अरे विनय... कुछ फाईल्स और Documents मैने तुम्हे Mail किए हैं... उन्हे जरा देख ले ना... और हां... तुम तो जानते हो पल्लवी कि शादी हैं... मुझे वहा भी देखना हैं... तुम जो उचित समझो वैसे बदलाव कर ले ना... कल मुझे चेन्नई जाना है... ठीक है ना भाई... चलो फोन रखता हू.... असे म्हणून त्रिपाठी सरांनी फोन ठेवला. आणि सुटीच्या दिवशी घरीच रमलेल्या विनयची पाऊले Laptop घेण्याकडे वळली.
साधारण तीन वर्षांपासून विनय या कंपनीत काम करीत होता. या तीन वर्षांत तो त्रिपाठी सरांचा हात, डोळे आणि मेंदू असं सर्व काही झाला होता. काम, काम आणि फक्त काम या तत्त्वावर विनयची वाटचाल सुरू होती. डोळ्यात प्रगतीचे स्वप्न घेऊन फिरणारा विनय तितकासा समाधानी नव्हता. त्याला आणखी पुढं जायचं होत. मोठं व्हायचं होतं. त्यासाठी प्रयत्नही सुरू होते. एक-दोन ठिकाणी त्याला बोलावणंही आलं होतं. पण त्याचं मन त्याला Job Change करण्याची संमती देत नव्हतं.
कंपनीत कामावर असताना विनय मन लावून काम करायचा. जोवर पूर्णतः Satisfaction होत नाही, तोपर्यंत तो बेचैन असायचा. एकदा का काम Fulfill झालं की मग आपला उजवा हात छातीच्या डाव्या बाजूवर आपटून तो Done म्हणायचा, ही त्याची खासियत.
त्रिपाठी सरांनी पाठविलेले Documents आणि फाईल्सवर त्याने तब्बल पाच तास काम केले. चेन्नईला होणाऱ्या मीटिंगमधलं ते Presentation होत. कोविडनंतरच्या काळात कंपनीची काय Strategy असेल, Market Share कसा वाढवता येईल वगैरे... काम संपवल्यानंतर विनयने त्याच्याच Style ने Done केलं आणि त्रिपाठी सरांना Mail केला. दुसऱ्या एका कंपनीचं Offer Letter आज सकाळीच Mail Box मध्ये येऊन पडलं होतं, पण विनयने त्यास अद्यापही Reply दिला नव्हता.
सोचो दिलसे... मगर सूनो दिमाग की... असं एक सूत्र आहे, पण विनयचा भरवसा त्याच्या मनावर जास्त होता. पुढचे दोन-तीन दिवस कामात असेच निघून गेले आणि Friday ला रात्री नऊ-साडेनऊ वाजता विनयला त्रिपाठी सरांचा कॉल आला.... अरे... कैसे हो विनय... भाई तुम तो छा गये... चलो, मिठाई तय्यार रखो. एक Good News हैं भाई तुम्हारे लिए... अब सिल्वासा निकलने की तैयारी करो... महातो साब ने तुम्हे Plant Head चुना हैं... सून रहे हो ना विनय... Congrats Dear...!!! विनयने थँक यू सर... म्हणून फोन ठेवला. पुन्हा एकदा आपल्या Style ने Done केलं... मन्या... थँक्स यार... म्हणत....! मनानं दिलेला दिलासा आता खरा फळाला आला होता.
मेंदू काय सांगतोय याकडे दुर्लक्ष करून मनाचा Advice घेणारे तुमच्या-आमच्यासारखे आणि विनयसारखे अनेक असतील तुमच्याही परिचयात. बुद्धीच्या बळावर ज्यांना साथ मिळाली मनाची... अंतर्मनाची...! याच मनःशक्तीच्या सहयोगानं अनेक जण गीत-संगीताच्या दुनियेत रमले आहेत, तर काही जण Sound... Camera... Action च्या विश्वात...! खरी गंमत आहे की नाही ही मनाची. मनःशक्ती का काय म्हणतात ती हीच...!
श्री समर्थ रामदास स्वामी यांच्या दासबोध ग्रंथात याविषयी एक सुंदर वचन आहे, ते असे -
मना गुज रे तुज हे प्राप्त झाले ।
परी अंतरी पाहिजे यत्न केले ॥
सदा श्रवणे पाविजे निश्चयासी ।
धरी सज्जनसंगती धन्य होसी ॥
--------------------------
- *संदीप प्रभाकर कुलकर्णी, औरंगाबाद.*
*((आवडल्यास नक्की शेअर करा... धन्यवाद...!))*
