धनसंपत्ती, सुखसमृद्धी देणारे लक्ष्मीपूजन,लाभकारक दिवाळी शुभेच्छा संदेश

धनसंपत्ती, सुखसमृद्धी देणारे लक्ष्मीपूजन,
लाभकारक दिवाळी शुभेच्छा संदेश 
| Laxmi Puja | Lakshmi Pooja Muhurtas | happy diwali wishes | Pooja Vidhi | Happy Diwali | लक्ष्मी पूजन | divali status |
------
मित्र-मैत्रिणींनो,
वसुबारसपासून सुरू होणारी आणि धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मी पूजन, बलिप्रतिपदा आणि भाऊबीज या दिवशी संपत असलेली दिवाळी आपणास आणि आपल्या कुटुंबास यश, सुख समृद्धी आणि भरभराट देऊन जावो, या शुभकामना...!   
🪔 शुभ दीपावली 🪔 

* माहीत आहे का,
दीपोत्सवात नरक चतुर्दशीचे महत्व 
दिवाळी हा सलग चार ते पाच दिवस चालणारा उत्सव आहे. दिवाळी संपूर्ण देशभरात साजरी केली जाते. या उत्सवात प्रत्येक दिवसाला वेगळे महत्त्व आहे. वसुबारस या दिवशी गोधनाची पूजा केली जाते. धनत्रयोदशीच्या दिवशी धन म्हणजे पैसा, संपत्तीची पूजा केली जाते. धनत्रयोदशीला यमदीपदान असेही म्हणतात. याच दिवशी धन्वंतरी जयंती साजरी केली जाते. त्यानंतर येते नरक चतुर्दशी. या दिवशी पहाटे उठून सूर्योदय होण्याआधी अभ्यंग स्नान करण्याची पद्धत आहे. आंघोळीच्या वेळी दिवे लावले जातात. दिव्यांच्या प्रकाशात केलेले हे अभ्यंग स्नान खूप महत्त्वाचे आहे. त्यानंतर देवाची पूजा असते. देवाच्या पूजेच्या वेळी फटाके लावले जातात. त्यानंतर सर्व कुटुंबीय एकत्र येऊन दिवाळी फराळाचा आस्वाद घेतात. कुटुंबाच्या एकत्र येण्याने मिळणारा हा आनंद इतर कुठल्याही आनंदापेक्षा खूप मोठा असतो. नरक चतुर्दशी या दिवशी भगवान श्रीकृष्ण यांनी १६ हजार १०० स्त्रियांना राक्षसाच्या ताब्यातून मुक्त केले होते, अशी एक कथा पुराणात सांगितली जाते. नरक चतुर्दशीच्या दिवशी भगवान श्रीकृष्णाने नरकासुर नामक राक्षसाचा वध केला. नरकासुराने सोळा हजार शंभर स्त्रियांना पळवून नेऊन बंदीवासात ठेवले होते. या बंदीवासातील सर्व स्त्रियांना मुक्त करून भगवान श्रीकृष्णाने त्यांचा उद्धार केला आणि त्यांना समाजात प्रतिष्ठा मिळवून दिली, अशी एक पौराणिक आख्यायिका आहे.
* घराच्या समृद्धीसाठी असे करा लक्ष्मीपूजन 
दिवाळीत सर्वात महत्त्वाचा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन. या दिवशी प्रत्येक घरात माता लक्ष्मीची पूजा होते. अश्विन अमावास्येस संध्याकाळच्या वेळी लक्ष्मीपूजन केले जाते. माता लक्ष्मी फार चंचल आहे, ती स्थिर राहावी म्हणून या मुहूर्तावर लक्ष्मीपूजन केले जाते. या दिवशीही अभ्यंगस्नान करतात, तसेच पाटावर रांगोळी काढून माता लक्ष्मीची रुपये-पैसे, तसेच सोने-चांदीच्या अलंकारांसह पूजा केली जाते. सर्वांसाठी हा दिवस महत्त्वाचा आहे. जिथे स्वच्छ्ता असेल, तिथे लक्ष्मी आणि आरोग्य नांदेल, यानुसार स्वच्छतेचे प्रतीक म्हणून या दिवशी केरसुणी म्हणजेच झाडूचीही पूजा केली जाते. केवळ पैसा म्हणजेच संपत्ती नाही. कितीही पैसा, सोने, प्रॉपर्टी असली तरी शरीर चांगले नसेल तर त्याचा काहीही उपयोग होत नाही. सर्वात मोठी संपत्ती म्हणजे आरोग्य, निरोगी जीवन. जिथे स्वच्छ्ता असेल तिथे रोगराई, बिमारी असणार नाही. (Health Is Welth) त्यामुळेच दिवाळीत स्वच्छतेला मोठे महत्त्व दिले आहे. फक्त आपले घरच नाही, तर आपला परिसरही स्वच्छ आणि सुशोभित असावा, असा संदेश दिवाळी उत्सवातून मिळतो. 
लक्ष्मी पूजन शुभेच्छा संदेश | Happy Diwali | Shubh Dipawali | Happy Diwali | Diwali sms | 
---
।। ओम आद्यलक्ष्म्यै नम: ।। 
।। ओम विद्यालक्ष्म्यै नम:।। 
।। ओम सौभाग्यलक्ष्म्यै नम:।। 
आज लक्ष्मीपूजन...!  
सर्वांना मंगलमय शुभेच्छा...! 

सर्वज्ञे सर्व वरदे सर्व दुष्ट भयंकरी।
सर्वदुख हरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते।।
 लक्ष्मी पूजनानिमित्त आपणास आणि आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा! 

नमस्तेस्तु महामाये श्री पीठे सुर पूजिते।
शंख चक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमोस्तुते।।
लक्ष्मीपूजनानिमित्त आपणास आणि आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा! 

।।ओम श्री महालक्ष्म्यैच विद्महे विष्णुपत्न्यैच धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् ।।
लक्ष्मीपूजनानिमित्त आपणास आणि आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा! 

सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके। शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते।।
आजच्या या शुभदिनी सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा...! 

महालक्ष्मी नमस्तुभ्यं । नमस्तुभ्यं सुरेश्वरी ।
हरिप्रिये नमस्तुभ्यं । नमस्तुभ्यं दयानिधे ।।
 लक्ष्मीपूजनानिमित्त आपणास आणि आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा! 

।। ओम श्री महालक्ष्म्यै नमो नमः ।।
आज लक्ष्मीपूजन...!  
लक्ष्मीपूजनानिमित्त आपणास आणि आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा! 

सिद्धि बुद्धि प्रदे देवी भुक्ति मुक्ति प्रदायिनी ।
मंत्रपूर्ते सदा देवी महालक्ष्‍मी नमोस्‍तुते ।।
 लक्ष्मीपूजनानिमित्त आपणास आणि आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा! 

।। ओम श्रीं श्रीयें नमः ।। 
आज लक्ष्मीपूजन...!  
लक्ष्मीपूजनानिमित्त आपणास आणि आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा! 

आपणांस धनसंपदा, सुखसमृद्धी, ऐश्वर्य आणि आरोग्य प्राप्त होवो...! 
सर्वांना दीपावलीनिमित्त मंगलमय शुभेच्छा...!

आज निमित्त आहे लक्ष्मी पूजनाचे 
अपार धन लाभो तुम्हाला संपत्तीचे !
लक्ष्मी पूजनानिमित्त आपणास आणि आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा! 

दिव्यांचा झगमगाट, फराळाचा गोडवा, 
अपूर्व असा हा दीपावलीचा सोहळा...!
आपल्याला आणि आपल्या परिवाराला दीपोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा! 
आपल्या घरात धनधान्य आणि समृद्धी नांदो, या शुभकामना ! 

मंगलमय दिवस आला आजचा, 
आशीर्वाद लाभो तुम्हाला महालक्ष्मीचा...! 
आपल्या घरात धनधान्य आणि समृद्धी नांदो, या शुभकामना ! 

।। शुभ दीपावली ।।
आपणांस निरायम आरोग्यदायी जीवन लाभो, आपल्या घरात धनधान्य आणि समृद्धी नांदो, या शुभकामना ! 

अपार धन संपत्ती असावी घरी,
सुखसमृद्धी यावी तुमच्या दारी...! 
दिवाळीनिमित्त मंगलमय शुभेच्छा! 
आपणांस धनधान्य, समृद्धी, ऐश्वर्य लाभो, हीच प्रार्थना 

प्रकाशाचा दिवा तुमच्या दारी, 
आनंदाने उजळो आजची रात्र सारी! 
आपल्या घरात धनधान्य आणि समृद्धी नांदो, या शुभकामना ! 

आला आला दिवाळीचा सण, 
जीवनात यावे सुखमय क्षण!  
।। शुभ दीपावली ।।
आपल्या घरात धनधान्य आणि समृद्धी नांदो, या शुभकामना ! 

लक्ष लक्ष दिव्यांनी उजळो ही निशा, 
आपणांस लाभो नवी उमेद, नवी दिशा ! 
आपल्याला आणि आपल्या परिवाराला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! 

जीवनातील काळोखाला विसरूया, 
चला, आनंदात दिवाळी साजरी करूया! 
आपल्याला आणि आपल्या परिवाराला मंगलमय शुभेच्छा! 

लक्ष लक्ष दिव्यांचा प्रकाश, 
आनंदाने भरो तुमचे आकाश...! 
आपल्याला आणि आपल्या परिवाराला मंगलमय शुभेच्छा! 

दारात सुंदर दिव्यांची आरास, 
सदैव राहो लक्ष्मीचा निवास! 
आपल्याला आणि आपल्या परिवाराला दिवाळीनिमित्त मंगलमय शुभेच्छा! 

सुंदर नक्षी दिव्यांची, आयुष्यात 
उधळण व्हावी सौख्याची! 
आपल्याला आणि आपल्या परिवाराला दीपावली शुभेच्छा! 

दिव्यांचे तोरण सजले दारी, 
धनधान्य, समृद्धी नांदो आपल्या घरी !
आपल्याला आणि आपल्या परिवाराला दिवाळीनिमित्त हार्दिक शुभेच्छा! 
----------------------
Previous Post Next Post