जीवनात प्रेरणा देणारे 49 सुंदर विचार | 49 Good Morning Thoughts |

* जीवनात प्रेरणा देणारे 49 सुंदर विचार 
| 49 Good Morning Thoughts | Good Morning | Marathi Suvichar | Good Thought | Quotes | motivational quotes |
-------------
मित्रांनो, प्रत्येक मोठ्या कार्याच्या मागे एक विचार असतो. हाच विचार सर्वप्रथम मनात येतो. त्यानंतर डोक्यात जातो. आणि नंतरच त्या त्या कार्याची Planning प्लॅनिंग होत असते. जीवनात यशस्वी व्हायचे असेल, तर त्यासाठी मनात चांगले प्रेरणादायी विचार (Motivational Thoughts Quotes) येणे गरजेचे असते. एखादा सुंदर विचार आपला संपूर्ण दिवस आणखी सुंदर करून जातो. मित्रांना प्रेरणा देण्याचा, जीवनात खंबीरपणे उभे राहण्याचा एकमेव मार्ग आहे तो सुविचारांची (Good Morning Thoughts) देवाणघेवाण करण्याचा. अभ्यास, नोकरी, जॉब, व्यापार, सुखी कुटुंब (Happy Family), सुखी जीवन (Happy Life Quotes) सर्वांसाठी सुविचार आवश्यक आहेत. हेच विचार आपल्याला जगण्याची प्रेरणा देतात. संघर्ष करायला शिकवतात. जीवनाच्या शर्यतीत जिंकायचे कसे, हे शिकवतात. जीवनाला आकार देणारे, दिशा देणारे, यशाचा मार्ग दाखवणारे 49 सुविचार (49 Good Morning Thoughts) येथे देत आहोत. हे विचार तुमचे जीवन बदलून टाकतील. तुम्हाला एक नवीन दिशा देतील. आपल्या मित्र-मैत्रिणी, नातेवाईक आणि इतरांपर्यंत अवश्य शेअर करा. बघा, ते तुम्हाला धन्यवाद देतील.      
------------
(१) 
* माणसाचे समजूतदार आणि संयमी असणे, हे त्याच्या वयावरून ठरत नाही, तर त्याला जीवनात आलेल्या कटू - गोड अनुभवांवरून ठरत असते. 
(२)
* माणसातील एका चुकीकडे लक्ष देऊ नका, त्याच्या इतर चांगल्या बाजूंकडे लक्ष द्या. चुकाच मोजत राहताल तर नाते फुलणार नाही, ते कोमेजून जाईल.
(३) 
* नाते आणि मैत्री टिकवणे खरेच अवघड आहे. दोन्हींमधला निगेटिव्ह ॲटिट्यूड तुमची मैत्री आणि नाते दोन्हीही संपवून टाकतो. 
(४)
* जीवनात आलेले संकट खरे तर कापसाच्या पोत्यासारखे असतात, दिसायला खूप मोठे दिसते, पण एकदा हाताळायला घेतले की आपण किती सहज पार करू शकतो हे लक्षात येते. 
(५)
* जगात आई आणि वडील हेच खरे दैवत आहे. जगात कुणी कुणाला आपल्यापेक्षा पुढे गेलेला बघू शकत नाही, परंतु एक आई-वडीलच असे असतात, की मुलांच्या यशाने, भरारीने अत्यंत आनंदी होतात.
(६) 
* आयुष्यात कठीण - अशक्य असे काहीच नाही. तुम्ही मनात एकदा निर्धार करा... वाटा आपोआपच तुमच्यासमोर येतील. 
(७)
* जीवनाचा संघर्षपथ आपला आहे, कारण जीवन आपले आहे. त्यामुळे पुढे जाण्याचा मार्गही तुम्ही स्वतःच निर्माण करा. 
(८)
* जगाच्या मनाप्रमाणे वागण्याची कसरत करीत असाल, तर सोडून द्या. तुम्ही तुमचे सुंदर आयुष्यही नीटपणे जगू शकणार नाहीत. 
(९)
* एक ध्यानात घ्या... जीवनात कठीण रस्तेच तुम्हाला नेहमी सुंदर ठिकाणी पोहोचवतात. 
(१०)
* सन्मान लक्षात ठेवला तर अहंकार वाढतो, सन्मान करणारा लक्षात ठेवला तर माणसातील कृतज्ञता वाढते. 
(११)
* `ज्ञान` असेल तर `शब्द` समजतात आणि `अनुभव` असेल तर त्यांचा `अर्थ` समजतो. 
(१२)
* चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात, जे प्रतीक्षा करतात. अधिक चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात, जे प्रयत्न करतात, पण सर्वोत्तम गोष्टी त्यांनाच मिळतात, जे आपल्या प्रयत्नांवर अतूट विश्वास ठेवतात.
(१३)
* आयुष्यात मागे खेचणारे, नाव ठेवणारे अनेक जण भेटतील, पण ज्यांनी साथ दिलीय, उमेद दिलीय त्यांना कधीच विसरू नका. 
(१४)
* मित्रांनो, विद्यार्थी जीवन असो की नंतरचे आयुष्य मिळालेलं यश साजरं करणं सोपं असतं, त्यात सारेच सोबत असतात. पण पुढे जायचे असेल, तर अपयश सहन करायला शिका. कारण ते तुम्हाला एकट्यानेच सहन करावं लागेल. 
(१५)
* आयुष्यात संघर्ष असला तरच तुम्ही कणखर व्हाल. आधी लहान लहान अडथळे पार करा. आयुष्यात येणारी संकटे झेलण्याची, मग ती पेलण्याची सवय लागली की तुम्ही आपोआपच कणखर निडर व्हाल. 
(१६)
* परिस्थिती माणसाला सर्व काही शिकवते. परिस्थितीच आपल्याला घडवत असते. परिस्थिती कशीही असली तरी शांत राहायला शिका. ही शांतता, हा संयमच तुम्हाला पुढे घेऊन जाईल. 
(१७)
* कुणाच्या मनात नेहमी जिवंत राहावंसं वाटत असेल तर, सर्वात आधी आपलं बोलणं आणि वागणं यावर नियंत्रण ठेवा. मनात स्वार्थ व अहंकार भावना ठेवून वागू नका. 
(१८)
* आपली जीवनयात्रा कधी ना कधी थांबणार आहे, याचे सतत भान ठेवले तर मनात कुणाविषयीही राग उरणार नाही. 
(१९)
* आपलं आयुष्य जसं गोड व्हायला हवं, तसंच दुसऱ्याच्या जीवनातही मधुर आठवणींचे क्षण पेरत चला. 
(२०)
* लक्षात ठेवा, तुम्ही जोडलेली माणसंच शेवटी तुमच्या कामी येतात. अडचणीच्या वेळी दुसरं काहीच कामी येत नाही. 
(२१)
* आनंद आणि दुःख या नाण्याच्या दोन बाजू आहेत. आनंद हवा असेल, तर सोबत दुःखही घ्यावेच लागेल.
(२२)
* निंदा नेहमी त्याच व्यक्तीची होतं असते, जी व्यक्ती नेहमी दुसऱ्याच्या हितासाठी झटत असते. जे काहीच करीत नाहीत, त्यांची कसली निंदा? 
(२३)
* अनुभव हा जीवनातला सर्वात मोठा शिक्षक आहे. आपण केलेल्या चुकांमुळे नुकसानही आपलेच होते हे खरे, पण त्यातूनच आपण नवीन काहीतरी शिकतो, हे विसरून कसे चालेल? 
(२४)
* बरेचदा काहीही न बोलता खूप काही सांगता येते. वाणी आणि शब्द यापेक्षाही खूप मोठी ताकद मौन राहण्यात दडलेली असते. 
(२५)
* ज्याने जोडण्यासाठी कष्ट घेतले आहेत, तो तोडताना हजारदा विचार करतो, पण आयतं मिळालं की माणूस एका झटक्यात तोडतो, मग ती झाडे असोत किंवा नाती.
(२६)
* क्षुल्लक दिसणारा दगड एकदाच मंदिरात जातो आणि त्याचा देव होऊन जातो. पण माणूस अनेकदा मंदिरात जाऊनही त्याच्या आतलं देवत्व जागं होत नाही. 
(२७)
* आयुष्यात कितीही चुका करा त्या नंतर सुधारताही येतील पण माणूस ओळखण्यात कधीच चूक करू नका. ही चूक लक्षात येईपर्यंत मोठे नुकसान झालेले असेल. 
(२८)
* आयुष्यात कुणाचे भले करता आले नाही तरी चालेल, पण चुकूनही कुणाचे नुकसान करू नका. 
(२९)
* तुम्ही कितीही चांगले काम करा, चांगले वागा, इमानदार राहा ही दुनिया फक्त तुमच्या एका चुकीची वाट बघत असते.
(३०)
* दुसऱ्याचे अनुभव जाणून घेणे हासुद्धा एक अनुभवच असतो.
(३१)
* जेव्हा माहित पडते की आयुष्य काय आहे, तोपर्यंत ते अर्धे संपून गेलेले असते. प्रत्येक क्षण आनंदात जगा. 
(३२)
* कोणताही व्यक्ती वाईट स्वभावाचा नसतो. आपले विचार त्याच्याशी न पटल्यास आपल्याला तो वाईट वाटायला लागतो.
(३३)
* आयुष्य जगण्यासाठी नुसत्या विचारांची नाही, सुविचारांची गरज असते.
(३४)
* खोटं बोलणाऱ्या अनेक मित्रंपेक्षा, खरे सांगणारा, एक प्रामाणिक शत्रू नेहमीच चांगला असतो.
(३५)
* जर तुम्ही सत्यापासून ढळला नाहीत, तर भविष्यकाळ तुमचाच आहे. विजय तुमचाच आहे. 
(३६)
* घाम गाळल्याशिवाय दामाची खरी किंमत कळत नाही. कष्टाशिवाय फळाला मधुरता येत नाही. 
(३७)
* खूप काही मोठे करता आले नाही तरी चालेल, पण अडलेल्या नडलेल्या लोकांना अवश्य मदत करा. 
(३८)
* गुरूपेक्षा शिष्याने अधिक काहीतरी केले पाहिजे. 
(३९)
* विद्यार्थी स्वाभिमानी असला पाहिजे. तो न्यायाची चाड असणारा व अन्यायाची चीड बाळगणारा हवा.
(४०) 
* कोणतीही गोष्ट फुकट मिळाली की, माणसाला तिची किंमत वाटत नाही. 
(४१) 
* परिवर्तन हा या सृष्टीचा नियम आहे. सत्याशिवाय निरंतर असे काहीच या जगात नाही. 
(४२)
* गरजेपेक्षा अधिक संपत्ती असली की तिच्यातून सुखाची निर्मिती होईल, अशी आशा कधीच करू नका.  
(४३)
* जो स्वतःच्या आणि इतरांच्या कल्याणासाठी झटतो तो सर्वात उत्तम पुरुष समजावा.
(४४)
* खरा आनंद दुसऱ्यांना देण्यात असतो, घेण्यात किंवा मागण्यात नसतो. एकदा जवळचं काही देऊन तर बघा...! 
(४५)
* फाटलेल्या वस्त्राला वेळेवर घातलेला एक टाका नंतरचे दहा टाके वाचवितो. वस्त्र जीर्ण होत नाही. 
(४६)
* विज्ञानाच्या प्रगतीवर देशाची प्रगती अवलंबून असते. त्यामुळे विज्ञानवादी बना. 
(४७)
* पुस्तकांची किंमत रत्नांपेक्षाही अधिक आहे. पुस्तके सदासर्वकाळ मार्गदर्शक असतात. 
(४८)
* जीवनात जो प्रयत्नांची पराकाष्ठा करतो, त्याला जीवनात अशक्य असे काहीच उरत नाही.
(४९) 
* आपली प्रगती आणि अधोगती याला दुसरे कोणी नाही, तर स्वतः आपणच जबाबदार आहोत. परिस्थितीला दोष देऊ नका. 
-----------------
मित्रांनो, सुविचारांचा हा संग्रह तुम्हाला नेहमी प्रेरणा देत राहो. जिंकण्याचे बळ देत राहो, हीच अपेक्षा. उज्वल करिअरसाठी तुम्हाला लाख लाख शुभेच्छा! 
धन्यवाद...! 

Previous Post Next Post