यर | शंतनु श्रीवास्तव | मेघना गुलजार |
* म्युझिक - शंकर एहसान लॉय 
* कोण होते महान योद्धे सॅम बहादूर (Sam Bahadur | Interesting Facts | Trending | Real Story Of Sam Bahadur | Story Of Sam Manekshaw)
भारताच्या इतिहासात अभूतपूर्व कामगिरी करणाऱ्या फिल्ड मार्शल सॅम बहादूर यांचे पूर्ण नाव सॅम होर्मसजी फ्रामजी जमशेदजी माणेकशाॅ असे होते. त्यांचा जन्म 3 एप्रिल 1914 रोजी झाला. आज जगात बलाढ्य समजल्या जाणाऱ्या भारतीय सेनेचे ते आठवे सेनाप्रमुख होते. त्यांचा जन्म अमृतसर (पंजाब) येथे एका पारशी कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव होर्मुजी माणेकशॉ तर आईचे नाव हिराबाई असे होते. मूलतः माणेकशॉ कुटुंब मूळचे वलसाड (गुजरात) येथील होते. सॅम माणेकशॉ यांचे शालेय शिक्षण अमृतसरला झाले, तर महाविद्यालयीन शिक्षण नैनितालच्या महाविद्यालयात झाले. सॅम बहादूर यांच्या वडिलांचा सैनिकी शिक्षणाला विरोध होता. तरीही घरच्यांचा विरोध पत्करून त्यांनी डेहराडून येथील इंडियन मिलिटरी अकॅडमीमध्ये प्रवेश घेतला. सॅम माणेकशॉ हे इंडियन मिलिटरी अकॅडमीच्या पहिल्या बॅचचे सैनिक होते. १९३४ मध्ये ते सेकंड लेफ्टनंट झाले. सॅम बहादूर अर्थात सॅम माणेकशॉ यांची सैनिकी कारकीर्द जवळपास चार दशके म्हणजेच चाळीस वर्षांची आहे. आपल्या कार्यकाळात त्यांनी अनेक युध्दांमध्ये सहभाग घेतला. त्यात दुसरे महायुद्ध तसेच 1948, 1965 आणि 1971 या तिन्ही भारत-पाक युद्धात तसेच 1962 च्या भारत - चीन युद्धातही त्यांनी पराक्रमाची शर्थ केली. या बेजोड कामगिरीमुळे सरसेनापती सॅम माणेकशॉ यांना शौर्य पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. खंदे नेतृत्व आणि पराक्रमामुळे सॅम माणेकशॉ यांना स्वतंत्र भारताचे सर्वोत्तम सेनानी मानले जाते. 
* सॅम माणेकशॉ यांचा पराक्रम 
सॅम बहादूर हा येत्या 1 डिसेंबर 2023 ला रिलीज (Release On 1 December 2023) होणारा सिनेमा जिगरबाज योद्धे फिल्ड मार्शल सॅम बहादूर माणेकशॉ यांच्या जीवनावर आधारित बायोपिक (Biopic) आहे. ज्यामध्ये विकी कौशल मुख्य भूमिकेत आहे. सॅम बहादूर या पदवीने लोकप्रिय असलेल्या माणेकशॉ यांनी चार दशकांहून अधिक काळ भारतीय सैन्याची सेवा केली. ते एकूण पाच युद्धांमध्ये शौर्याने लढले. 

* फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांनी 
या युध्दात गाजवला पराक्रम 

* दुसरे महायुद्ध (1942) Second World War * भारत-पाक विभाजन युद्ध (1947) Indo-Pak Partition War  
* चीन-भारत युद्ध (1962) Sino-Indian War
* भारत-पाक युद्ध (1965) Indo-Pak War
* बांगलादेश मुक्ती युद्ध (1971) War of Bangladesh Liberation

* चार दशकांची सैनिकी कारकीर्द
(40 Years Military Service | Four Decades Of Great Contribution)

चाळीस वर्षांच्या लष्करी कारकीर्दीत सॅम बहादूर यांना अनेकदा मृत्यूने हुलकावणी दिली, पण ते नेहमीच विजयी झाले. फिल्ड मार्शल सॅम बहादूर माणेकशॉ यांना वीरतेबद्दल अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यात पद्मभूषण, पद्मविभूषण आणि दुसऱ्या महायुद्धात शौर्य पुरस्कार देण्यात आला. याशिवाय मिलिटरी क्रॉस या अत्युच्च पुरस्कारानेही त्यांना सन्मानित करण्यात आले. 1 जानेवारी 1973 रोजी भारतीय सैन्यात सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या फील्ड मार्शल या पदावर पदोन्नती मिळालेले ते पहिले सैनिकी अधिकारी (Military Officer) होते. स्वतंत्र भारतात केवळ दोनच व्यक्तींना हे पद मिळाले आहे. या पदावरील व्यक्ती प्रत्यक्ष कार्यरत नसली तरी अधिकृतरीत्या निवृत्त होत नाही. फिल्ड मार्शल सॅम बहादूर माणेकशॉ हे 15 जानेवारी 1973 रोजी कार्यालयीन सेवानिवृत्त (Official Retirement) झाले. त्यानंतर ते तामिळनाडूतील वेलिंग्टन या सैनिकी छावणीजवळील कुन्नूर या शहरात राहिले. त्यानंतर त्यांनी डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेजचे प्रमुख पदावर कार्य केले. अखेर 27 जून 2008 रोजी वेलिंग्टन येथील सैनिकी रुग्णालयात न्युमोनियाच्या दीर्घ आजाराने त्यांचे निधन झाले.

* सॅम बहादूर (Sam Bahadur) 
येत्या 1 डिसेंबरला सिनेमागृहात रिलीज 
(Release On 1 December 2023)

भारताचे पहिले फिल्ड मार्शल सॅम बहादूर माणेकशॉ यांची विजयगाथा सांगणारा सॅम बहादूर सिनेमा येत्या 1 डिसेंबर 2023 ला देशभरातील सिनेमागृहात रिलीज होत आहे. हा चित्रपट आपणही सिनेमागृहात जाऊन अवश्य बघा. आपणास हा लेख आवडला तर नक्कीच कळवा आणि शेअर करा. मनःपूर्वक धन्यवाद...! 

| जय हिंद | Jay Hind |
Previous Post Next Post