फुसके फटाके !
जुगाडात्मक जीवनाचा प्रारंभ
(Diwali Crackers | Story Of Diwali | Diwali Katha)
***
मित्रांनो, खरंच बालपण अगम्य असतं, अद्भुत आणि रम्य असतं. बालपणीच्या (Childhood Memories) एक एक आठवणी हसायला तरी लावतात किंवा अंतर्मुख तरी करतात. अर्थात सर्वांचं बालपण सारखंच असतं असं नाही, पण ते बालपण मात्र असतं हे नक्की. निरागस... निष्पाप... अन् आनंद (Happy Life) देणारं. आता पन्नाशीच्या उंबरठ्यावर असताना रिकाम्या वेळात मनात आठवणींचा पूर येतो आणि हे सगळं सांगावं तरी कुणाला असा विचार मनात येतो. असाच एक किस्सा तुमच्याशी शेअर करतो आहे. कदाचित तुमच्या आणि आमच्या बालपणात काही ना काही सारखं नक्कीच सापडेल. तुम्ही खुल्या दिलाने अगदी मनमोकळेपणाने सांगावं अशी अपेक्षा आहे.
* दिवाळीचे मोकळे दिवस !
(Diwali Memories | Diwali Moments | Phatake | Happy Diwali)
दिवाळी कधी चार दिवसांची असते, तर कधी पाच दिवसांची. दोन तिथी एकत्रही येतात, जशा यावर्षी आल्या आहेत - नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन. असेच दिवाळीचे सुंदर दिवस आमच्या बालपणातही असायचे. एखादा मोकळा दिवस असला की सकाळपासूनच आमची शोध मोहीम सुरू व्हायची. आजची पोरं हसतील कदाचित, पण त्या काळात आजच्यासारखी संपन्नता नव्हती. आणि असली तरी बालपणीचा एक किडा प्रत्येक बालकाच्या डोक्यात अवश्य वळवळ करीत असायचा. हां... तर दिवसभरात आम्ही शोधायचो फुसके फटाके. न उडालेले. वात लावूनही न फुटलेले. यात सगळंच असायचं. झेब्रा (Zebra Fatake), बॉम्ब (Bomb), सुतळी बॉम्ब, अनार (flower shower), जमीन चक्कर वगैरे. हे सगळे फटाके गोळा करायचे आणि एखाद्या पडक्या वाड्यात झाडाखाली आम्ही सारे जमायचो. मग एक एक फटका तपासून त्यातले चांगले वेगळे करायचे. जे खरेच फुसके होते... म्हणजे Company Fault असे टाकून द्यायचे आणि मग सुरू व्हायची तयारी दारू काढायची. एक एक फटका पिळून त्यातली दारू एका कागदावर काढायची. या सगळ्या रिकाम्या उद्योगात आमचे चांगले चार पाच तास आरामात कटायचे. या रिकाम्या उद्योगातही काही मित्र कामकरी तर काही डोकं लावणारे असायचे.
हा सगळा उद्योग घरापासून दूर कुठे तरी बसून सुरू असायचा. कारण काय, तर घरच्यांना आमचा पत्ताही लागू नये. फुसके फटाके (Fuske Fatake) गोळा करून त्यातली दारू काढण्यात आमचे हात आणि कपडे आणि अधिकांश बोटं काळीच झालेली असायची. एका कागदावर सगळी दारू जमा केली की मग कुणाच्या तरी खिशातून माचिस बाहेर यायची. या दारुतून आम्ही कधी अनार बनवला, तर कधी रॉकेट (rocket). पण ते उडायचे नाही, फक्त जळून जायचे. सुतळी बॉम्बची सुतळी काढून आम्ही बनवलेला बॉम्ब ही कधी वाजला नाही... पण या सगळ्या प्रकारात खूप आनंद वाटायचा. चार पाच तास मेहनत करून जमवलेला माल अगदी काही क्षणात धूर होऊन उडून जायचा. पण दिवाळीची खरी मजा देऊन जायचा.
* खेळ आणि क्रीडा विकास
| Diwali And Childhood Sports | Happy Diwali 2023 |
तो काळच खूप सुंदर होता. घरी आलेले फटाके लिमिटेड स्वरूपात असल्यानं आणि दिवाळीच्या सुटीत (Happy Diwali 2023) करायचं तरी काय, या प्रश्नातून या रिकाम्या उद्योगाचा जन्म झालेला असायचा. आमचे खेळही हिंमत वाढवणारे, पळायला लावणारे, संघर्ष शिकवणारे, जुगाडात्मक असे असायचे. विष-अमृत, डबा एक्स्प्रेस, लपंडाव, चोर पोलीस, टायर, शिवणसाई, एखादी फळी घेऊन क्रिकेट... असे सगळे खेळ आणि गल्लोगल्ली पळणारी मुले आता नाहीशी झाली आहेत... ती आता दिसेनाशी झाली आहेत. आजची लहान मुले खेळतात पण Online. टिव्हीने मुलांना एकाच जागी तासन् तास बसून राहायचं शिकवलं. त्याचे चांगले आणि वाईट परिणाम अनेक आहेत. असो, तो आपला आजचा विषय नाही. पण पळापळीचे सर्वच खेळ आता फारसे दिसत नाहीत. बालपणीचा काळ सुखाचा... असे एक वाक्य आहे, ते आता आठवतं. 1985 /86 / 87 / 88 या काळात टीव्ही नव्हता. त्यामुळे आमच्यातला खरा क्रीडा विकास झाला तो याच काळात. या बालपणातून जगणं शिकलो. अडचणींवर मात करायचं शिकलो आम्ही. परिस्थिती कशीही असो, त्यातून बाहेर कसं पडायचं हेही या रम्य बालपणाने शिकवलं. आज सहज आठवलं म्हणून शेअर करतोय. तुमच्या काही आठवणी असतील तर अवश्य सांगा.
दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा...!
| Happy Diwali 2023 |
***