* मैं अटल हुं ! येत आहे अटलजी यांचा प्रेरणादायी जीवनपट
| Main Atal Hun | Biopic Of Atal Bihari Vajpayee | Upcoming Movies Review |Ex. Prime Minister Of India | Mai Atal Hoon Info In Marathi | Trending | New Release |
---
मित्र - मैत्रिणींनो सस्नेह नमस्कार!
आपली भारत भूमी नररत्नांची खाण आहे. या भारतात अशी अनेक व्यक्तिमत्वे होऊन गेली आहेत, ज्यांनी आपल्या कार्यकर्तृत्व, आचार - विचार, संस्कार आणि आदर्श वागण्यातून जनमानसाच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. जीवनात कितीही कठीण प्रसंग आले, तरी ज्यांनी कधी आपला सडेतोडपणा सोडला नाही, ज्यांनी कधी आपल्या तत्वांना, आदर्शांना तिलांजली दिली नाही, स्वार्थासाठी कुठलीही तडजोड केली नाही...! अशा काही आदर्श व्यक्तीमध्ये सर्वात वरच्या क्रमांकावर नाव घेतले जाते... माजी पंतप्रधान स्वर्गीय श्री अटल बिहारी वाजपेयी (Ex. Prime Minister Of India) यांचे. राजकारणात, सत्ताकारणात विरोधकही ज्यांचा मोठेपणा मान्य करतात, एवढे महान होते अटलजी. त्यांच्या जीवन प्रवासावर आधारित (Biopic Of Atal Bihari Vajpayee) एक सुंदर सिनेमा येत्या 19 जानेवारी 2024 रोजी देशभरातील सिनेमागृहात प्रदर्शित (Release On 19 January 2024) होत आहे, त्याचे नाव आहे - मैं अटल हुं (Main Atal Hun). आज आपण जाणून घेणार आहोत मैं अटल हुं (Main Atal Hun) या सिनेमाविषयी.
* मैं अटल हुं (Main Atal Hoon | Upcoming Movies Review | Info In Marathi | Pankaj Tripathi | Paula Mcglynn |
* निर्माते : विनोद भानुशाली, संदीप सिंग, कमलेश भानुशाली
* दिग्दर्शक : रवी जाधव
* कलाकार : पंकज त्रिपाठी, पॉला मॅकग्लिन,
* संगीत : पायल देव, सलीम - सुलेमान, कैलाश खेर, अमित राज
* कथा / पटकथा : रवी जाधव, ऋषी वीरमणी
* अटलजींच्या भूमिकेत कसदार अभिनेता पंकज त्रिपाठी
(Pankaj Tripathi As Atal Ji In Movie | Great Actor Pankaj Tripathi)
तब्बल तीन वेळा देशाच्या पंतप्रधान पदाची सूत्रे सांभाळणारे तत्वनिष्ठ राजकारणी स्व. श्री अटलबिहारी वाजपेयी यांची भूमिका हिंदी सिनेमा जगतात अगदी थोड्या कालावधीत नावाजलेले अभिनेते पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) यांनी केली आहे. मैं अटल हुं (Main Atal Hoon) सिनेमाचे ट्रेलर (Teaser Of Main Atal Hoon) बघत असताना, या भूमिकेसाठी पंकज त्रिपाठी यांनी घेतलेली मेहनत लक्षात येते. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी हे सुंदर काव्यरचना (Famous Poems Of Shri Atal Bihari Vajpayee Ji) करीत असत. त्यांची संसदेतील भाषणे अभ्यासपूर्ण आणि अस्खलित हिंदीत असत. त्यांच्या अनेक काव्य रचना आजही तेवढ्याच प्रेरक आहेत. अटलजी यांचे हावभाव, बोलण्याची लकब, हास्यविनोद करण्याची शैली खरोखर अफलातून होती. पंकज त्रिपाठी यांनी ही भूमिका साकारताना अगदी लहान सहान बारकावे लक्षात घेतले आहेत. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जीवनावर आधारित चित्रपट मैं अटल हुं (Main Atal Hun) येत्या 19 जानेवारी 2024 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित (Release On 19 January 2024) होणार आहे.
* माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी जी यांचा प्रेरणादायी जीवनपट
(Motivational Story Of Ex. Prime Minister Atal Bihari Vajpayee Ji | Biopic Of Atal Ji | Great Indian Leader)
मैं अटल हुं (Main Atal Hun) सिनेमाचे निर्माते (Producers) विनोद भानुशाली, संदीप सिंग आणि कमलेश भानुशाली यांनी याद्वारे अत्यंत सुंदर चित्रपटाची भेट भारतीय रसिकांना दिली आहे. अटलजींच्या जीवनातील सर्व प्रमुख घटनांची दखल यात घेण्यात आली असल्याचे दिसते. जनसंघाची स्थापना, भारतीय जनता पक्षाची सुरुवात, आणीबाणी, राम मंदिर संघर्ष, रथयात्रा, पंतप्रधान पदावर असताना केलेली संस्मरणीय भाषणे, प्रमुख निर्णय अशा विविध प्रसंगांचे चित्रण सुरेख आहे. या सिनेमातील एक संवाद - दलो की इस दलदल मे कमल खिलाना होगा - खूपच प्रभावी वाटतो. दिग्दर्शक (Director) रवी जाधव यांनी चित्रपटाच्या सजीवतेसाठी अपार कष्ट घेतले आहेत. मैं अटल हुं (Main Atal Hun) सिनेमाचे अधिकांश शूटिंग प्रखर उन्हाळ्यात झाले. लखनौ परिसरात बहुतांश शूटिंग झाले आहे. अभिनेते पंकज त्रिपाठी यांनीही भूमिकेत प्राण ओतले आहेत. चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अनेक दिवस त्यांनी केवळ खिचडी एवढाच आहार घेतला. एका मुलाखतीत त्यांनी स्वतःच चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचे अनेक रंजक किस्से सांगितले. त्यातून ही खिचडी समोर आली.
* सोनिया गांधी यांची महत्त्वाची भूमिका
(Important Role Of Sonia Gandhi | Paula Mcglynn As Sonia Gandhi In Main Atal Hun)
हिंदी सिनेमात एकापेक्षा एक सरस भूमिका साकारणारे हरहुन्नरी अभिनेते (Versatile Actor In Hindi Cinema) पंकज त्रिपाठी यांनी आजपर्यंत अनेक सुपरहिट सिनेमे केले आहेत. मैं अटल हुं सिनेमात त्यांनी अशीच एक आव्हानात्मक भूमिका केली आहे. या सिनेमात सोनिया गांधी हेदेखील एक महत्वाचे कॅरेक्टर आहे. तत्कालीन राजकीय पटावर सोनिया गांधी यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली आहे. त्यामुळे त्यांच्या भूमिकेसाठीही तशीच तोडीस तोड अभिनेत्री असणे आवश्यक ठरते. काँग्रेस नेत्या सोनिया गांधींची भूमिका भाडिपा अर्थात भारतीय डिजिटल पार्टी फेम पॉला मॅकग्लिन (Bhadipa Fem Paula Mcglynn) या गुणी अभिनेत्रीने केली आहे. हुबेहूब सोनिया गांधी भासतील अशी व्यक्तिरेखा त्यांनी साकारली आहे. सिनेमाच्या छोट्याशा टिझरमध्ये ही गोष्ट लगेच जाणवते. अगदी सोनिया गांधींसारखे गेटअप, मेकअप, त्यांच्यासारखे हावभाव, राहणीमान, लूक असे सगळे काही खूपच छान जुळून आले आहे. पॉला मॅकग्लिन यांचा जन्म कॅनडा येथे झाला आहे. अनेक वेब सिरीज, OTT प्लॅटफॉर्म, चॅनल्सवर विविध शोजमध्ये त्यांनी आपल्या कसदार अभिनयाने वाहवा मिळविली आहे.
* काय आहे भाडिपा?
(What Is Bhadipa | Info About Bhadipa | Bhadipa In Marathi)
मैं अटल हुं (Main Atal Hoon) सिनेमात सोनिया गांधी यांच्या भूमिकेत दिसणाऱ्या पॉला मॅकग्लिन (Paula Mcglynn) यांच्याशी निगडित असलेले भारतीय डिजिटल पार्टी हे एक मराठी यूट्यूब चॅनेल आहे. भाडिपा चॅनेलने विविध मनोरंजक कार्यक्रमांची निर्मिती केली आहे. कौटुंबिक, हास्य विनोद, खवैयेगिरी, संगीत व्हिडिओ असे जीवनाला स्पर्श करणारे विविध विषय या कार्यक्रमांच्या माध्यमातून हाताळण्यात आले आहेत. सोशल मीडियावर (Facebook | Youtube) भाडिपाने चांगलीच लोकप्रियता मिळवली आहे. या चॅनेलच्या स्थापनेत पॉला मॅकग्लिन (Paula Mcglynn) यांच्यासोबत सारंग साठे आणि अनुषा नंदकुमार हेही आहेत.
* मैं अटल हुं (Main Atal Hun) येत्या 19 जानेवारी 2024 रोजी सिनेमागृहात!
(Release On 19 January 2024 | Upcoming Movies | Trending Topic | Main Atal Hoon)
भारतीय राजकारणाच्या पटलावर आपल्या अद्वितीय बुद्धिमत्ता आणि कणखर भूमिकेने अनोखा ठसा उमटविणारे भारतीय जनता पक्षाचे थोर नेते स्व. अटल बिहारी वाजपेयी यांच्या जीवनावर आधारित मैं अटल हुं (Main Atal Hun) सिनेमा येत्या 19 जानेवारी 2024 रोजी देशभरातील सिनेमागृहात प्रदर्शित होत आहे. चला, तर मग भेटूया जवळच्या सिनेमागृहात.
आपले मनःपूर्वक धन्यवाद!
---------