* हनीमून कपल्ससाठी सर्वोत्तम लक्षद्वीप!
मनमुराद आनंद घ्या समुद्री सौंदर्याचा!
| Best Place For Honeymoon Couples | Lakshadweep Info In Marathi | Trending Topic Lakshadweep | Sea Sports In Lakshadweep |
मित्र - मैत्रिणींनो, सस्नेह नमस्कार!
आपली भारतभूमी निसर्ग सौंदर्य आणि प्रेक्षणीय स्थळांची (Tourist Points) सोनेरी खाण आहे, असे म्हणतात, ते उगाच नाही. भारतात अशी अनेक ठिकाणे आहेत, जी खरोखर निसर्ग संपदेने (Natural Beauty) नटलेली आहेत. दरवर्षी पर्यटनासाठी लाखो विदेशी पर्यटक (Foreign Tourists) भारतातील विविध स्थळांना भेटी देतात. विदेशात जाण्याची गरजच भासणार नाही एवढे सुंदर नजारे भारतात बघायला मिळतात. सध्या असेच एक प्रेक्षणीय स्थळ चर्चेत आले (Trending Topic In India) आहे... ते म्हणजे लक्षद्वीप बेट समूह (Lakshadweep Island). या लेखात आपण माहिती (Lakshadweep Info In Marathi) घेणार आहोत याच अतिशय सुंदर आणि विलोभनीय बेटांविषयी. हनीमून टूर पॅकेजेस आणि हनीमून कपल्ससाठी सर्वोत्तम ठिकाण (Best Place For Honeymoon Couples) म्हणजे लक्षद्वीप! तुम्हीही अवश्य भेट द्या आणि मनमुराद आनंद घ्या समुद्री सौंदर्याचा!
* लक्षद्वीप येथील नयनरम्य बेट
| Beautiful Islands In Lakshadweep | Honeymoon Destination Lakshadweep | Couple Tours | Visit To Lakshadweep | Adventures Tour In Lakshadweep |
लक्षद्वीप हे पर्यटन, मधुचंद्र सहल (Honeymoon Tour) आणि समुद्री सौंदर्याची आवड असणाऱ्या पर्यटकांसाठी भारतातील सर्वोत्तम ठिकाण आहे. लक्षद्वीप हा 36 बेटांचा समूह अतिशय सुंदर निसर्ग, निळाशार समुद्र आणि स्वच्छ समुद्र किनारा यांनी वेढलेला सुंदर परिसर आहे. मल्याळम आणि संस्कृतमध्ये लक्षद्वीप या नावाचा अर्थ होतो 'एक लाख बेट'. हा भारतातील सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश (Union Territory Of India) होय. येथील समुद्रात आढळणारी प्रवाळ बेटे अतिशय विलोभनीय आणि मन मोहून घेणारी आहेत. येथे 12 प्रवाळमय, 3 खडकमय, 5 जलवेष्टित किनारे आणि लोकवस्ती वस्ती असलेली 10 बेटे आहेत. ही बेटे जवळपास 32 स्क्वेअर किलोमीटरचा परिसर व्यापून आहेत. लक्षद्वीपची राजधानी (Capital City Of Lakshadweep) कावरत्ती आहे. हे या केंद्रशासित प्रदेशातील प्रमुख शहर आहे.
* कुठे आहे निसर्गरम्य लक्षद्वीप
| Where Is Lakshadweep | Tourist Season In Lakshadweep | Good Time To Visit Lakshadweep | When To Visit Lakshadweep |
लक्षद्वीपमधील सर्व बेटे केरळ (Kerala) मधील कोची (Kochi City) येथून जवळपास 220 ते 440 किलोमीटर अंतरावर अरबी समुद्रात (Great Arabian Sea) आहेत. येथील निसर्ग सौंदर्य, हिरवाई, निसर्गाची सुंदर दृश्ये, नितळ पारदर्शी आणि स्वच्छ समुद्रकिनारे, भरपूर वनस्पती आणि प्राणी यांनी लक्षद्वीप समृध्द आहे. लक्षद्वीप हा अनेक बेटांचा समूह आहे आणि येथे तुम्ही अनेक बेटांना भेट देऊ शकता. प्रवास आणि राहण्याची गैरसोय व्हायला नको म्हणून तुम्ही ट्रॅव्हल एजंट्सची मदत घेणे उत्तम ठरू शकेल. लक्षद्वीपला जाण्यासाठी तुम्ही आधी ट्रॅव्हल एजन्सीची (Tour Operatiors | Leading Tour Companies | Honeymoon Tour Operaters) मदत घेऊ शकता. येथे इतर ठिकाणांच्या तुलनेत पर्यटकांची तुडुंब गर्दी नसते. त्यामुळे शांतता आणि प्रायव्हसीचा मोठा आनंद तुम्ही जोडीने घेऊ शकाल. असे असले तरीही सुयोग्य प्लॅनिंग करून लक्षद्वीप (Lakshadweep Island) बेटांवर जाण्यापूर्वीच राहण्यासाठी हॉटेलची (Hotels In Lakshadweep) बुकिंग करावी.
* लक्षद्वीप येथे जाण्यासाठी घ्यावी लागते परवानगी !
| Government Permission Has To Be Taken To Visit Lakshadweep | Permission For Visit | Government Entry Permit For Lakshadweep | Lakshadweep Entry Permit |
लक्षद्वीप बेटांना भेट देण्यापूर्वी तेथील स्थानिक यंत्रणेची परवानगी घेणे आवश्यक आहे. लक्षद्वीप
टुरिझमच्या अधिकृत वेबसाइटवर तशी माहिती दिली आहे. त्यानुसार, लक्षद्वीपला जाण्यासाठी किंवा राहण्यासाठी तेथील यंत्रणेची पूर्वपरवानगी (Permit For Visit Lakshadweep) आवश्यक आहे. त्या भागात रहिवास करणाऱ्या अनुसूचित जाती-जमाती, लोकसमूह सुरक्षित राहावेत, त्यांच्या रोजच्या जनजीवनात कोणतेही अडथळे येऊ नयेत, यासाठी ही परवानगी घेणे आवश्यक आहे. यासाठी घ्यायची असते वास्तविक, परमिट देण्यामागचे कारण तेथे राहणाऱ्या अनुसूचित जमातींचे संरक्षण आहे.
* कशी घ्यायची परवानगी ?
| Process Of Government Permit To Visit Lakshadweep | How To Get Permission To See Lakshdweep |
लक्षद्वीपला जाण्यासाठी किंवा राहण्यासाठी तेथील यंत्रणेची पूर्वपरवानगी (Government Permit For Visit Lakshadweep) कशी घ्यायची, हे आपण पाहू. ही आवश्यक
सरकारी परवानगी पर्यटन विभागाच्या अटी व
नियमानुसार मिळते. ही प्रवेश परवानगी ऑनलाइनसुध्दा उपलब्ध आहे. एक विशिष्ट फॉर्म भरून प्रशासनाकडे जमा करावा लागतो. त्या परमिटसाठी भारतीयांना पोलिस आयुक्तांचे पोलिस क्लिअरन्स प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. लक्षद्वीप येथे पोहोचल्यावर पर्यटकांना ते सादर करावे लागते. लक्षद्वीप बेटावर जाण्यासाठी, तुम्ही ePermit देखील घेऊ शकता. त्यासाठीची वेबसाईट पुढीलप्रमाणे :
epermit.utl.gov.in
या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन पर्यटक सविस्तर माहिती मिळवू शकतात.
* लक्षद्वीप येथील हवामान
| Weather On Lakshadweep Island | Tourist Season In Lakshadweep | Sea Sports In Lakshadweep |
लक्षद्वीपमध्ये उष्णकटिबंधीय हवामान आहे. येथील सरासरी तापमान 27 °C ते 32 °C असते. एप्रिल आणि मे हे सर्वात उष्ण असतात. त्यावेळी येथील सरासरी तापमान 32 °C असते. येथील हवामान साधारणपणे दमट आणि आल्हाददायक असते. पावसाळ्यात जहाजावर आधारित पर्यटन बंद असते. ऑक्टोबर ते मार्च हा बेटांवर जाण्यासाठी उत्तम काळ आहे. नैऋत्य मान्सून जून ते ऑक्टोबरदरम्यान सक्रिय असतो आणि सरासरी पाऊस 10-40 मिमी पडतो. येथे वर्षातून 80-90 पावसाळी दिवस असतात. ऑक्टोबर ते मार्च या काळात वारे सौम्य असतात. लक्षद्वीप हा बेटांचा समूह भारताच्या नैऋत्य किनार्यापासून सुमारे 200 किलोमीटर अंतरावर अरबी समुद्राच्या निळ्या पाण्यात आहे. लक्षद्वीप हे नैसर्गिक सौंदर्यासाठी ओळखले जाते. येथे तुम्ही स्कुबा डायव्हिंग आणि स्नॉर्कलिंग यासारखे रोमांचक खेळ (Adventures Sea Sports) खेळून साहसाचा वेगळा आनंद घेऊ शकता.
* लक्षद्वीपला कसे जायचे?
| How To Go Lakshadweep | Air Flights To Lakshadweep | Trains To Lakshadweep |
कोणत्याही मोठ्या शहरातून विमानाने लक्षद्वीप येथे जाता येते. एक गोष्ट मात्र पर्यटकांनी लक्षात घ्यावी, तुम्ही कोठूनही गेलात तरी लक्षद्वीपसाठी कोणतीही थेट विमान उड्डाणे (Direct Flights To Lakshadweep) नाहीत. यासाठी तुम्हाला केरळमधील कोचीला (Kochi City In Kerla) जावे लागेल. यानंतर तुम्ही कोची ते अगट्टी असा प्रवास विमानाने करू शकता. येथून तुम्ही मिनिकॉय बेट, काल्पेनी बेट आणि इतर बेटांवर बोटीने जाऊ शकता. मात्र, कोचीहूनही बोटीची सोय आहे. कोची येथून अनेक जहाजे उपलब्ध आहेत. समुद्राचा सुंदर प्रवास घडवून ही जहाजे तुम्हाला लक्षद्वीपला घेऊन जातील. केरळमधील थिरूअनंतपुरम (Thiruvananthapuram), कोलम (Kollam), कोची (Kochi) आणि कोझीकोड (Kozhikode) या प्रमुख चार शहरांमध्ये कोची (Kochi) हे सर्वाधिक सोयीचे शहर आहे.
---
हा लेख आपल्याला आवडला तर नक्कीच शेअर करा.
आपले मनःपूर्वक धन्यवाद !
-----------------------------------