नातं अनामिक मायेचं, साऱ्यांनी आयुष्यभर जपायचं ! - Amezing Story Of Relationship | Respect Senior Citizens

 अनामिक नातं मायेचं, आपुलकीनं जपयाचं !

(Motivational Quotes | Motivational Story | Good Morning Thaughts)

-----

सलग दोन दिवस झाले होते... कधी पहाटे तर कधी प्रभात समयी येणारा तो काही आला नव्हता. स्क्रीनवरची त्याची ती नेहमीची हिरव्या रिंगणातली जागा रिकामी होती. मी पण काही फारसं मनावर नाही घेतलं, पण काही तरी राहिलंय... कुठे तरी चुकतंय... ही जाणीव मात्र लागून होती. शेवटी तिसरा आणि चौथा दिवसही तसाच गेला. पाचव्या दिवशी न राहवून मी थेट तिथं गेलो, जिथून या अनामिक नात्याची सुरुवात झाली होती...! हो, खरंच हे नातं अनामिक होतं. कुठलाही धागादोरा जुळत नसताना नियतीनं घडवून आणलेली भेट... या भेटीचं रूपांतर झालं चौकशीत. या साऱ्यातून एका अनामिक नात्याचं रोपटं उगवलं. आणि त्यानंतर सुरू झाली मायेची शिंपण !  


| Happy Life | How To Live Happy| 
मंदिराच्या आवारात असलेल्या बेंचवर हातात काठी घेऊन बसलेले ते काका मला दर मंगळवारी बघत होते. एकदा कोण - कुठले अशा चौकशीतून त्यांची आणि माझी ओळख झाली. माझा नंबर सेव्ह करीत असताना माझं लक्ष गेलं त्यांच्या मोबाईल फोनकडे. चांगला महागडा फोन होता तो. निवृत्त अधिकारी राहिलेले काका थकलेले असले तरी टापटीप होते. घरी मुलगा, सून आणि मोठी झालेली नातवंडे. Kaka असा नंबर सेव्ह केल्यानंतर मीही त्यांचे नाव विसरलो होतो. पुढे कधी विचारावं अशी गरजही नाही वाटली मला. (Always Maintain Family Relations)

ओळख झाल्यापासून अगदी न चुकता, दररोज सकाळी माझ्या व्हॉट्स ॲपवर कधी फुलं येऊ लागली, तर कधी एखादा सुविचार. पहाटे 4.33 / 5.11 / 3.55 तर कधी 6.21 अशी माझी दररोजची सकाळ काकांच्या या सुंदर मेसेजनं व्हायची. मीही माझ्या परीनं आणि वेळेनुसार Reply करीत होतो. अधूनमधून मंदिराच्या आवारात त्याच बेंचवर बसून गप्पाही व्हायच्या. काय बरा आहेस ना...! हे त्यांचं वाक्य ऐकून आनंद व्हायचा. कधी कधी फोनवर बोलायचे. गेल्या महिन्या दीड महिन्यात मला तशी सवयच होऊन गेली होती. पण साधारण तीन दिवसांपासून हे सारं काही थांबलं होतं. 

काकांच्या ओढीनं आणि एका अनामिक हाकेनं मंदिरात जाऊन विचारपूस केली असता, मला पत्ता मिळाला एका मोठ्या हॉस्पिटलचा. लगोलग तिथं गेलो तर कळलं की, काकांना ICU मध्ये Admit केलं होतं. काकांशिवाय बाकी कोणीच ओळखीचं नसल्यानं, तिथं मला कोणी ओळखेल हा प्रश्नच नव्हता. ICU च्या बाहेर रांगेत ठेवलेल्या खुर्च्या. तिथं  इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्षाला असलेला त्यांचा नातू आणि मुलगा प्रशांत यांची भेट झाली. घरात कोणीही नसताना काकांना अटॅक येऊन गेला होता. आता तब्येत ठीक आहे.... दोन-तीन दिवसात डिस्चार्ज मिळेल, असं जेव्हा कानावर पडलं, तेव्हा कुठं मला हायसं वाटलं. आता मला आणखी एक नवा मित्र भेटला होता -- प्रशांत. मी कोण, काय आणि कुठला, काकांची आणि माझी ओळख कशी झाली, मी हॉस्पिटलपर्यंत कसा पोहचलो हे मी प्रशांत यांना सांगत असताना त्यांनाही हे सगळं अजबच वाटलं. प्रशांत यांच्याशी झालेल्या गप्पांमधून काकांना अटॅक येण्याचं एक कारण एकाकीपण, घुसमट आणि मैत्रीची उणीव असावं असं माझ्या मनाला वाटून गेलं. सगळं काही सुव्यवस्थित असताना, काकांना बोलायला, संवाद साधायला मात्र जवळचं असं कुणीच नव्हतं. 

| Three Stages Of Life | Make Friends|
मित्रांनो, खरंच विचार करण्यासारखं आहे ना हे सारं...! बालपण - तरुणाई आणि वृद्धावस्था हेच तुमच्या माझ्या सर्वांच्या जीवनाचं अंतिम सत्य आहे. आयुष्याच्या या सांजवेळी - सर्वांच्याच नव्हे पण काहींच्या वाटेला येणारी उपेक्षा, एकाकीपण खरंच कठीण असतं. एके काळी जो रुबाब, जी ऐट होती वागण्या-बोलण्यात ती आता राहत नाही. संवाद साधायलाही कुणी जवळचं - प्रेमाचं नसतं. तुमच्या पाहण्यातही असे ' काका ' नक्कीच आले असतील. असो. 

 | Joint Family | Happiness | सुखी कुटुंब |
पूर्वीच्या काळात आपल्याकडे एकत्र कुटुंब पध्दती असायची. त्यावेळी एकेका घरात १५ ते २० माणसे सहज असायची. अशा घरात कोणाच्याच वाटेला असं एकाकीपण येत नसायचं. पण काळ बदलत गेला आणि कुटुंब लहान - अगदी लहान होऊ लागली.  कुटुंबात मुलगा, सून, नातवंडे आपापल्या व्यापात व्यस्त. काही ठिकाणी तर शिक्षण आणि नोकरीच्या निमित्ताने मुले दूरच्या शहरात किंवा  परदेशी असतात. तिथे तर ही समस्या आणखीनच कठीण होऊन जाते. 

मित्रांनो, आपल्या संस्कृतीत मानवी जीवनासाठी चार आश्रम सांगितले आहेत. एक ब्रह्मचर्याश्रम, दोन  गृहस्थाश्रम, तीन वानप्रस्थाश्रम आणि चौथा  संन्यासाश्रम. पण आताशा या शेवटच्या दोन आश्रमांची जागा आता एका नव्या व्यवस्थेने घेतली आहे - वृध्दाश्रम. प्रत्येक मुलगा आणि सुनेला आतल्या आत विचार करायला लावणारी, लाजवणारी ही व्यवस्था वाढतेय, हे मात्र नक्की. 

| Save Friends | Friendship |
मित्रांनो, आपण सगळेही याच रस्त्याने पुढे जाणार आहोत. आपल्या प्रत्येकाच्याच जीवनात Future Planning च्या दृष्टीने घर, पैसा, गाडी हे तर महत्त्वाचं आहेच... पण याच Planning मध्ये आता आणखी एक गोष्ट Add करायला हवी.... ती म्हणजे मित्र - मित्रपरिवार. शेवटी संवाद साधायला महागड्या पेंटनं रंगविलेल्या भिंती, अलिशान कारचे स्टिअरिंग किंवा Furniture उपयोगाचे नाही, तिथं लागतील तुमच्या-माझ्यासारखी माणसं...! मनाच्या कप्प्यात जपलेले मित्र...! 

लिखाणाचा हेतू प्रबोधनाचा किंवा सल्ला देण्याचा नाही, तर आपल्या आसपास दिसणाऱ्या कुटुंबातील या आधारवडांना समजून घेण्याचा, 
Understanding चा आहे. जीवनाच्या वाटेवर अशी काही अनामिक नाती जुळतात. या नात्यांना आपण सर्वांनीच जीवापाड जपायला हवं. छोट्या छोट्या संवादातून वाढवायला हवं. पटतंय का तुम्हाला...! 
********
Previous Post Next Post