* जीवनात आनंदाची उधळण करणारे 10 विचार
| Happy Life Thoughts | happy life status | Happy Life | Life Mantras | सुखी जीवन | Happiness |
-----
* स्वतःच्या जीवनात आनंद आणायचा असेल तर आधी दुसऱ्याचे जीवन आनंदी करण्याचा प्रयत्न करावा लागेल. लक्षात ठेवा, आपल्या दारात सुवास पसरविणारे प्राजक्ताचे झाड शेजाऱ्याच्या अंगणात लावलेले असते.
* दुसरे कोणी येऊन, तुमचं जीवन नाही बदलू शकत. ते पाऊल आधी तुम्हालाच उचलावे लागेल.
(मराठी सुविचार | आनंदी जीवन | happy life status | Though Of Day | Today's Thought)
* लोक मदत करीत नाहीत, असं तुम्ही जेव्हा म्हणता, तेव्हा आधी मनाला विचारून बघा - तुम्ही कोणाला मदत केली आहे का?
* संपत्ती, मालमत्ता, प्रॉपर्टी, पैसा या गोष्टीत आपण आनंद आणि सुखाचा शोध घेत, संपूर्ण जीवन घालवतो. पण हे दोघे भाऊ तुमच्या मनात राहतात, याकडे आपण लक्षच देत नाही.
* कितीही संकटे आली तरी खचून जाऊ नका. शांत राहा. बाहेर पडण्याचा मार्ग निश्चित सापडेल...! कारण तो संकटासोबतच आला आहे. फरक एवढाच की, तुम्हाला तो लगेच नाही दिसणार !
(मराठी सुविचार | आनंदी जीवन | happy life status | Though Of Day | Today's Thought | Success | सुंदर विचार)
* आयुष्यात नेहमी मोठी स्वप्ने पाहा, मोठ्या आकांक्षा ठेवा... कसून पाठलाग करा...! मग बघा, तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल !
* प्रयत्न ही अशी गोष्ट आहे, जी तुम्हाला सर्व काही मिळवून देऊ शकते. जीवनात यशस्वी होण्यासाठी प्रयत्न, कष्ट आणि मेहनतीला दुसरा पर्याय नाही.
* संकटात कोणीही तुमच्या सोबतीला कोणीही नाही असे म्हणू नका. विचार करा, तुमचं मन तुमच्यासोबत आहे. सदा सर्वदा सदैव निरंतर...!
* माणसाचं मन सर्वाधिक सामर्थ्यशाली आहे. प्रत्येक कार्याचा प्रारंभ आधी मनात होतो, हे लक्षात ठेवा.
(Happy Life Quotes | मराठी सुविचार | आनंदी जीवन | happy life status | Though Of Day | Today's Thought)
* मोठ्या वृक्षाच्या सावलीत वाढणारी रोपटी लहानच राहतात. तुम्हाला आकाशाला भिडणारी उंची गाठायची असेल तर सर्वात आधी उन्हात यावं लागेल.
धन्यवाद...!
-------