भूख लगी हैं, तो खाओ खिचडी !

     मित्रांनो, घरातल्या माणसाची किंमत तो नसल्यावरच कळते... आणि त्यातही हा माणूस म्हणजे आपली सौ. असेल तर तिचे मूल्यही खरोखर 'सौ करोड' होऊन जाते...! नेमक्या अशा वेळी परिस्थिती आपली परीक्षा घेते. अर्थात याचा अनुभव Experience तुम्ही घेतलाय की नाही, तुम्हालाच माहीत... पण मी घेतलाय. 




तसा मला बाहेर खाण्यापिण्याचा भारी शौक. मिसळ, Wada Pav, पाणीपुरी, Bhel, शेवपुरी, दहीपुरी, Fafda, मसाला शेव.... अशा चटपटीत आणि खमंग पदार्थांची अस्सल ठिकाणं Spots - ठेपे मला चांगलेच माहीत आहेत. कारण... नेहमीच्या चकरा! काही दिवसांपूर्वी तब्बल आठ ते दहा दिवस घरी एकटा राहण्याचा योग आला. आमच्या 'सौ करोड' लेकराबाळासहित Out Of State गेलेल्या. सुरवातीला टप्प्याटप्प्याने सगळे ठेपे पालथे करून झाले. पण मित्रांनो, पोट काही भरत नव्हतं. एक-दोन दिवस बहिणीकडे मस्त भरपेट करून आलो. पण रात्रीची पंचाईत व्हायची. मग काय एक दिवस केली खिचडी...! 

मोजका अंदाज काही आला नाही, आणि ती झाली पातेलंभर ! एकटा जीव खाणार तरी किती...? दुसऱ्या दिवशी उन्हाळी दिवसाची काळी छाया त्या खिचडीवर पडली आणि झाली बिचारी खराब...! त्यानंतर पुन्हा एक दोन दिवसांनी हात आखडता घेऊन टाकले तांदूळ आणि Daal. भूख तो भारी लगी थी...! खिचडी लवकर व्हावी आणि तितक्याच लवकर पोटात जावी म्हणून छोटंसं झाकण ठेवलं पातेल्यावर. मी समोरच उभा. हातात चिमटा घेऊन. झाली की काय याचा अंदाज घेण्यासाठी चिमटा पुढे केला.... आणि धक्का लागला झाकणाला...!!! 

आता मात्र मोठी फजिती झाली...! खिचडीवरचं झाकण पडलं पातेल्यात...! आता घ्या... भूख लगी हैं ना ! पातेल्यावरचं झाकण काढण्यात जे काही कलाकौशल्य लागलं, वेडेवाकडे हात करून जे काही दिव्य करावं लागलं त्याला खरोखर तोड नव्हती...! शेवटी कशी तरी Khichadi ताटात आली आणि मग पुढं पोट आणि मन दोघेही शांत झाले...! 


(विशेष सूचना - तुमची अशी काही गंमत झाली असेल, तर नक्की शेअर करा.)

Previous Post Next Post