माहीत आहे का सोनं का म्हणतात या आपट्याच्या पानांना ! दसरा शुभेच्छा संदेश

* माहीत आहे का सोनं का म्हणतात 
या आपट्याच्या पानांना ! 
| Story Of Golden Leaf | Dasra Wishes In Marathi And Hindi | Dasra SMS | Dasra Quotes | Dushahara Wishes In Hindi | दसरा शुभेच्छा संदेश | दसरा शुभेच्छा | विजया दशमी संदेश |
------
मित्रांनो, नवीन वर्षाचे कॅलेंडर घरी आणले की, आपण सर्वप्रथम काय बघतो....? होय. बरोबर ! दसरा आणि दिवाळी हे सण कधी आणि कोणत्या दिवशी येत आहेत, हेच आपण सारे बघत असतो. या ठिकाणी एक गंमत आहे, जीवनात ज्या क्षणांची आपण आतुरतेने वाट पाहत असतो, ते क्षण, ते दिवस असेच झर्रकन निघून जातात. आता हेच बघा ना, नवरात्री उत्सव संपून दसरा अर्थात विजया दशमीचा उत्सव येतोय. दसऱ्याच्या दिवशी मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईकांना कोणते शुभेच्छा संदेश (Dasara Marathi SMS, Shubhechha, Quotes, Status) पाठवावेत, असाच विचार तुम्ही पण नक्कीच करत असणार. पण आम्ही तुमचं हे काम अगदी सोपं करून टाकलं आहे. येथे तुम्हाला मिळतील एकाहून एक सुंदर कलात्मक, भक्तिभावपूर्ण शुभेच्छा संदेश (Dasra Wishes In Marathi And Hindi). मित्र आणि नातेवाईकांना शुभेच्छा देण्यासाठी याहून सुंदर शुभेच्छा संदेश (Dasryachya Shubhechha Marathi Hindi) तुम्हाला मिळणार नाहीत. पण त्याआधी आपण जाणून घेऊ दसरा, विजया दशमी सणाचे महत्त्व. आणि हो, तुम्हाला माहीत आहे का, या आपट्याच्या पानांना सोनं का म्हणतात? (Story Of Golden Leaf). त्याची एक सुंदर कथा आहे. आपल्याला नक्कीच आवडेल. 
* साडेतीन मुहूर्तांपैकी एक पूर्ण मुहूर्त
दसरा आणि विजया दशमी ! 
(Shubh Muhurat Dushahara And Vijaya Dashami) 

दसरा साधारण ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात येतो. भारतीय संस्कृतीत या दिवसाला खूप महत्त्व आहे. या दिवशी प्रत्येक घरात घटाच्या (Ghatam) रूपात विराजमान झालेली आदिमाया आदिशक्ती दुर्गा मातेचे विसर्जन करण्यात येते. त्याला घटोत्थापन (Ghatotthapan) असे म्हणतात. या दिवशी पुराणात अनेक शुभ घटना आणि प्रसंग घडले असल्याने दसरा आणि विजया दशमी हा दिवस खूपच महत्त्वाचा आहे. 

* माहीत आहे का सोनं का म्हणतात 
या आपट्याच्या पानांना ! 
(Story Of Golden Leaf | Katha | Myths)
पुराणकाळात श्री रघुराजा नामक भगवान श्रीराम यांचे पूर्वज होते. त्यांच्याच नावाने या कुळाला रघुकुल असे म्हटले जाऊ लागले. ते खूप दानशूर होते. अशीच ही दंतकथा आहे सोनं म्हणजेच आपट्याच्या पानांची. 
संत एकनाथ महाराज यांच्या पावन पदस्पर्शाने पुनीत झालेली भूमी म्हणजे प्रतिष्ठाण नगरी अर्थात पैठण. या पैठण शहरात कौत्स हा युवक वरतंतु नामक ऋषींकडे वेदाभ्यास करत होता. आपली साधना परिपूर्ण झाल्यानंतर कौत्स या युवकाला आपल्या त्याबद्दल गुरुदक्षिणा द्यायची होती. पण गुरूंनी त्याच्याकडून दक्षिणा घेण्यास नकार दिला. कारण ते आपल्या शिष्याच्या प्रगतीवरच समाधानी होते. त्यांना कशाचीच अपेक्षा नव्हती. पण कौत्स याने खूप आग्रह केल्यानंतर अखेरीस त्यांनी सांगितले की, मला एकाच ठिकाणाहून मिळालेल्या १४ कोटी सुवर्णमुद्रा अर्पण केल्या तर ती तुझी गुरुदक्षिणा ठरेल. परंतु कौत्स गरीब होता. एवढ्या सुवर्ण मुद्रा कुठून आणाव्यात, असा त्याला प्रश्न पडला. मग तो त्या काळात आपल्या दानशूरतेमुळे प्रख्यात असलेले भगवान श्रीराम यांचे पूर्वज श्री रघुराजा यांच्याकडे गेला. त्यांना आपली इच्छा सांगितली. पण त्यांनी आपली सर्व संपत्ती यज्ञात दान केली होती. त्यामुळे श्री रघुराजा काहीही करू शकले नाहीत. पण आपल्याकडे आलेल्या याचकाला परत पाठवणे त्यांना मान्य नव्हते. म्हणून श्री रघुराजा यांनी भगवान कुबेराशी युद्ध करून त्याची संपत्ती मिळवायची आणि कौत्स या युवकाला मदत करण्याचे ठरवले. भगवान कुबेर यांना ही वार्ता समजली. त्यांनी युद्धाची गरज नाही, मी स्वखुशीने सुवर्ण मुद्रा द्यायला तयार आहे, असे कळवले आणि विजयादशमी म्हणजे दसऱ्याच्या दिवशी भगवान कुबेर यांनी अनंत सुवर्णमुद्रांचा वर्षाव केला. कौत्स या युवकाने त्यातील १४ कोटी सुवर्णमुद्रा घेतल्या आणि आपल्या गुरूंना गुरुदक्षिणा म्हणून दिल्या. सोनं लुटा सोनं, सोनं घ्या सोनं असे म्हणून उरलेल्या सुवर्णमुद्रा लोकांमध्ये वाटून टाकल्या. भगवान कुबेर यांनी केलेला सुवर्णमुद्रांचा वर्षाव ज्या झाडावर झाला ते झाड होते आपट्याचे. त्यानंतर या झाडाच्या पानांना सोनं असे म्हणले जाऊ लागले. या पानांना हिरण्यगर्भा असेही म्हणतात. याच दिवसापासून आपट्याचे पान सोनं म्हणून लुटण्याची परंपरा सुरू झाली, असे म्हणतात. 

* आणखी एक दंतकथा 
दसऱ्याच्या दिवशी आपण एकमेकांना सोनं म्हणून जी आपट्याची पाने देतो, त्याबाबत आणखी एक दंतकथा सांगितली जाते. ती अशी - महाभारत युद्धाच्या काळात धर्मराज युधिष्ठिर, धनुर्धारी अर्जुन, महाबली भीम आणि नकुल व सहदेव हे पाच पांडव बंधू अज्ञातवासात होते. त्यावेळी त्यांनी भगवान श्रीकृष्ण यांनी सांगितल्यानुसार आपली शस्त्रास्त्रे
शमी वृक्ष म्हणजेच आपट्याच्या झाडामध्ये लपवून ठेवली होती. पांडवांचा अज्ञातवास संपल्यानंतर त्यांनी ती शस्त्रे बाहेर काढली. तो शुभ दिवस होता दसऱ्याचा. तेव्हापासून आपट्याच्या पानांना सोने असे म्हटले जाऊ लागले आणि हीच पाने एकमेकांना वाटण्याची प्रथा सुरू झाली, असे सांगितले जाते. मित्रांनो, आपला प्रत्येक सण आणि उत्सव अशा अनेक कथांशी जोडलेला असतो. तुम्हीही अशा काही कथा नक्कीच ऐकल्या असतील. 
आपणा सर्वांना दसरा आणि विजयादशमीच्या
हार्दिक शुभेच्छा ! 
धन्यवाद...! 
-----------------------
Previous Post Next Post