धनतेरसच्या विशेष पूजेद्वारे मिळवा धनधान्य आणि आरोग्य !

धनतेरसच्या विशेष पूजेद्वारे
मिळवा धनधान्य आणि आरोग्य ! 
| Dhanteras Puja | dhanteras Muhurtas | happy dhanteras |Happy Diwali | धनत्रयोदशी |
------
मित्र-मैत्रिणींनो,
आपणास आणि आपल्या कुटुंबास दिवाळी अर्थात दीपोत्सवाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा...! Happy Diwali 🪔 शुभ दीपावली 🪔 
दिवाळी हा समस्त भारतीयांचा सर्वात लाडका सण. तिमिरातून तेजाकडे पाऊल टाकण्याचा हा दिवस... अंधकाराला हरवून विजयाचा प्रकाशोत्सव साजरा करण्याचा दिवस... कुणाच्या तरी आयुष्यात उजेड देणारी लहानशी पणती प्रज्वलित करण्याचा दिवस...! होय, मनसोक्त आनंद लुटण्याचा हा दिवस. सर्वांना आनंद लुटता यावा, कुटुंबातील सदस्यांना एकत्र आणणारा हा उत्सव त्यामुळेच सलग पाच दिवस साजरा केला जातो. दिवाळीची सुरुवात होते वसुबारसने (Vasubaras). त्यानंतर दुसरा दिवस येतो धनतेरस. आपले घर धनधान्य, समृद्धीने भरून जावे, सर्वांना आरोग्य लाभावे म्हणून धनतेरसला अत्यंत महत्त्व आहे. धनतेरस अर्थात धनत्रयोदशीला (Dhanteras Dhan Trayodashi) माता धनलक्ष्मीचे आणि भगवान धन्वंतरी यांचे पूजन करतात. याच दिवशी धन्वंतरी जयंती साजरी केली जाते. शुक्रवार, १० नोव्हेंबरला धनत्रयोदशी आहे. या दिवशी मनोभावे केलेल्या पूजेने घरात नेहमी लक्ष्मीचा निवास असेल, तसेच आरोग्याचे अमाप धनही तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला लाभेल. धनत्रयोदशीच्या दिवशी धन म्हणजे पैसा, संपत्तीची पूजा केली जाते. याच दिवशी धन्वंतरी जयंती असते. या दिवशी नवीन कपडे, नवीन वस्तू, घर, फ्लॅट्स, अलंकार खरेदी करणे शुभ मानले जाते. हा दिवस म्हणजे सुवर्ण (Gold) खरेदीचा शुभ दिवस मानला जातो. या दिवशी भगवान कुबेर, विष्णू - लक्ष्मी यांची पूजा केली जाते. मित्रांनो, या दिवशी काही मोठी खरेदी करता आली नाही तरी किमान १० रुपयांचे धने (Coriander) अवश्य खरेदी करा. घरात वापरासाठी एखादे पात्र भांडे खरेदी करा. मित्रांनो, जैन धर्मातही या दिवसाला धन्य तेरस किंवा ध्यान तेरस असे म्हणतात. त्याचे कारण म्हणजे भगवान महावीर यांना तीन दिवसांच्या योगनिद्रेनंतर धनत्रयोदशीच्या दिवशी निर्वाणप्राप्ती झाली होती. 
* तुम्हाला माहित आहे का, 
काय आहे यमदीपदान ?

आश्विन कृष्ण त्रयोदशी म्हणजेच धनत्रयोदशी. या दिवशी यमराजाला प्रसन्न करण्याकरिता यमदीपदान केले जाते. घरातील अलंकार, सोने - नाणे स्वच्छ केले जाते. विष्णू, लक्ष्मी, कुबेर, योगिनी, गणेश, नाग, द्रव्यनिधी यांची पूजा केली जाते. अपमृत्यु म्हणजेच अकाली, अपघाताने मृत्यु येऊ नये याकरिता सायंकाळी कणकेचा दिवा दक्षिणेस ज्योत करून ठेवावा. असे केल्याने अपमृत्यू येत नाही, अशी धारणा आहे. 

* धनतेरसच्या सुंदर शुभेच्छा 
दिवाळी हा प्रकाशाचा उत्सव आहे. आनंदाचा उत्सव आहे. या दिवशी एकमेकांना दिवाळी शुभेच्छा संदेश (Happy Diwali | Diwali Wishes | Shubh Dipavali | Diwali SMS) पाठवून तुम्ही या उत्सवाचा वेगळा आनंद घेऊ शकता. धनत्रयोदशी शुभेच्छा देणारे अनोखे संदेश पाठवण्यासाठी येथे काही धनतेरस शुभेच्छा संदेश देत आहोत. 
धनत्रयोदशी शुभेच्छा संदेश | Happy Dhanteras | Shubh Dhanteras | Happy Diwali | Dhanteras sms | 
---
आज निमित्त आहे धनत्रयोदशीचे, 
अपार धन लाभो तुम्हाला आरोग्याचे !
धनत्रयोदशीनिमित्त आपणास आणि आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा! 

दिव्यांचा झगमगाट, फराळाचा गोडवा, 
अपूर्व असा हा धनत्रयोदशीचा सोहळा...!
आपल्याला आणि आपल्या परिवाराला धनतेरसच्या हार्दिक शुभेच्छा! 
आपल्या घरात धनधान्य आणि समृद्धी नांदो, या शुभकामना ! 

मंगलमय दिवस आला आजचा, 
आशीर्वाद लाभो तुम्हाला महालक्ष्मीचा...! 
आपल्या घरात धनधान्य आणि समृद्धी नांदो, या शुभकामना ! 

।। शुभ धनत्रयोदशी ।।
आपणांस निरायम आरोग्यदायी जीवन लाभो, आपल्या घरात धनधान्य आणि समृद्धी नांदो, या शुभकामना ! 

अपार धन संपत्ती असावी घरी,
सुखसमृद्धी यावी तुमच्या दारी...! 
धनत्रयोदशीनिमित्त मंगलमय शुभेच्छा! 
आपणांस धनधान्य, समृद्धी, ऐश्वर्य लाभो, हीच प्रार्थना 

प्रकाशाचा दिवा तुमच्या दारी, 
आनंदाने उजळो आजची रात्र सारी! 
आपल्या घरात धनधान्य आणि समृद्धी नांदो, या शुभकामना ! 

आला आला दिवाळीचा सण, 
जीवनात यावे सुखमय क्षण!  
।। शुभ धनत्रयोदशी ।।
आपल्या घरात धनधान्य आणि समृद्धी नांदो, या शुभकामना ! 

आपल्याला आणि आपल्या परिवाराला निरामय आरोग्य, दीर्घायु लाभो, ही प्रार्थना! 
धनत्रयोदशीनिमित्त आपणास आणि आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा! 


लक्ष लक्ष दिव्यांनी उजळो ही निशा, 
आपणांस लाभो नवी उमेद, नवी दिशा ! 
आपल्याला आणि आपल्या परिवाराला धनतेरसच्या हार्दिक शुभेच्छा! 

धनत्रयोदशीचा आज पवित्र सण 
जीवनात येवोत आनंदाचे क्षण!            
आपल्याला आणि आपल्या परिवाराला धनतेरसच्या हार्दिक शुभेच्छा! 

जीवनातील काळोखाला विसरूया, 
चला, आनंदात दिवाळी साजरी करूया! 
आपल्याला आणि आपल्या परिवाराला धनत्रयोदशीनिमित्त मंगलमय शुभेच्छा! 

लक्ष लक्ष दिव्यांचा प्रकाश, 
आनंदाने भरो तुमचे आकाश...! 
आपल्याला आणि आपल्या परिवाराला धनत्रयोदशीनिमित्त मंगलमय शुभेच्छा! 

दारात सुंदर दिव्यांची आरास, 
सदैव राहो लक्ष्मीचा निवास! 
आपल्याला आणि आपल्या परिवाराला धनत्रयोदशीनिमित्त मंगलमय शुभेच्छा! 
निरामय आरोग्य अन सुखसमृद्धी
घरोघर व्हावी सुखांची वृद्धी !
आपल्याला आणि आपल्या परिवाराला धनत्रयोदशीनिमित्त मंगलमय शुभेच्छा! 

सुंदर नक्षी दिव्यांची, आयुष्यात 
उधळण व्हावी सौख्याची! 
आपल्याला आणि आपल्या परिवाराला धनत्रयोदशीनिमित्त मंगलमय शुभेच्छा! 

दिव्यांचे तोरण सजले दारी, 
धनधान्य, समृद्धी नांदो आपल्या घरी !
आपल्याला आणि आपल्या परिवाराला धनत्रयोदशीनिमित्त मंगलमय शुभेच्छा! 

प्रकाशाचा उत्सव आला, 
सुख-समृद्धी लाभो तुम्हाला! 
आपल्याला आणि आपल्या परिवाराला धनत्रयोदशीनिमित्त मंगलमय शुभेच्छा! 
----------------------
Previous Post Next Post