* श्री रामलला मूर्ती शालिग्राम दगडाची का? शालिग्राम म्हणजे काय?
| What Is Shaligram | Importance Of Shaligram Stone | Worship Of Shaligram |
----
मित्र - मैत्रिणींनो, सस्नेह नमस्कार!
संपूर्ण भारतवर्ष ज्या क्षणाची मोठ्या आतुरतेने प्रतीक्षा करीत आहे, तो मंगल क्षण हळू हळू जवळ येत आहे. आजपासून फक्त चार दिवस आणखी प्रतीक्षा करावी लागेल अन् येत्या सोमवारी 22 जानेवारी 2024 रोजी भव्य प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या वेळी (Ayodhya Ram Mandir Pranpratishtha Ceremony) भगवान श्रीराम आपल्या सुवर्ण रत्नजडित सिंहासनावर विराजमान होतील. आजच्या या ब्लॉगमध्ये आपण माहिती घेणार आहोत महान शिल्पकार अरुण योगिराज
(Great Artist Arun Yogiraj) यांच्याविषयी. तसेच शालिग्राम दगडाचे महत्त्व, शालिग्राम म्हणजे काय? (What Is Shaligram | Importance Of Shaligram Stone) आणि शालिग्राम पूजन (Shaligram Stones Worship) याविषयी.
* श्री राम लल्ला मूर्तीचे आगमन
(Shri Ram Mandir Murti Pranpratishtha Ceremony)
म्हैसूर (Mysore) येथील प्रख्यात मूर्तिकार
श्री. अरुण योगिराज (Arun Yogiraj Shri Ram Murti) यांनी बनविलेली शालिग्राम दगडातून साकारलेली (Shaligram Stone) श्री रामललाची मूर्ती (Ayodhya Ram Mandir Murti | Shri Ram Lala) विराजमान होणार आहे. श्री राम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या वेळापत्रकानुसार बुधवारी 17 जानेवारीला या सुंदर आणि आकर्षक अशा मूर्तीला मंदिर परिसरात आणण्यात आले.
* महान शिल्पकार अरुण योगिराज
(Great Artist Arun Yogiraj | Shilpkaar Arun Yogiraj | Shri Ram Lalla Murti)
म्हैसूर वासियांसाठी हा खरोखर आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आहे. म्हैसूर येथील शिल्पकार अरुण योगिराज हे अत्यंत सुरेख शिल्प घडवणारे मान्यवर कलाकार आहेत. याआधी त्यांनी केदारनाथ येथे आदि शंकराचार्य यांचा पुतळा (Aadi Shankaracharya Statue), तर देशाची राजधानी दिल्लीमध्ये कर्तव्य पथावर उभा असलेला नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा भव्य पुतळा (Netaji Subhash Chandra Bose Statue) आपल्या कौशल्यपूर्ण हातातून घडवला आहे.
* श्री राम मूर्ती शालिग्राम दगडाचीच का? काय महत्त्व आहे शालिग्राम दगडाचे? शालिग्राम म्हणजे काय?
(What Is Shaligram | Importance Of Shaligram Stone | Shri Ram Murti And Shaligram Stone)
अयोध्या धाम येथील भव्य श्री राम मंदिर (Ayodhya Dham Ram Mandir) निर्मितीत भगवान श्रीराम यांची सासुरवाडी म्हणजेच नेपाळच्या जनकपूरमधील जानकी मंदिराचे (Janki Mandir In Nepal) मोठे योगदान आहे. भगवान श्रीरामांची आकर्षक मूर्ती बनवण्यासाठी नेपाळमधील कालिगंडकी नदीतल्या (Kali Gandaki River In Nepal) दोन मोठ्या शालिग्राम शिळा (Shaligram Stones) अयोध्येत आणण्यात आल्या होत्या. अतिशय भव्य आणि प्रचंड आकाराच्या 350 ते 400 टन वजनाच्या या शिळा अयोध्या नगरीत जनकपूर (Janakpur In Nepal) आल्या. श्री रामलला यांची ही सुंदर मूर्ती शालिग्राम दगडातून का घडवली गेली, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर येथे आपण जाणून घेणार आहोत शालिग्राम दगडाविषयी (Info About Shaligram Stones | Info In Marathi | Importance Of Shaligram).
* शालिग्राम हे भगवान विष्णूचे मूर्ती स्वरूप
(Shaligram Stones Related To Lord Vishnu | Symbol Of Lord Vishnu | Shaligram In Pooja Ghar | Worship Of Shaligram)
अनेक कुटुंबाच्या घरातल्या देवघरात (Pooja Ghar) जांभळाच्या आकाराचे छोटे छोटे दगड तुम्ही नक्कीच बघितले असतील. मुख्य देवांपासून काही अंतरावर एका छानशा तबकडीत हे दगड ठेवलेले असतात. त्यांची दररोज पूजाअर्चा केली जाते. त्यांना गंध, अक्षता आणि फुले अर्पण केली जातात. हे छोटे छोटे आकाराचे दगड म्हणजेच शालिग्राम (Small Stones Of Shaligram) होत. हिंदू धर्मात शालिग्रामला विशेष महत्त्व आहे. शालिग्राम हे भगवान विष्णूचे मूर्ती स्वरूप मानले जाते. कडक सोवळे असल्याने ते इतर देवापासून थोडेसे दूर ठेवण्याची पद्धत आहे. ही पद्धत कुटुंबात पिढ्या न पिढ्या चालत आलेली आहे. हे दगड मुख्यतः नेपाळमधील नदीमध्ये आढळतात. नेपाळच्या कालिगंडकी नदीत (Kali Gandaki River In Nepal) त्यांचे प्रमाण अधिक आहे, असे सांगितले जाते. शालिग्रामचे सुमारे 33 प्रकार आहेत, त्यापैकी 24 प्रकारचे शालिग्राम भगवान विष्णूच्या 24 अवतारांशी संबंधित असल्याची धारणा आहे. असे मानले जाते की, ज्या घरामध्ये शालिग्राम असेल आणि ज्या घरात त्यांची नित्यनियमाने पूजा केली जाते, त्या घरात दुःख आणि वेदनांचा वास नसतो. शालिग्राम त्या त्या कुटुंबातील सर्व दुःखांचा समूळ नाश करतात. मात्र शाळिग्राम पूजनाचे (Shaligram Pooja | Worship Of Shaligram) काही महत्त्वपूर्ण नियम पाळले गेले पाहिजेत.
* कोणते नियम आहेत शाळिग्राम पूजनाचे? (Shaligram Pooja | Worship Of Shaligram)
तुम्हीही आपल्या देवघरात (Pooja Ghar) शालिग्राम (Shaligram Stones | Bhagvan Shaligram) ठेवू शकता. फक्त त्या संबंधीचे नियम तुम्हाला पाळावे लागतात.
* असे आहेत काही नियम :
* शालिग्राम (Shaligram Stones) कधीही कोणाकडून भेट म्हणून घेऊ नये. कोणी तुम्हाला हे दगड गिफ्ट (Gift) म्हणून देत असेल तर स्वीकार करू नका. हे दगड तीर्थक्षेत्र ठिकाणी किंवा ऑनलाईन Amezon किंवा Flipcart येथूनही मागवता येतात.
* शालिग्राम (Shaligram Stones) स्व कमाईतून मिळवलेल्या पैशातून विकत घ्यावेत. गिफ्ट म्हणून मिळालेल्या या शालिग्राम (Shaligram Stones) चा फायदा आपल्याला न होता, ते देणाऱ्याला होतो.
* तुमच्या घरात तुम्ही शालिग्राम (Shaligram Stones) स्थापित केले असेल, तर मांस (Non Veg Food), दारू (Liquer, Whisky), सट्टा जुगार (Cards Game, Gambelling) अशा वाईट गोष्टींपासून दूर राहा.
* शालिग्रामची (Shaligram Stones) पूजा करताना पांढरी अक्षता कधीही वापरू नका. ही अक्षता हळदीने पिवळ्या रंगात रंगवून मगच अर्पण करा.
* घरच्या देवघरात (Pooja Ghar) शालिग्रामची स्थापना केली असेल, तर त्यांची नित्य पूजा करावी.
* शालिग्राम (Shaligram Stones) नेहमी तुळशीच्या रोपाजवळ ठेवावा. असे केल्याने माता तुलसी आणि भगवान विष्णू यांची कृपा प्राप्त होते.
* शालिग्राम देवतेला (Shaligram Stones) दररोज पंचामृताने स्नान घालावे. रोजच्या पूजेने घरात सुखसमृद्धी येते.
* शालिग्रामची (Shaligram Stones) पूजा करताना चंदनासह तुळशी पत्राचा वापर करावा.
* असा आहे प्राणप्रतिष्ठा सोहळा कार्यक्रम
| Shedule Of Pranpratishtha | Pranpratishtha Vidhi | Ram Murti Sthapana |
अयोध्या नगरीत 16 जानेवारी 2024 पासून प्राणप्रतिष्ठा सोहळा सुरू झाला आहे. त्यात मुख्य विधी म्हणजे 22 जानेवारी 2024 रोजी श्री रामललाचा अभिषेक होणार आहे.
* असा आहे संपूर्ण प्राणप्रतिष्ठा सोहळा :
* सातदिवसीय विधी कार्यक्रम
| 7 Days Shedule Of Pranpratishtha | Sampurna Vidhi |
* 16 जानेवारी : श्री राम जन्मभूमी मंदिर ट्रस्टने नियुक्त केलेल्या यजमानाकडून प्रायश्चित्त, शरयू नदीच्या काठावर दशविद स्नान, विष्णूपूजा आणि गोदान. (संपूर्ण मंगल विधी संपन्न)
* 17 जानेवारी : श्री रामललाच्या मूर्तीसह भव्य मिरवणूक. शरयू नदीचे पवित्र जल मंगल कलशात घेऊन भक्त मंदिरात पोहोचतील. (संपूर्ण मंगल विधी संपन्न)
* 18 जानेवारी : श्री गणेश अंबिका पूजन, वरुण पूजा, मातृका पूजा, वास्तुपूजा इत्यादी विधींना ची सुरुवात.
* 19 जानेवारी : अग्नी प्रतिष्ठापना, नवग्रह स्थापना आणि होमहवन विधी.
* 20 जानेवारी : शरयूच्या पवित्र जलाने मंदिराचे गर्भगृह धुतल्यानंतर वास्तुशांती आणि अन्नाधिवास विधी.
* 21 जानेवारी : पवित्र 125 कलशांसह दिव्य स्नानानंतर शयाधीश केले जातील.
* 22 जानेवारी : सकाळच्या पूजेनंतर दुपारी मृगशीर्ष नक्षत्रात रामलल्लाचा अभिषेक केला जाईल.
शुभमुहूर्त
दुपारी 12:29:08 पासून 12:30:32 पर्यंत
सूक्ष्म मुहूर्त : 1 मिनट 24 सेकंद म्हणजेच 84 सेकंद
-----
शालिग्राम या संकल्पनेविषयी लोकांच्या मनात असलेले प्रश्न, उत्कंठा सोडवण्याचा प्रयत्न या लेखातून केला आहे. शालिग्राम स्थापना, शालिग्राम पूजन आणि इतर काही विधी आणि सामग्री यासाठी वाचकांनी आपल्या जवळच्या वेदशास्त्रसंपन्न गुरुजी किंवा पंडित यांचा सल्ला आणि मार्गदर्शन अवश्य घ्यावे.
मनःपूर्वक धन्यवाद...!
आपणा सर्वांना भगवान श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या मंगलमय शुभेच्छा!
| राम | राम | राम | राम | राम | राम | राम |